Home /News /heatlh /

Lassa Fever: ना कोरोना ना मंकीपॉक्स, नायजेरियात पसरली 'लासा'ची साथ, आतापर्यंत 155 जणांचा मृत्यू

Lassa Fever: ना कोरोना ना मंकीपॉक्स, नायजेरियात पसरली 'लासा'ची साथ, आतापर्यंत 155 जणांचा मृत्यू

Lassa Fever: ना कोरोना ना मंकीपॉक्स, नायजेरियात पसरली 'लासा'ची साथ, आतापर्यंत १५५ जणांचा मृत्यू

Lassa Fever: ना कोरोना ना मंकीपॉक्स, नायजेरियात पसरली 'लासा'ची साथ, आतापर्यंत १५५ जणांचा मृत्यू

Lassa Fever Symptoms and Reasons : पश्चिम आफ्रिकेच्या काही भागांमध्ये हा रोग मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. लासा तापाची लक्षणे मलेरियासारखीच असतात. ही लक्षणे विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर एक ते तीन आठवड्यांच्या दरम्यान दिसतात.

    मुंबई, 19 जून: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाला जगाला वेठीस धरले आहे. जग कोरोनातून सावरतंय ना सावरतंय, तोच मंकीपॉक्स येऊन धडकला. आता याच दरम्यान नायजेरियामध्ये (Nigeria) एक नवं संकट येऊन धडकलं आहे. नायजेरिया 'लासा' तापाशी (Lassa Fever) झुंज देत आहे. देशात या तापामुळे मृतांची संख्या 155 वर पोहोचली आहे. नायजेरिया सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने (NCDC) ही माहिती दिली. नायजेरियाच्या सार्वजनिक आरोग्य एजन्सीने सांगितले की, या वर्षाच्या सुरुवातीपासून या आजाराची 4,939 संशयित प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी 782 प्रकरणांमध्ये लासाचं निदान झाल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिली आहे. एनसीडीसीने सांगितले की, या तापामुळे जूनच्या सुरुवातीपर्यंत 155 मृत्यूची नोंद झाली आहे. 24 राज्यांमध्ये किमान एक प्रकरण नोंदवलं गेलं आहे. यावर्षी ओंडो, इडो आणि बाउची या तीन प्रांतांमध्ये या आजाराची 68 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, लासा ताप हा वेगाने पसरणारा विषाणूजन्य रक्तस्रावी रोग आहे. लासा एरेना व्हायरसशी संबंधित आहे. हेही वाचा: Artificial Sweeteners: शुगर फ्री टॅबलेट खाणे योग्य आहे का, जास्त प्रमाणात खाल्यास काय होतात दुष्परिणाम? लासा तापाची लक्षणे काय आहेत? (Symptoms and Reasons of Lassa Fever)- हा विषाणू उंदरांमुळे पसरतो. उंदरांच्या (Mouse) मलमूत्र दूषित अन्न किंवा घरगुती वस्तूंच्या संपर्कात आल्याने व्यक्तीला या आजाराची लागण होते. पश्चिम आफ्रिकेच्या काही भागांमध्ये हा रोग मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. लासा तापाची लक्षणे मलेरियासारखीच असतात. ही लक्षणे विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर एक ते तीन आठवड्यांच्या दरम्यान दिसतात. यामध्ये रुग्णांना ताप, थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी अशा तक्रारी येत आहेत. हेही वाचा: अरे देवा! कोरोना महासाथीत आता Acute enteric epidemic; नव्या आजाराच्या उद्रेकाने चिंता वाढवली मंकीपॉक्स टाळण्यासाठी सेक्स गाईडलाईन्स (Sex guidelines to prevent Monkeypox)- युरोप आणि अमेरिकेसह जगातील अनेक देश मंकीपॉक्सच्या कहराशी झुंज देत आहेत. अमेरिकन एजन्सी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने सेक्स संदर्भात विचित्र मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मंकीपॉक्सचा रुग्ण सेक्सद्वारे त्याच्या जोडीदारालाही संक्रमित करू शकतो. अशा परिस्थितीत, सीडीसीने सांगितले की ज्याला मंकीपॉक्स आहे त्याने सेक्स करू नये. परंतु अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात लोकांनी सीडीसीच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आहे.
    Published by:user_123
    First published:

    Tags: Disease symptoms, Health

    पुढील बातम्या