मुंबई, 11 मार्च : एका फिल्ममध्ये जादूच्या झप्पीची कमाल तर तुम्ही पाहिलीच आहे. पण सध्या सोशल मीडियावर (socil media) एक असा व्हिडीओ व्हायरल (viral video) होतो आहे, ज्यामध्ये आईच्या गोड पापीचीही (mother's kiss) कमाल पाहायला मिळते. आईनं आपल्या बाळाला केलेल्या किसमुळे त्याच्यासोबत होणारी मोठी दुर्घटना टळली आहे. हा व्हिडीओ प्रत्येक पालकानं पाहायला हवा असाच आहे.
लहान मुलं खेळता खेळता तोंडात किंवा नाकात काही ना काही छोटी वस्तू टाकतात. अशावेळी पालक ती वस्तू काढण्याच्या नादात अनेकदा चुकीच्या पद्धतीचा वापर करतात ज्यामुळे ती वस्तू आणखी आत जाते आणि अशा ठिकाणी जाऊन अडकते जिथून ती सहजासहजी बाहेर निघणं अशक्य होतं. मग मुलांना रुग्णालयात नेऊन एन्डोस्कोपी किंवा सर्जरी करून ती वस्तू काढण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण एका आईनं एक सोपी अशी ट्रिक सांगितली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओत आई फक्त बाळाला किस करूनच त्याच्या नाकात अडकलेली वस्तू कशी बाहेर काढते ते तुम्हीच पाहा. या चिमुकल्याच्या नाकात एक वाटाणा अडकला आहे. त्यावेळी त्याची आई निक्की जर्कट्झ त्याला किस करते आणि त्याच्या नाकातून हा वाटाणा बाहेर काढते. निक्की ही टिनी हार्ट्स एज्युकेशन या संस्थेची सीईओ आहे. या संस्थेच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
हे वाचा - OMG! चक्क हवेत उडू लागली कासवं; दुर्मिळ VIDEO पाहण्याची संधी बिलकुल सोडू नका
निक्कीनं सांगितलं तिच्या मुलानं रात्री हा मटारचा दाणा नाकात घातला. काही सेकंद मी पॅनिकही झाले आणि नंतर मला ही टेक्निक आठवली. मुलाच्या उघड्या तोंडावर तुमचं तोंड ठेवून लॉक करू घ्या. ज्या नाकपुडीत वस्तू गेली नाही ती एक नाकपुडी बोटानं दाबून घ्या. तुमच्या तोंडानं मुलाच्या तोंडात हवा सोडा. थोड्या वेळातच बाळाच्या नाकात अडकलेली वस्तू बाहेर आली. यामुळे मला बाळाला घेऊन रुग्णालयात जाण्याचीही गरज पडली नाही.
हे वाचा - दगड खाणारे आजोबा! दररोज 250 ग्रॅम खडे खाऊन दूर केला हा आजार
टिनी हार्ट्सच्या मते, अशा प्रकरणात mother's kiss ही टेक्निक 60 टक्के यशस्वी ठरते आणइ यशस्वी नाही झाली तरी त्यामुळे किमान ती वस्तू थोडी तरी बाहेरच्या दिशेनं येते, दिसू लागते आणि वेगळ्या पद्धतीनं काढणंही सोपं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mother, Parents and child, Viral, Viral videos