मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Anti Diabetic: कडुलिंबाची पानं मधुमेहावर जालीम उपाय; इतक्या आजारांवर आहेत फायदेशीर

Anti Diabetic: कडुलिंबाची पानं मधुमेहावर जालीम उपाय; इतक्या आजारांवर आहेत फायदेशीर

चवीला कडू असलेली कडुलिंबाची पाने मधुमेहाची समस्या आटोक्यात ठेवण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या मते, यातील हायपोग्लायसेमिक रक्तातील साखर नियंत्रित करते.

चवीला कडू असलेली कडुलिंबाची पाने मधुमेहाची समस्या आटोक्यात ठेवण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या मते, यातील हायपोग्लायसेमिक रक्तातील साखर नियंत्रित करते.

चवीला कडू असलेली कडुलिंबाची पाने मधुमेहाची समस्या आटोक्यात ठेवण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या मते, यातील हायपोग्लायसेमिक रक्तातील साखर नियंत्रित करते.

    नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : वातावरण शुद्ध, चांगले ठेवणारा कडुलिंब आपल्या देशातील प्रत्येक घराबाहेर आरामात सापडेल. कडुलिंबाचे झाड जेवढे पर्यावरणासाठी महत्त्वाचे आहे, तेवढेच ते चांगल्या आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे. कडुनिंबाचा आयुर्वेदात अनेक वर्षांपासून वापर होत आहे. याशिवाय कडुलिंबाचा वापर अनेक घरगुती उपाय म्हणून केला जातो. बरेच लोक कडुलिंबाची पाने खातात, ज्यामुळे विविध आरोग्य फायदे मिळतात. याशिवाय कडुलिंबाच्या झाडाची सालदेखील विविध आजारांवर प्रभावी मानली जाते. कडुलिंब खाल्ल्याने मधुमेह तर आटोक्यात राहतोच, पण इतर फायदेही (Neem has Anti Diabetic property) होतात. मधुमेह नियंत्रणात राहील - स्टाइलक्रेसच्या माहितीनुसार, चवीला कडू असलेली कडुलिंबाची पाने मधुमेहाची समस्या आटोक्यात ठेवण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या मते, यातील हायपोग्लायसेमिक रक्तातील साखर नियंत्रित करते. मधुमेह किंवा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी कडुलिंब सर्वात फायदेशीर ठरू शकतो. आजकाल अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये कडुनिंबाचा वापर केला जातो. कडुलिंब हे त्वचेशी संबंधित समस्येवरही उपाय आहे. एकंदरीत कडुलिंबाला आयुर्वेदाचे वरदान म्हटले तर वावगे ठरणार नाही. कडुलिंबाची पाने खाण्याचे इतर फायदे - कडुलिंबाची पाने नियमित खाल्ल्याने संसर्गाचा धोका कमी होतो. श्वासोच्छवासाची समस्या असेल तर कडुलिंबाच्या पानांचे सेवन फायदेशीर ठरू शकते. कडुलिंबाच्या सालीचा अर्क गॅस्ट्रिक हायपर अॅसिडिटीचा त्रास कमी करण्यास मदत करतो. त्याचा अल्सरवरही चांगला परिणाम होतो. कडुलिंब तोंडाच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेतो. कडुलिंबामुळे उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहतो. कुष्ठरोगावरही कडुनिंबाचा अनेक प्रकारे उपाय आहे. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम मलेरियावर कडुलिंब हा उत्तम उपचार आहे. कडुलिंबामुळे पोटाचे आरोग्यही चांगले राहते. यकृताशी संबंधित काही समस्या असल्यास कडुलिंबाचा उपाय फायदेशीर ठरू शकतो. कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी कडुलिंबाचे नियमित सेवन फायदेशीर ठरू शकते. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Diabetes, Tips for diabetes

    पुढील बातम्या