मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

तुम्हीही बाटलीबंद पाणी पिताय? मग वाचा 'हे' दुष्परिणाम

तुम्हीही बाटलीबंद पाणी पिताय? मग वाचा 'हे' दुष्परिणाम

आजारांचं वाढतं प्रमाण आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्याची कमतरता, यामुळे भारतातल्या बाटलीबंद (bottled water) पाण्याच्या बाजारपेठेत वाढ झाली आहे

आजारांचं वाढतं प्रमाण आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्याची कमतरता, यामुळे भारतातल्या बाटलीबंद (bottled water) पाण्याच्या बाजारपेठेत वाढ झाली आहे

आजारांचं वाढतं प्रमाण आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्याची कमतरता, यामुळे भारतातल्या बाटलीबंद (bottled water) पाण्याच्या बाजारपेठेत वाढ झाली आहे

मुंबई, 23 जुलै-   आजारांचं वाढतं प्रमाण आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्याची कमतरता, यामुळे भारतातल्या बाटलीबंद (bottled water) पाण्याच्या बाजारपेठेत वाढ झाली आहे. भारतात सध्या फ्लेवर्ड बाटलीबंद पाण्याचा वापर वाढत आहे. अलीकडे ग्राहक साध्या बाटलीबंद पाण्यापेक्षा फ्लेवर्ड बाटलीबंद पाण्याला (flavoured bottled water) प्राधान्य देत असल्याचं समोर आलं आहे. वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या अभ्यासांवर विश्वास ठेवायचा झाल्यास दीर्घ काळ बाटलीबंद पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं नाही. 'बोल्ड स्काय डॉट कॉम'ने या संदर्भात माहिती देणारं वृत्त दिलं आहे.

बाटलीबंद पाणी का पिऊ नये?

1. बॅक्टेरिया लेव्हल

नॅचरल मिनरल वॉटर (Natural Mineral Water) हे पाण्याचे झरे किंवा बोअरवेलमधून मिळवलं जातं. मिनरल वॉटरमध्ये कोलिफॉर्म्ससारखे अनेक प्रकारचे जिवाणू असू शकतात. हे जिवाणू पाणी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये बराच काळ जगू शकतात. गेल्या काही वर्षांत, बाटलीबंद पाणी कॅम्पिलोबॅक्टर इन्फेक्शनसाठी जबाबदार घटक म्हणून ओळखलं गेलंय. कॅम्पिलोबॅक्टर इन्फेक्शन (Campylobacter infection) हा अन्नाशी संबंधित एक संसर्ग आहे.

2. प्लास्टिकची भेसळ

बाटली तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं प्लास्टिक पेट्रोलियम पदार्थ आणि इतर रसायनांचा वापर करून तयार केलं जातं. त्यामुळे ही पाण्याची बाटली कालांतराने खराब होऊ शकते आणि त्या बाटलीतली रसायनं पाण्यात मिसळू शकतात. अलीकडे बाटलीबंद पाण्याचे अनेक मॅन्युफॅक्चरर बीपीए असलेल्या बाटल्यांचा वापर बंद करत आहेत. एका अभ्यासात प्लास्टिक कंपाउंड पाण्यात झिरपत असल्याचं दिसून आलंय. तसंच बीपीए शरीरात ब्रेस्ट कॅन्सरच्या (Breast Cancer) वाढीस कारणीभूत ठरतं, असं मानलं जातं.

3. चांगल्या क्वालिटीबद्दल गैरसमज

बाटलीबंद पाण्याची उपलब्धता, चव आणि स्वच्छता यामुळे ते ग्राहकांसाठी आकर्षक बनतं. नळाच्या पाण्यापेक्षा या पाण्याची गुणवत्ता चांगली असल्याचं ग्राहकांचं मत आहे; पण वस्तुस्थिती मात्र अगदी वेगळी आहे. अभ्यासानुसार, बाटलीबंद पाण्यात बॅक्टेरियाचं प्रमाण नळाच्या पाण्यापेक्षा जास्त असतं.

4. गर्भधारणेत गुंतागुंत

टाइप 7 प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या बीपीएमुळे गर्भवती महिला आणि त्यांच्या पोटातल्या बाळांमध्ये कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. बीपीए इस्ट्रोजेन असल्याचं भासवतं. त्यामुळे बाळांमध्ये क्रोमोझोमल विकृती (chromosomal abnormalities ) आणि जन्मजात दोष होऊ शकतात.

5. कार्सिनोजेन्सचा धोका

प्लास्टिकच्या बाटलीतल्या कोमट पाण्यात कार्सिनोजेनिक कंपाउंड्स असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कोमट पाणी प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी काचेच्या बाटल्यांमध्ये साठवणं चांगलं मानलं जातं.

(हे वाचा: Kidney Stone: वारंवार पोटदुखीसह ही 8 लक्षणं दिसली तर किडनी स्टोनचा त्रास )

6. लवकर वयात येणं

इस्ट्रोजेन हॉर्मोन्सची नक्कल करणार्‍या रसायनांच्या संपर्कात आल्याने मुलं लवकर वयात (Early puberty) येऊ शकतात. तसंच कमी दर्जाचं बाटलीबंद पाणी प्रजननक्षमतेवरही परिणाम करू शकतं.

7. पर्यावरणीय धोका

बाटली पुनर्वापराच्या सुविधा उपलब्ध असूनही, टाकून दिलेल्या दर सात बाटल्यांपैकी फक्त एक बाटली रिसायकलिंगसाठी जाते. बाकी सर्वांची विल्हेवाट लँडफिलमध्ये लावली जाते. त्यामुळे पृथ्वीवर प्लास्टिक कचऱ्यात वाढ होते. महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिकच्या बाटल्यांचं विघटन होण्यासाठी 450 ते 1000 वर्षं लागतात.

(हे वाचा: Tom Stolman आहे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती; जाणून घ्या त्याचा डाएट प्लॅन)

पिण्याच्या पाण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा इन्सुलेटेड थर्मास वापरणं हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही त्यात गरम किंवा थंड पाणी भरू शकता. तसंच तुम्ही दररोज ती बाटली धुऊ शकता. पाणी साठवण्यासाठी आणि प्रवासात सोबत नेण्यासाठी कायम योग्य बाटली निवडा. काचेच्या किंवा स्टीलच्या बाटल्या वापरणं कधीही चांगलं. तसंच पिण्यासाठी बाटलीबंद पाणी घेताना त्यावर 2, 4 आणि 5 कोड तपासून घ्या. हे कोड त्या बाटल्यांची आणि त्यामध्ये असलेल्या पाण्याची गुणवत्ता दर्शवतात.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle