मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Shocking! आईचं दूधही बाळासाठी खतरनाक? Breast Milk बाबत धक्कादायक माहिती समोर

Shocking! आईचं दूधही बाळासाठी खतरनाक? Breast Milk बाबत धक्कादायक माहिती समोर

आईच्या दुधात घातक रसायन.

आईच्या दुधात घातक रसायन.

उत्तर प्रदेशमधील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी आणि क्वीन मेरी हॉस्पिटलने ब्रेस्टमिल्कबाबत एक रिसर्च केला. या रिसर्चच्या निष्कर्षाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

अंजली सिंह राजपूत/लखनऊ, 18 जानेवारी : गाय, म्हैस यांचं दूध बाळाला पाजायचं की नाही?, फॉर्म्युला मिल्क बाळाला द्यायचं की नाही? याबाबत बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतात. पण आईचं दूध म्हटलं की त्याबाबत प्रश्नच उद्भवत नाही. आईचं दूध म्हणजे बाळासाठी अमृत असतं. नवजात बाळ पूर्णपणे आपल्या आईच्या दुधावरच अवलंबून असतं. पण आता याच ब्रेस्टमिल्कबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी आणि क्वीन मेरी हॉस्पिटलने ब्रेस्टमिल्कबाबत एक रिसर्च केला. डिपार्टमेट ऑफ बायोकेमिस्ट्रीच्या लॅबमध्ये हा रिसर्च झाला. या रिसर्चच्या निष्कर्षाने सर्वांनाच धक्का बसला आहे. आईच्या दुधात असं काही आढळून आलं की तज्ज्ञांनी हे दूधसुद्धा बाळासाठी खतरनाक ठरत असल्याचं म्हटलं आहे.

हे वाचा - Pregnancy Tips : तिशीनंतर हवं असेल बाळ तर लक्षात ठेवा या गोष्टी, प्रेग्नन्सीत येणार नाही अडचण

महिलांच्या ब्रेस्टमिल्कमध्येही कीटकनाशक आणि घातक रसायन सापडले आहेत. धक्कादायक म्हणजे शाकाहारी महिलांच्या तुलनेत मांसाहारी महिलांच्या दुधात 3.5 पट जास्त कीटकनशाक सापडले आहेत. नॉनव्हेजेटेरियन लोकांना चांगलं चिकन देण्याच्या नादात प्राण्यांना कित्येक प्रकारचे इंजेक्शन दिले जातात आणि त्यांचं वजन वाढवलं जातं.यामुळेच मांसाहार करणाऱ्या महिलांचया ब्रेस्ट मिल्कमध्ये कीटकनाशक जास्त असल्याचं आढळून आलं आहे.

केजीएमयूच्या बायोकेमस्ट्रीचे प्रमुख अब्बाल अली मेहदी म्हणाले, शेती आणि खाद्यपदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात खतरनाक रासायनिक पदार्थ आणि कीटकनशाक औषधांचा वापर केला जातो आहे. आईच्या दुधातही खतरनाक कीटकनाशकांची मात्रा आहे. नवजात बाळासाठी असं दूध खतरनाक आहे. जन्मानंतर बाळांना असं घातक रसायन मिळत असल्याने कमीत वयातच लोकांना विविध आजार होत आहेत.

हे वाचा - Pregnancy Tips : शरीरातील हे बदल सांगतात, तुम्ही सहज आई होऊ शकता की नाही

मेहदी यांनी यावर उपाय आणि बचावाचा मार्गही सांगितला आहे. मेहदी म्हणाले, महिलांनी जास्तीत जास्त हिरव्या भाज्या आणि फळं खावीत. फळं आणि भाज्या खाण्यापूर्वी त्या नीट स्वच्छ करून घ्याव्यात. शक्यतो त्यांच्या साली काढूनच ते खाण्याचा प्रयत्न करा. आहारात दररोज काही ना काहीतरी नवीन खात जा. हाच बचावाचा एकमात्र उफाय आहे.

इन्वायररनमेंटल रिसर्च जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. या संशोधनाला एक वर्षे लागली.  केजीएमयूमधील स्त्री आणि प्रसूतीरोग विभागाच्या डॉक्टर सुजाताही सहभागी होत्या.

First published:

Tags: Health, Lifestyle, Mother, Small baby