मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

चिंताजनक! काही तासांतच देशात Monkeypox रुग्णांची संख्या दुप्पट; आरोग्यमंत्र्यांनीही दिली महत्त्वाची माहिती

चिंताजनक! काही तासांतच देशात Monkeypox रुग्णांची संख्या दुप्पट; आरोग्यमंत्र्यांनीही दिली महत्त्वाची माहिती

दिल्ली आणि केरळमध्ये मंकीपॉक्सचे आणखी रुग्ण सापडल्यानंतर देशातील एकूण मंकीपॉक्स रुग्णांची संख्या आता 8 वर पोहोचली आहे.

दिल्ली आणि केरळमध्ये मंकीपॉक्सचे आणखी रुग्ण सापडल्यानंतर देशातील एकूण मंकीपॉक्स रुग्णांची संख्या आता 8 वर पोहोचली आहे.

दिल्ली आणि केरळमध्ये मंकीपॉक्सचे आणखी रुग्ण सापडल्यानंतर देशातील एकूण मंकीपॉक्स रुग्णांची संख्या आता 8 वर पोहोचली आहे.

    नवी दिल्ली, 02 ऑगस्ट : कोरोनानंतर आता देशात मंकीपॉक्सही थैमान घालतो की काय अशीच भीती आता निर्माण झाली आहे. कारण अवघ्या 24 तासांत देशातील मंकीपॉक्स रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. केरळ आणि दिल्लीत मंकीपॉक्सचे आणखी रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देशातील एकूण मंकीपॉक्स रुग्णांची संख्या आता 8 वर पोहोचली आहे. भारतात 14 जुलैला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर कालपर्यंत (01 ऑगस्ट) देशात मंकीपॉक्सचे फक्त 4 रुग्ण होते. त्यापैकी तीन केरळ आणि एक दिल्लीत होता. पण अवघ्या काही तासांत हा आकडा 8 वर पोहोचला आहे. आज (02 ऑगस्ट) दिल्लीत आणखी एक रुग्ण सापडला आहे. दिल्लीत राहणाऱ्या आफ्रिकन नागरिकाला मंकीपॉक्स असल्याचं निदान झालं आहे. तीव्र ताप आणि त्वचेवर जखमा आढळल्यानंत त्याला एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर दिल्लीत कालही एक रुग्ण सापडला आहे.  त्यामुळे दिल्लीतील संख्या आता तीन झाली आहे. हे वाचा - Monkeypox : त्वचेवर आलेले फोड मंकीपॉक्स आणि चिकनपॉक्स; कसा ओळखायचा फरक? तर केरळमध्येही सोमवारी मंकीपॉक्सचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. दुबईहून परतलेल्या एका व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणं आढळली आहे. 30 वर्षांची ही व्यक्ती 27 जुलैला यूएईहून कोझिकोडमध्ये आली. त्याच्यात लक्षणं दिसल्यानंतर मलप्पुरममधील मंजरी मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आलं.  तर कालच मंकीपॉक्समुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अशा एकूण 5 रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान देशातील मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रकरणाबाबत संसदेत बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री  मनसुख मंडाविया म्हणाले, की या व्हायरलसा घाबरण्याची गरज नाही कारण हा नवा आजार नाही. पण खबरदारी घेण्याची गरज आहे.  राज्यसभेत ते म्हणाले, "मंकीपॉक्स व्हायरस कोरोनासारखा वेगाने पसरत नाही कारण हा संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आल्यानेच होतो. मंकीपॉक्स हा भारत आणि जगात नवा आजार नाही. 1970 सालानंतर जगातील बहुतेक प्रकरणं आफ्रिकेत दिसून आली आहेत" हे वाचा - बोअरवेल, विहिरीतील पाणी पित असाल तर सावधान! राज्यसभेत केंद्र सरकारची धक्कादायक कबुली "जेव्हा जगात मंकीपॉक्सची प्रकरणं समोर आली तेव्हाच भारताने तयारी सुरू केली. केरळात पहिला रुग्ण सापडण्याआधीच आम्ही सर्व राज्यांना गाईडलाइन्स दिल्या होत्या. आंतराराष्ट्रीय स्तरावरही सर्व सरकारना प्रवाशांचे स्क्रिनिंग रिपोर्ट आम्हाला पाठवण्याबाबत सांगितलं आहे. आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. कोरोना महासाथीच्या अनुभवानुसार आम्ही काम करत आहोत", असंही ते म्हणाले.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Virus

    पुढील बातम्या