मराठी बातम्या /बातम्या /heatlh /मानसिक आरोग्य बिघडलेले जास्तीत-जास्त वयस्क लोक सर्व काही ठीक असल्याचं सांगतात- संशोधन

मानसिक आरोग्य बिघडलेले जास्तीत-जास्त वयस्क लोक सर्व काही ठीक असल्याचं सांगतात- संशोधन

लंडन वृत्तपत्र 'द मिरर' मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, मानसिक आरोग्याशी (adults mental problems) झगडणाऱ्या दोन तृतीयांश प्रौढांना सर्व काही ठीक आहे का? असे विचारले असता, त्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की, त्यांच्या आयुष्यात सर्व काही ठीक आहे.

लंडन वृत्तपत्र 'द मिरर' मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, मानसिक आरोग्याशी (adults mental problems) झगडणाऱ्या दोन तृतीयांश प्रौढांना सर्व काही ठीक आहे का? असे विचारले असता, त्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की, त्यांच्या आयुष्यात सर्व काही ठीक आहे.

लंडन वृत्तपत्र 'द मिरर' मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, मानसिक आरोग्याशी (adults mental problems) झगडणाऱ्या दोन तृतीयांश प्रौढांना सर्व काही ठीक आहे का? असे विचारले असता, त्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की, त्यांच्या आयुष्यात सर्व काही ठीक आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस अनेक प्रकारच्या ताण-तणावातून जातो. काहींना आर्थिक तणाव असतो, तर काही वैयक्तिक पातळीवर काही समस्या असतात, काहीजण आतल्या आत काही गोष्टींवरून घुसमटत असतात. सध्याच्या युगात बहुतांश लोक काही मानसिक समस्यांशाचा (mental health) सामना करत आहेत. पण ते याबाबत कोणाशीही चर्चा करत नाहीत, त्यामुळे समस्या वाढत जाते.

लंडन वृत्तपत्र 'द मिरर' मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, मानसिक आरोग्याशी (adults mental problems) झगडणाऱ्या दोन तृतीयांश प्रौढांना सर्व काही ठीक आहे का? असे विचारले असता, त्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की, त्यांच्या आयुष्यात सर्व काही ठीक आहे. 2000 प्रौढांच्या या अभ्यासात असे आढळून आले की 10 पैकी 4 लोकांना असे वाटते की, प्रश्नकर्ता फक्त लहानशी चर्चा करत आहे आणि खरेतर अशा व्यक्तींना मानसिक आरोग्याशी संबंधित अडचणींबद्दल काहीही ऐकायचे नसते.

अभ्यासात असे दिसून आले की, जे लोक मोकळेपणाने बोलतात आणि अधिक प्रामाणिक उत्तर देतात त्यातील एक चतुर्थांश लोक खूप लाजरे वाटतात, तर 17 टक्के लोक उघडपणे बोललो तर इतर लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतील याची चिंता करतात. या व्यतिरिक्त त्यांच्या मनात आणखी एक भीती देखील असते की, आपण दिलेल्या उत्तरामुळे समोरच्या व्यक्तीला असे वाटेल की याला प्रश्न विचारला नसता तर बरे झाले असते.

अभ्यास का केला गेला?

खरं तर, 66 टक्के लोक आर्थिक समस्यांमुळे मानसिक आरोग्याशी झगडत आहेत हे समोर आल्यानंतर, स्पॅनिश वित्तीय सेवा कंपनी सँटॅंडरने एक संशोधन सुरू केले. जेणेकरून लोकांना त्यांच्या आनंदाबद्दल बोलण्यास प्रोत्साहित करता येईल. खरंच, यूकेची फर्लो योजना (कोरोनाच्या काळात ज्या कर्मचाऱ्यांना डिस्चार्ज देण्यात आले होते) संपल्यानंतर, आता बेरोजगारीला सामोरे जाणाऱ्या फरलो कामगारांसह लोकांना त्रास होत राहण्याची भीती वाढत आहे. मानसिक आरोग्य समस्यांना तोंड देणाऱ्या लोकांशी "योग्य संभाषण" करण्यात मदत करण्यासाठी बँकेने मानसिक आरोग्य चॅरिटी, माइंड (MIND) सह सँटँडर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी सहकार्य केले आहे.

हे वाचा - इतरांचं WhatsApp Status तर पाहाल पण Seen लिस्टमध्ये दिसणार नाही तुमचं नाव, पाहा काय आहे Trick

तज्ञांचे म्हणणे

सॅनटँडरचे आर्थिक सहाय्य संचालक जोसी क्लॅफम म्हणतात, "आपल्यापैकी बरेच जण आपल्याला कसे वाटते, याबद्दल इतरांना सांगून त्याचे ओझे टाकू इच्छित नाहीत. मग आम्हाला काळजी वाटते की आपण ते कसे कमी करावे? जर आपण मानसिक आरोग्य संघर्षाबद्दल प्रामाणिक आहोत, तर त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाऊ शकते. आर्थिक ताण हे अनेकदा मानसिक त्रासाचे कारण असू शकते आणि काही लोकांसाठी गेल्या अठरा महिन्यांची आव्हाने संपलेली नाहीत.

अभ्यासात काय घडले

अभ्यासात असे आढळून आले आहे की, "तुम्ही ठीक आहात का?" हा प्रश्न विचारला असता, लोकांना मानसिक आरोग्यापेक्षा त्यांना असलेल्या शारीरिक समस्यांबद्दल माहिती दिल्याची 3 पट जास्त उदाहरणे होती. संशोधनात असे दिसून आले की 69 टक्के लोकांना असा प्रश्न विचारल्यावर त्यावर प्रामाणिकपणे उत्तर देऊ वाटले. तर 79 लोकांना हा प्रश्न समजलाच नाही तर ते पुन्हा विचारतील.

हे वाचा -Google New Feature: या खास फीचरद्वारे Lock करता येणार फोटो-व्हिडीओ, स्क्रिनशॉटही घेता येणार नाही

मानसिक आरोग्याबद्दल बोलणे कठीण

एम्मा मामो, MIND मधील वर्कप्लेस वेलबीइंग प्रमुख (एम्मा मामो) म्हणाले, “आम्हाला माहित आहे की पैसा आणि मानसिक आरोग्य यांच्यात एक मजबूत संबंध आहे. काही लोकांचे जीवन महामारी आणि आर्थिक मंदी या दोन्हीमुळे वाईट रीतीने प्रभावित झाले आहे, ज्याचे परिणाम येणाऱ्या काळासाठी जाणवण्याची शक्यता आहे. हे संशोधन दर्शविते की लोकांना अजूनही त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल बोलणे कठीण वाटते, परंतु, आपल्याला अशा महत्त्वपूर्ण बाबीवर बोलणे सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे.

ते पुढे म्हणाले, तुम्हाला तुमच्या पैशाबद्दल, तुमच्या मानसिक आरोग्याबद्दल किंवा दोहोंबद्दल माहिती आणि समर्थन हवे असेल तर mind.org.uk/money या संकेतस्थळाला भेट द्या.

First published:

Tags: Health Tips, Mental health