Home /News /heatlh /

Monkeypox Virus : सेक्समुळे जलद पसरला मंकीपॉक्स व्हायरस, WHO ने काय इशारा दिला?

Monkeypox Virus : सेक्समुळे जलद पसरला मंकीपॉक्स व्हायरस, WHO ने काय इशारा दिला?

कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) कहरानंतर आता कोणत्याही नव्या व्हायरसचं किंवा आजाराचं नाव ऐकलं तरी चिंतेचं वातावरण निर्माण होतं. आता एका नव्या व्हायरसने डोकं वर काढलं आहे. सध्या मंकीपॉक्स (Monkeypox Virus) या नव्या व्हायरसचा धोका वाढतो आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 24 मे : कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) कहरानंतर आता कोणत्याही नव्या व्हायरसचं किंवा आजाराचं नाव ऐकलं तरी चिंतेचं वातावरण निर्माण होतं. कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं. कोरोनासोबत लढण्यासाठी आपण तयार नव्हतो; मात्र आता सर्वच देश नवनव्या आव्हानांसाठी तयारी करत आहेत. आणखी एखादा व्हायरस येऊन पुन्हा अशी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सर्व जण प्रयत्नशील आहेत. असं असलं, तरी आता एका नव्या व्हायरसने डोकं वर काढलं आहे. सध्या मंकीपॉक्स (Monkeypox Virus) या नव्या व्हायरसचा धोका वाढतो आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, यूके आणि यूएसमध्ये मंकीपॉक्सच्या केसेस (Monkeypox Cases) नोंदवल्या गेल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्स व्हायरसबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मंकीपॉक्सचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यामुळे यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने (UK Health Security Agency) समलैंगिक व्यक्तींना इशारा दिला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 7 जणांना संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. 7 पैकी 4 रुग्ण गे (Gay) आणि बायसेक्शुअल (Bi-sexual) असल्याचं आढळून आलं आहे. काय आहे मंकीपॉक्स व्हायरस? हा आजार मंकीपॉक्स नावाच्या व्हायरसमुळे पसरतो. सीडीसी (US Health Agency CDC) या यूएस हेल्थ एजन्सीच्या म्हणण्यानुसार, 1958 मध्ये माकडांच्या समूहात या व्हायरसचा शोध लागला होता. त्यामुळे त्याला मंकीपॉक्स असं संबोधलं जातं. मानवांमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग पहिल्यांदा 1970 मध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये झाल्याचं नोंदवलं गेलं. काय आहेत मंकीपॉक्सची लक्षणं? युरोपीय प्रदेशातल्या यूएन हेल्थ एजन्सीचे संचालक डॉ. हंस क्लुगे (Director Of The UN Health Agency Dr. Hans Kluge) यांच्या मते, या व्हायरसचा संसर्ग झाल्यास ताप, त्वचेवर पुरळ येणे आणि सुजलेल्या लिम्फ नोड्स अशी लक्षणं दिसतात. बऱ्याचदा शरीरात वेदना होतात आणि त्वचेवर फोड येतात. शरीरावर लालसर पुरळही येतात. बहुतेकसे संसर्गग्रस्त रुग्ण कोणत्याही उपचारांशिवाय बरे होतात. स्पेन आणि बेल्जियममध्ये आयोजित दोन रेव्ह पार्ट्यांमध्ये समलैंगिक आणि इतर व्यक्तींमधल्या लैंगिक क्रियांमुळे हा आजार पसरल्याचं डब्ल्यूएचओचे तज्ज्ञ हेमन (WHO Expert Heman) यांचं म्हणणं आहे. आफ्रिकेतला स्थानिक आजार असलेला मंकीपॉक्स त्यापूर्वी आफ्रिकेबाहेर पसरला नव्हता. हेमन म्हणाले, "मंकीपॉक्स या आजाराचा संसर्ग तेव्हा पसरतो, जेव्हा एखादी सामान्य व्यक्ती संसर्गग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात येते. तसंच लैंगिक संबंधांमुळे या रोगाचा प्रसार वाढतो.'
First published:

पुढील बातम्या