मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Alert! कोरोनासोबत आणखी एका Virus चा 'ताप'; Monkey Fever ने पुन्हा डोकं वर काढलं

Alert! कोरोनासोबत आणखी एका Virus चा 'ताप'; Monkey Fever ने पुन्हा डोकं वर काढलं

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

कोरोनाच्या संकटात आणखी एका आजाराचा एक रुग्ण सापडल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तिरुवनंतपुरम, 10 फेब्रुवारी : भारतात कोरोनाव्हायरसचं (Coronavirus in India) संकट अद्याप संपलं नाही तोच या वर्षात आता आणखी एका आजाराचा ताप आला आहे. भारतातील कोरोनाचं सर्वात पहिलं प्रकरण ज्या केरळमध्ये सापडलं त्याच केरळमध्ये या आजाराचा रुग्णही सापडला आहे. तापाचं लक्षण असलेल्या या आजाराने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. या वर्षातील हे पहिलं प्रकरण आहे.

वायनाड जिल्ह्यातील थिरुन्नेल्ली ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या पनवेली आदिवासी वसाहतीतील एका 24 वर्षीय तरुणाला ताप आला आहे. हा ताप कोरोनाचा नाही तर दुसऱ्याच आजाराचा आहे. या तरुणाला क्यासनुर फॉरेस्ट डिजीज (Kyasanur Forest Disease - KFD) असल्याचं निदान झालं आहे. ज्याला मंकी फिव्हर (Monkey Fever) म्हणजेच माकडताप म्हणूनही ओळखलं जातं. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

हे वाचा - 56 वर्षीय व्यक्ती 14 महिन्यांत 78 वेळा Corona Positive; डॉक्टरांनी सांगितलं कारण

जिल्ह्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सकीना यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, आरोग्य अधिकाऱ्यांनी आधीच सिझनल फिव्हरबाबत अलर्ट जारी केला होता आणि स्थानिक लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं होतं. मंकी फिव्हर झालेल्या या तरुणाला मनंथवाडी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. यानंतर आतापर्यंत मंकी फिव्हरचं आणखी दुसरं प्रकरण समोर आलं नाही.

हे वाचा - बापरे! कोरोना संसर्गानंतर फुटला व्यक्तीचा Private part; भयंकर कोरोना साइड इफेक्ट

केरळमधील मंकी फिव्हरचं हे पहिलं प्रकरण आहे.  या आजाराचा व्हायरस हा फ्लॅव्हिव्हिराइड व्हायरसपैकी (Flaviviridae Virus) आहे.  ज्यामुळे येलो फिव्हर आणि डेंग्यू फिव्हर होतो. हा आजार माकडांपासून माणसांमध्ये पसरू शकतो. सुरुवातीला अंगदुखी, ताप, सांधेदुखी, ताप गेला तरी सांधेदुखी कायम राहते, अशक्तपणा अशी लक्षणं माकडतापात दिसून येतात.

First published:
top videos

    Tags: Disease symptoms, Health, Lifestyle, Serious diseases, Virus