Home /News /heatlh /

No Smoking Day 2021 : तुमची एक वाईट सवय हिरावतेय तुमच्या आयुष्यातील सर्वात गोड क्षण

No Smoking Day 2021 : तुमची एक वाईट सवय हिरावतेय तुमच्या आयुष्यातील सर्वात गोड क्षण

No Smoking Day 2021 : धूम्रपानाचा तुमच्या प्रजनन क्षमतेवर गंभीर दुष्परिणाम (smoking effect on fertility) होतो आहे.

मुंबई, 10 मार्च : स्मोकिंगमुळे (Smoking) आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. धूम्रपान करणं आपल्या शरीरासाठी खूप घातक असतं. धूम्रपानामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होऊन गंभीर आजार होण्याची शक्यता खूप जास्त असते. फक्त धूम्रपान करणाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो असं नाही तर त्यांच्या आसपास असणाऱ्या लोकांच्या आरोग्यावरदेखील परिणाम होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण धुम्रपान केल्यामुळे प्रजनन क्षमतेवर आणि बाळाच्या जन्मावरदेखील (fertility and childbirth) गंभीर दुष्परिणाम होतो. नो स्मोकिंग डे 2021 च्या (No Smoking Day 2021) निमित्तानं हा परिणाम नेमका कसा होतो ते पाहुयात. धूम्रपानाचा परिणाम पुरुष आणि महिला दोघांच्याही प्रजनन क्षमतेवर होतो. धूम्रपानामुळे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी होते तर महिलांच्या गर्भधारणेवर परिणमाम होतो.  सिगारेटमध्ये कार्सिनोजेन असतं आणि याचा परिणाम पुरुषांच्या शुक्राणूंवर होतो. जास्त प्रमाणात धूम्रपान केल्यामुळे प्रजननासंदर्भात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. पण धूम्रपान सोडलं तर तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीत संबंधित व्यक्तीची शुक्राणूंची संख्या बऱ्यापैकी सुधारू शकते. हे वाचा - No Smoking Day 2021: धूम्रपान सोडणं शक्य होत नाही? फॉलो करा या टिप्स धूम्रपान केल्यामुळे फक्त पुरुषांनाच नाही तर महिलांनादेखील आरोग्याच्या समस्या उद्भवतात. जर एखादी महिला धूम्रपान करत असेल तर तिच्या गर्भधारणेवर परिणाम होतो. अशा महिलांची गर्भधारणेची शक्यता कमी होते. धूम्रपान केल्यामुळं तिच्या गर्भाशयावर परिणाम होतो.  प्रजनन सल्लागार डॉ. अपूर्वा सतीश अमरनाथ यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'धूम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये इन-विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) आणि इंट्रायूटेरिन इनसेमिशन (आययूआय) गरोदरपणाची शक्यता निम्म्यापेक्षा कमी होऊन जाते. जर या महिलेनं धूम्रपान करणं सोडलं तर काही कालावधीनंतर तिची प्रजननक्षमता वाढते, असंदेखील त्यांनी सांगितलं. हे वाचा - health tips हे हेल्दी फॅट्स असणारे 5 पदार्थ नक्की खा, अजिबात वाढणार नाही वजन धूम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये गर्भपात होण्याचा आणि मृत अर्भक जन्माला येण्याचा (stillbirth) धोका जास्त असतो. प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संदीप चढ्ढा यांनी सांगितलं, 'सिगारेटमध्ये 4000 विषारी घातक रसायने असतात. जी थेट आईच्या रक्तप्रवाहातून बाळाकडे जातात. याचा थेट परिणाम बाळावर होतो. यामुळे जन्मावेळी बाळाचं वजन कमी असणं, बाळाला श्वास घ्यायला त्रास होणं आणि वेळेआधी प्रसूती होणं यासारख्या समस्या निर्माण होतात.'
First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Smoking

पुढील बातम्या