गर्भाशयाच्या आतील बाजूवर ऊतींचा थर असतो. जो प्रत्येक मासिक पाळीच्या वेळी निघून जातो. हा थर गर्भाशयाच्या बाहेरील बाजूसही वाढू लागतो. मग अशा परिस्थितीत स्त्रियांना भयंकर वेदना सहन कराव्या लागतात. विशेषतः मासिक पाळीच्या दरम्यान वेदना खूप वाढतात. जेव्हा ऊतींचा बाह्य थर फुटू लागतो, तेव्हा हा थर आतल्या अवयवांना चिकटतो. आतापर्यंत ते काढण्याचा शस्त्रक्रिया हा एकमेव मार्ग होता. हे वाचा - ‘आवडतं म्हणून भरपूर वेळ Bathing नको; 'या' वेळेतच आटोपा अंघोळ नाहीतर... हार्मोन्सच्या उपचारानंतर एस्ट्रोजेन कमी केले जाते, जेणेकरून मासिक पाळीचे चक्र मागे-पुढे जाईल. परंतु, या पद्धतीमध्ये कित्येक महिने लागू शकतात आणि त्यात चुका होण्याची दाट शक्यता असते. म्हणजेच त्याचे दुष्परिणाम अधिक असू शकतात. उदाहरणार्थ, वजन वाढणे, अस्थिर मन किंवा डोकेदुखी. हार्मोन थेरपी अनेकांना मदत करत नव्हती. हे वाचा -स्वयंपाक करताना ही चूक केली तर ताजं शिजवलेलं खाऊनही काहीच फायदा होणार नाही ऑक्सफोर्ड विद्यापीठात एंडोमेट्रिओसिसवर संशोधन करणाऱ्या क्रिना झोंडरवान यांनी सांगितले की, हे संशोधन 1990 पासून चालू आहे. तेव्हा शास्त्रज्ञांना माहित होते की हा रोग जेनेटिक पद्धतीने बरा करणे शक्य आहे. परंतु, त्यावर उपचार करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या जीनचा वापर केला जाऊ शकतो हे माहीत नव्हते.Researchers have discovered a potential nonhormonal way to fight #Endometriosis—a prevalent, mysterious, and hard-to-treat disease that causes pain and infertility in women. https://t.co/dJFuCzNp2M
— News from Science (@NewsfromScience) September 3, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pregnant woman, Woman