तुम्ही शूजसोबत सॉक्स वापरत नाहीत? मग ही बातमी वाचाच

तुम्ही शूजसोबत सॉक्स वापरत नाहीत? मग ही बातमी वाचाच

मोजे खूप पातळ असले, तरी पायाला पॅडिंग किंवा कुशनिंग (Cushioning) देण्याचं काम करतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : शूज (Shoes) अनेक जण वापरतात; मात्र प्रत्येकाची शूज वापरण्याची आपली अशी एक पद्धत असते. काही जण स्पोर्ट्स शूज (Sports Shoes) वापरतात, काही जण ऑफिशियल, तर काही जण कॅनव्हासचे शूज वापरतात. काही जण शूजमध्ये मोजे अर्थात सॉक्स वापरतात, तर काही जण मात्र सॉक्सशिवायच शूज वापरतात; मात्र शूजमध्ये सॉक्स (Socks) वापरणं ही पायांच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगली सवय आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.

आपल्या शरीराच्या भागांमध्ये घाम खूप जास्त येतो. त्या भागांमध्ये तळपायांचा समावेश होतो. बूट घातल्यानंतर घाम आणखी जास्त येतो. बराच काळ घाम तसाच राहिला आणि नव्याने घाम येत राहिला, तर वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणूंची आणि बुरशीची वाढ तिथे होते. साहजिकच पायालाही त्याचा संसर्ग होतो. त्यामुळे पायाला जखमा होऊ शकतात. पाय फुटू शकतात. पायाला झिणझिण्या येऊ शकतात. मोजे घातले, तर तळपायाला येणारा घाम शोषून घेतात. त्यामुळे साहजिकच बॅक्टेरिया (Bacteria) आणि फंगसची (Fungus) वाढ होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे पुढचं सगळं दुष्टचक्र थांबतं. कारण पायांचं थेट शूजशी होणारं घर्षण थांबतं. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.

मोजे खूप पातळ असले, तरी पायाला पॅडिंग किंवा कुशनिंग (Cushioning) देण्याचं काम करतात. त्यामुळे पायांना आरामही मिळतो. त्यामुळे पायाला अल्सरसारख्या जखमा होण्याची शक्यताही खूप कमी होते.

OMG! लहान मुलांना दिलं जातंय कोंबड्याच्या रक्ताचं इंजेक्शन; कोरोना संकटात चीनमध्ये विचित्र प्रयोग

अर्थात, मोजे वापरताना अनेक गोष्टींवर लक्षही ठेवलं पाहिजे. मोजे चांगल्या दर्जाचे हवेत. त्यासाठी चांगल्या दर्जाचं कापडच वापरलेलं हवं. सिंथेटिक कापडापेक्षाही सुती कापडाचे मोजे वापरावेत. दररोज किंवा किमान एक दिवसाआड तरी मोजे धुणं आवश्यक आहे. नाही तर संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोजे काढल्यानंतर त्याचे वळ पायावर उठले असल्याचं दिसत असेल, तर ते थोडे सैल करावेत किंवा नवे मोजे वापरावेत. बराच काळ शूज घालून राहावं लागणार असेल, तर काही तासांनी शूज आणि मोजे काढून पाय मोकळ्या हवेत ठेवणं गरजेचं आहे.

मोजे केवळ उन्हाळ्यातच नव्हे, तर हिवाळ्यातही वापरणं उपयोगाचं आहे. कारण थंडीपासून बचाव होतो आणि तळपाय उबदार राहतात. उन्हाळ्याच्या अति उष्ण दिवसांत मोजे वापरले नाही, तरी चालू शकतं. तसंच, सँडल किंवा उघड्या चपला वापरत असाल, तरीही मोजे वापरले नाही तरी चालतात. बंदिस्त चपला, शूज आदींमध्ये मात्र मोजे वापरण्याची सवय फायदेशीरच आहे.

First published: September 15, 2021, 5:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या