मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

कोरोनानंतर Monkeypox ची महासाथ? पुण्यातून सर्वात धक्कादायक अपडेट

कोरोनानंतर Monkeypox ची महासाथ? पुण्यातून सर्वात धक्कादायक अपडेट

भारतात मंकीपॉक्सचे 3 सब-क्लस्टर. (प्रतीकात्मक फोटो)

भारतात मंकीपॉक्सचे 3 सब-क्लस्टर. (प्रतीकात्मक फोटो)

ICMR आणि पुणे NIV ने मंकीपॉक्सबाबत अभ्यास केला त्याचा नवा रिपोर्ट जारी करण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Priya Lad

पुणे, 18 सप्टेंबर : कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही. त्यात मंकीपॉक्सचीही प्रकरणं समोर आली आहेत. मंकीपॉक्स रुग्णांची संख्या वाढली असताना आता याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंकीपॉक्सबाबत पुण्यात अशी महत्त्वाची अपडेट मिळाली आहे, ज्यामुळे आता कोरोनानंतर मंकीपॉक्सची महासाथ येते की काय अशी भीती वाटू लागली आहे. त्यामुळे आता प्रशासन यंत्रणाही सतर्क झाली आहे.

भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे एकूण 13 रुग्ण आहेत. त्यापैकी 8 दिल्ली आणि 5 केरळात आहेत. आता मंकीपॉक्सबाबत नुकताच एक अहवाल जारी करण्यात आला आहे. इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्च आणि पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने हा अभ्यास केला आहे. देशातील मंकीपॉक्स व्हायरसच्या नमुन्यांचं जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं. त्यानुसार मोठी माहिती मिळाली आहे.

ताज्या रिपोर्टनुसार मंकीपॉक्सचे 3 सब-क्लस्टर आहेत. A.2 मंकीपॉक्सचे दोन भागात विभागला गेला आहे. त्याचा A.2 MPXV चे 3 सब क्लस्टर झाले आहेत, असं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यापैकी एक केरळात तर दोन दिल्लीत सापडले आहेत.  मंकीपॉक्सचा पहिला क्लस्टर केरळ (N5) आणि दिल्लीत (N3) आहे. हे दोन्ही USA-2022 ON6740511 शी संबंधित आहे. दुसरा सबक्लस्टर N3 दिल्लीत आहे, जो USA-2022 ON6754381 शी संबंधित आहेत. तर तिसरा सब-क्लस्टर ब्रिटन, अमेरिका आणि थायलँड कॅटेगिरीतील आहे.

हे वाचा - Monkeypox Virus: कोरोनानंतर जगावर 'मंकीपॉक्स'चा धोका! जाणून घ्या संसर्गजन्य आजाराची लक्षणे आणि उपचार

रिपोर्टनुसार जुलै-ऑगस्ट 2022 दरम्यान 18 राज्यातील 96 संशयित रुग्णांचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये पाठवण्यात आले होते. त्यापैकी 10 नमुने पॉझिटिव्ह आढळले. दिल्ली आणि केरळमध्ये प्रत्येकी पाच रुग्ण आहेत. दिल्लीतील रुग्णांची कोणतीही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही. केरळमधील रुग्ण यूएईहून भारतात आले होते.

एएनआयच्या वृत्तानुसार  पुण्यातील ICMR-NIV चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रयाग यादव म्हणाले, जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये सापडलेले केरळ आणि दिल्लीतील अनुक्रमे पाचही रुग्णांच्या नमुन्याचं जीनोम सीक्वेन्सिंग झालं आहे. भारतातील 90 ते 99 टक्के जीनोम  A.2 ग्रुपशी संबंधित आहे. हा IIb जोडलेला आहे.

हे वाचा - Monkeypox म्यूटेशनचा धोका किती, लक्षण दिसल्यावर काय करावं? कसा होतो संसर्ग, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) जगभरात मंकीपॉक्सबाबत हेल्थ एमर्जन्सी घोषित केली आहे. डब्ल्यएचओनेही दिलेल्या माहितीनुसार त्वचेला स्पर्श केल्याने हा आजार पसरतो. संक्रमित व्यक्तीच्या वस्तू वापरल्यानेही हा आजार पसरू शकतो.

First published:

Tags: Health, Lifestyle, Virus