Home /News /heatlh /

'या' गोष्टीवर महिलांना मोकळेपणानं बोलण्याची वाटते भीती

'या' गोष्टीवर महिलांना मोकळेपणानं बोलण्याची वाटते भीती

Urinary incontinence

Urinary incontinence

कुटुंब व्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी सर्वांत मोठी जबाबदारी स्त्रिया पार पाडतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या लहानात लहान गोष्टींची काळजी स्त्रिया घेतात. मात्र, कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडताना त्या स्वत:च्या आरोग्याकडे (Female Health) सर्रासपणे दुर्लक्ष करतात. आपल्या देशातील स्त्रिया आजही गायनॅकॉलॉजिस्टकडे (Gynecologist) म्हणजेच स्त्रीरोग तज्ज्ञांकडं जाणं टाळतात. स्त्रियांना पीरियड्सशिवाय (Periods) इतर अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, ज्याबद्दल त्या उघडपणे बोलण्याचं टाळतात. युरिनरी लीकेज (Urinary Leakage) ही अशीच एक समस्या आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 9 मार्च: कुटुंब व्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी सर्वांत मोठी जबाबदारी स्त्रिया पार पाडतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या लहानात लहान गोष्टींची काळजी स्त्रिया घेतात. मात्र, कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडताना त्या स्वत:च्या आरोग्याकडे (Female Health) सर्रासपणे दुर्लक्ष करतात. आपल्या देशातील स्त्रिया आजही गायनॅकॉलॉजिस्टकडे (Gynecologist) म्हणजेच स्त्रीरोग तज्ज्ञांकडं जाणं टाळतात. स्त्रियांना पीरियड्सशिवाय (Periods) इतर अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, ज्याबद्दल त्या उघडपणे बोलण्याचं टाळतात. युरिनरी लीकेज (Urinary Leakage) ही अशीच एक समस्या आहे. अनेकदा असं घडतं की धावताना, शिंकताना किंवा खोकताना महिलांना युरिन लीकेजची समस्या भेडसावते. त्यांनी ते थांबवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही पँटमध्ये थोडंस युरिन लीक होतंच. कधीकधी यामुळे खूपच लाज वाटते. बहुतेक महिला या समस्येबद्दल बोलणं टाळतात. युरिनरी लीकेज म्हणजेच लघवीची गळती ही केवळ वाढत्या वयोमानानुसार उद्भवणारी समस्या नाही. महिलांना कोणत्याही वयात तिचा सामना करावा लागू शकतो. युरॉलॉजिक नर्सिंगमध्ये प्रकाशित झालेल्या एका स्टडीनुसार, हायस्कूल आणि कॉलेजमधील 25 टक्क्यांपेक्षा जास्त महिला खेळाडूंमध्ये ही समस्या आहे. परंतु, 90 टक्क्यांपेक्षा जास्त महिला त्याबद्दल उघडपणे बोलत नाहीत. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. का उद्भवते युरिन लीकेजची समस्या? जर मूत्राशयात (Bladder) पीळ पडल्याचं जाणवत असेल तर लघवीची गळती होऊ शकते. मूत्राशयावर खूप दाब पडला तरी लघवी बाहेर येते. याला युरीन इनकॉन्टिनन्स (Urine Incontinence) देखील म्हणतात. याचे विविध प्रकार आहेत. त्यापैकी स्ट्रेस इनकॉन्टिनन्स सर्वात सामान्य आहे, ज्यामध्ये मूत्रमार्ग युरीन बाहेर पडण्यापासून थांबवू शकत नाही. ओव्हरफ्लो (Overflow) आणि फंक्शनल इनकॉन्टिनन्स (Functional Incontinence) हे याचे इतर दोन प्रकार आहेत. या समस्येमुळे अनेक स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या क्षणांचा आनंद घेऊ शकत नाहीत. कमकुवत पेल्व्हिक फ्लोअर स्नायू, वजन वाढणं, सर्जरी, वृद्धत्व किंवा प्रसूती या काही कारणांमुळे ही समस्या उद्भवू शकते. महिला या समस्येबद्दल बोलण्याचं टाळतात लाज आणि संकोचामुळे बहुतेक महिला या समस्येसाठी डॉक्टरांकडे जात नाहीत. तज्ज्ञांच्या मते, युरिनरी लीकेजची समस्या अजिबात लाजिरवाणी नाही. आपली युरीनरी सिस्टिम (Urinary System) ही फुग्यासारखी असते. ती युरीनला एका ट्युबसोबत जोडून ठेवते. या