मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Measles vaccination in Maharashtra : पालकांनो तुमच्या मुलांना गोवरपासून वाचवा; लक्षात ठेवा 'ही' तारीख, चुकूनही मिस करू नका

Measles vaccination in Maharashtra : पालकांनो तुमच्या मुलांना गोवरपासून वाचवा; लक्षात ठेवा 'ही' तारीख, चुकूनही मिस करू नका

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

राज्यातील गोवरचं वाढतं प्रमाण पाहता राज्य सरकारने तातडीने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Priya Lad

मुंबई, 07 डिसेंबर : कोरोनानंतर राज्यात गोवरचं थैमान आहे. राज्यातील गोवरचं वाढतं प्रमाण पाहता राज्य सरकारने गोवरला नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेतच. गोवर संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य कृती दलाने तातडीने काही पावलं उचलली आहेत. त्यातील पहिलं म्हणजे लसीकरण. लसीकरणावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. राज्यातील गोवरला आवर घालण्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.

मुंबईनंतर ठाणे, नाशिक आणि राज्यात अनेक ठिकाणी गोवरचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे बालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता बालकांसाठी गोवर लसीकरण मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व बालकांचे 26 जानेवारीपर्यंत लसीकरण करण्याचा निर्धार राज्य कृती दलाने केला आहे. त्यानुसार कृती दलाने आराखडा तयार केला आहे. कृती दलाने केलेल्या शिफारशीनुसार राज्यात गोवर-रुबेलासाठी विशेष लसीकरण अभियान राबवण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. ज्या मुलांनी लशीची एकही मात्रा घेतलेली नाही, त्यांना सर्वात आधी लस दिली जाणार आहे. 9 महिने ते 5 वर्षे या वयोगटातील सर्व बालकांचे लसीकरण केलं जाणार आहे.

हे वाचा - कोरोनाबाबत 2 वर्षांनी मोठं सत्य समोर; चीनसह काम करणाऱ्या शास्त्रज्ञाचाच धक्कादायक खुलासा

राज्यात राबविण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला विशेष लसीकरण अभियानांतर्गत राज्यातील सर्व बालकांचे लसीकरण होण्याच्या दृष्टीने त्यांची नोंदणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. उद्रेक झालेल्या भागातील सर्व बालकांची मोजणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील अडीच लाख बालकांचे लसीकरण झाले आहे. मोजणी होणाऱ्या बालकांसाठी 15 ते 25 डिसेंबरपर्यंत लशीची पहिली मात्रा देण्यात येणार आहे. चार आठवड्यानंतर लशीची दुसरी मात्रा देण्याचे नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे 15 ते 25 जानेवारीपर्यंत लशीची दुसरी मात्रा देऊन 26 जानेवारीपर्यंत लसीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती राज्य कृती दलाने दिली आहे.

मुंबईमध्ये नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील एकूण 1,91,067 बालकांपैकी 14,285 बालकांना गोवर रुबेला लशीची विशेष मात्रा देण्यात आली आहे. लसीकरणाचे हे प्रमाण साडेसात टक्के आहे. या विशेष मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता आरोग्य विभागाने गृहीत धरली होती. मात्र अतिरिक्त मात्रा देण्यासंदर्भात पालकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. 15 आरोग्यकेंद्रांतील ज्या ठिकाणी नऊ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांमध्ये गोवरबाधित रुग्णांचे प्रमाणे दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे, अशा केंद्रांतील एकूण 3,752 बालकांपैकी 725 बालकांना लशीची अतिरिक्त मात्रा देण्यात आली आहे.

हे वाचा - महाराष्ट्रातील स्त्रियांच्या आरोग्याची स्थिती चिंताजनक; 100 पैकी दोन महिलांना आहे अ‍ॅनिमिया

राज्यात गोवरचे 13,500 पेक्षा संशयित रुग्ण आहेत. तर 859 एकूण रुग्ण आहेत. सर्वाधिक 420 रुग्ण मुंबईत आहेत.

First published:

Tags: Health, Lifestyle