मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Monkeypox : नवं संकट! WHO नेही घेतला धसका; जगाला अलर्ट करत तातडीने केली मोठी घोषणा

Monkeypox : नवं संकट! WHO नेही घेतला धसका; जगाला अलर्ट करत तातडीने केली मोठी घोषणा

मंकीपॉक्सची वाढती प्रकरणं पाहता डब्ल्यूएचओने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.

मंकीपॉक्सची वाढती प्रकरणं पाहता डब्ल्यूएचओने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.

मंकीपॉक्सची वाढती प्रकरणं पाहता डब्ल्यूएचओने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.

  • Published by:  Priya Lad
जिनीव्हा, 23 जुलै : जगभरात कोरोना आधीच थैमान घालतो आहे. त्यात आता मंकीपॉक्सचाही प्रकोप झाला आहे. जगभरातील बहुतेक देशांमध्ये हा व्हायरस घुसला आहे. भारतातही या व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता जागतिक आरोग्य संघटनेनेही याचा धसका घेतला आहे. मंकीपॉक्सची वाढती प्रकरणं पाहता डब्ल्यूएचओने मोठी घोषणा केली आहे. या आजाराला ग्लोबल पब्लिक हेल्थ एमर्जन्सी घोषित केलं आहे. जगातील 60 देशांमध्ये मंकीपॉक्सने हातपाय पसरले आहेत. त्याचा वेगाने होणारा प्रसार पाहता जगाला याचा मोठा धोका असल्याचं सांगत  WHO ने सर्वांना अलर्ट केलं आहे. WHO चे टेड्रोस एडनॉम घेब्येयियस यांनी जिनिव्हातील पत्रकार परिषदेत या आजाराला ग्लोबल पब्लिक हेल्थ एमर्जन्सी घोषित केलं. ते म्हणाले, वेगाने पसरणारा मंकीपॉक्सचा प्रकोप जगाच्या आरोग्यावर संकट दर्शवतो आहे. मंकीपॉक्सबाबत आता आंतराराष्ट्रीय स्तरावर कार्य करण्याची गरज आहे. यासाठी लस आणि उपचारात जागतिकरित्या प्रयत्न करण्याची गरज आहे. Monkeypoxmeter.com च्या डेटानुसार, 76 देशांमध्ये याचे रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक फटका युरोपमध्ये बसला आहे. त्याच वेळी, या रोगाने प्रभावित शीर्ष 10 देशांमध्ये ब्रिटन, स्पेन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा, नेदरलँड्स, इटली आणि बेल्जियम यांचा समावेश आहे. या वर्षात 60 पेक्षा जास्त देशात मंकीपॉक्सचे 16,000 पेक्षा जास्त प्रकरणं समोर आली आहे. आफ्रिकेत या आजारामुळे 5 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. भारतात मंकीपॉक्सचे 3 रुग्ण देशातील मंकीपॉक्सचे तिन्ही रुग्ण केरळमध्ये आहेत. कोल्लममध्ये 14 जुलैला मंकीपॉक्सचं पहिलं प्रकरण समोर आलं. हाच भारतातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण.  त्याला तीव्र ताप होता आणि त्याच्या शरीरावर चकत्या होत्या. 12 जुलैला तो यूएईहून भारतात आला. यूएईमध्ये एका मंकीपॉक्स संक्रमित रुग्णाच्या संपर्कात तो आला होता. त्यानंतर 18 जुलैला कन्नूररमध्ये दुसरा रुग्ण आढळला. 31 वर्षाचा हा रुग्णही दुबईतून आला होता.  13 जुलैला तो दुबईहून परतला आणि त्यानंतर हळूहळू त्याच्यात लक्षणं दिसू लागली. त्याच्यातील लक्षणंही पहिल्या रुग्णासारखीच होती. तर 22 जुलैला आढळलेला मलाप्पुरमधील तिसरा रुग्णही यूएईमधून परतला आहे. 6 जुलैला तो यूएईहून भारतात आला, 13 जुलैला त्याच्यात लक्षणं दिसू लागली. हे वाचा - Monkeypox एड्ससारखा लैंगिक आजार आहे? संसर्गजन्य आजाराच्या तज्ज्ञांनी काय सांगितलं वाचा मंकीपॉक्सचा झपाट्याने प्रसार होत असल्याचे पाहून केंद्र सरकारही सावध झाले आहे. पहिला रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांवर देखरेख आणि उपचार यांचा समावेश आहे. परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांना आजारी लोकांच्या संपर्कात येणे टाळावे. त्यांनी जिवंत किंवा मृत वन्य प्राणी आणि उंदीर, खार, माकडे यांच्या संपर्कात येणे टाळावे. प्रवाशांना वन्य प्राण्यांचे मांस न खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आफ्रिकेतील प्राण्यांपासून बनविलेले क्रीम, लोशन आणि पावडर वापरू नका. आजारी लोक किंवा संक्रमित प्राण्यांच्या संपर्कातील कपड्यांपासून दूर रहा. हे वाचा - तुमच्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये मंकीपॉक्स कव्हर होईल का? तज्ज्ञांनी दिलंय उत्तर जे लोक गेल्या 21 दिवसांत मंकीपॉक्सने बाधित देशांमध्ये प्रवास करून परतले आहेत आणि त्यांना या आजाराची लक्षणे आहेत त्यांना संशयित रुग्णांच्या यादीत समाविष्ट केले जाईल. शरीरावर पुरळ आलं असेल, खूप ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, अशक्तपणा आणि लिम्फ नोड्स सुजणे ही लक्षणे आहेत. संशयित रुग्ण कोणत्याही वयाचा किंवा लिंगाचा असू शकतो.
First published:

Tags: Health, Lifestyle

पुढील बातम्या