ट्युबमधून शरीरातील लघवी बाहेर पडते. पेल्व्हिसच्या तळाशी असलेले स्नायू आणि मूत्रमार्गाचा व्हॉल्व्ह ही ट्युब बंद ठेवतात आणि मूत्र बाहेर पडण्यापासून रोखतात. यामध्ये बिघाड झाल्यास युरिनरी लीकेजची समस्या सुरू होते. हे आहेत उपचार अमेरिकेतील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर जेसिका शेफर्ड म्हणतात, 'लज्जेमुळे महिला या समस्येबद्दल डॉक्टरांकडे जाण्याचं टाळतात. अनेक महिलांना यावर उपचार उपलब्ध आहेत, हेदेखील माहिती नसतं.' डॉक्टर तुमचा आहार, औषधं, सवयी आणि लघवी तपासून तुम्हाला योग्य उपचार देतात. युटीआय संसर्ग (UTI Infection), डायबेटिस आणि बद्धकोष्ठता यामुळेही ही समस्या उद्भवते. त्यामुळे या आजारांवरही उपचार करणं आवश्यक आहे. अल्कोहोल, कॅफीन, साखरयुक्त पेय, कार्बोनेटेड पेयं, खूप गोड आणि मसालेदार खाद्यपदार्थदेखील ही समस्या वाढवतात. स्मोकिंगची (Smoking) सवय किंवा ब्लड प्रेशरची (BP) काही औषधंदेखील युरिनरी लीकेजसाठी कारणीभूत ठरू शकतात. आहार किंवा औषधांमध्ये बदल करून ही समस्या टाळता येऊ शकते. ओटीपोटाच्या आणि पेल्व्हिक फ्लोअरच्या स्नायूंना बळकट केल्यानं लघवी चांगल्या प्रकारे नियंत्रित करण्यात मदत होते. केगेल व्यायाम (Kegel Exercise) करून आणि पेल्व्हिक स्नायूंना 10 सेकंद आकुंचित आणि शिथिल करूनही या समस्येवर मात करता येते. एक्सरसाईजमुळे होईल फायदा लठ्ठपणा हे युरिनरी लीकेजचं मुख्य कारण बनू शकतं. व्यायाम केल्यानं वजन कमी होतं आणि लीकेजची समस्या नाहीशी होते. जर्नल ऑफ युरॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, वजन कमी केल्यानं 12 महिन्यांत स्ट्रेस इनकॉन्टिनन्स कमी होतो, तर 18 महिन्यांत तो पूर्णपणे बरा होतो. याशिवाय, डॉक्टर मूत्रमार्ग आणि योनीभोवती इस्ट्रोजेन हार्मोन्सना (Estrogen Hormones) पुन्हा अॅक्टिव्ह करण्यासाठीही उपचार करू शकतात. तुम्हाला कोणत्या प्रकारचं लीकेज होतं यावर ते अवलंबून आहे. याशिवाय, ब्लॅडरला रिलॅक्स करण्यासाठी बोटॉक्स इंजेक्शन (Botox Injections) दिलं जाऊ शकतं किंवा मूत्रमार्गाची शस्त्रक्रियादेखील केली जाऊ शकते. या समस्येसाठी पेसरीसारखं (Pessary Ring) उपकरण देखील उपलब्ध आहे. अंगठीसारखं असणारं हे उपकरण योनीच्या आत लावल्यानंही या समस्येपासून सुटका मिळते. पेसरीमुळे मूत्राशयावर नियंत्रण राहतं आणि लीकेजची समस्या जाणवत नाही. याशिवाय पॅड (Pads) आणि अनेक प्रकारचे कपडेदेखील आहेत जे लघवी शोषून घेतात आणि लीकेजमुळे आपले कपडे ओले होण्यापासून वाचतात. या समस्येनं सेलिब्रिटीसुद्धा आहेत त्रस्त अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही पर्सनॅलिटी आणि लेखिका ब्रुक बर्क-चार्व्हेट म्हणतात, 'महिला अशा परिस्थितीतून स्वतःला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.' प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री केट विन्सलेटलादेखील (Kate Winslet) ही समस्या आहे. पाठोपाठ दोन शिंका आल्या की तिला वॉशरूमकडे धाव घ्यावी लागते. याशिवाय सिंगर केटी पेरीलासुद्धा (Katy Perry) हायस्कूलमध्ये या समस्येमुळे नेहमी डायपर घालावं लागत होतं. 2005 मध्ये, अमेरिकन सिंगर फर्गीला तर लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान स्टेजवरच युरिनरी लीकेज झालं होतं. या घटनेनं त्यावेळी इंटरनेटवर खळबळ उडाली होती. नंतर फर्गीनंही कबूल केलं होतं की, त्यावेळी तिच्या शरीरात काही असामान्य प्रतिक्रिया झाली होती. युरिनरी लीकेजची समस्या कोणत्याही स्त्रीला जाणवू शकते. स्त्रियांनी याबाबत लाज न बाळगता डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. वेळीच योग्य उपचार मिळाल्यास या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या