Home /News /heatlh /

Weight Loss : या 4 मार्गांनी चयापचय (Metabolism) वाढवा, कॅलरीज बर्न होण्यास उपयुक्त

Weight Loss : या 4 मार्गांनी चयापचय (Metabolism) वाढवा, कॅलरीज बर्न होण्यास उपयुक्त

चयापचयातून शरीरात होणाऱ्या सर्व रासायनिक क्रिया समजल्या जातात. या रासायनिक प्रक्रिया आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. चयापचयाचं प्रमाण जितकं जास्त असेल तितक्या जास्त कॅलरीज वापरल्या जातात.

    Weight Loss 4 ways to increase metabolism : वजन कमी करण्यासाठी चयापचयाचे (Metabolism) प्रमाण जास्त असणे आवश्यक असते. हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. रोजच्या दिनक्रमात तुम्ही तुमचा चयापचय कसे वाढवू शकाल ते जाणून घेऊ. चयापचयातून शरीरात होणाऱ्या सर्व रासायनिक क्रिया समजल्या जातात. या रासायनिक प्रक्रिया आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. चयापचयाचं प्रमाण जितकं जास्त असेल तितक्या जास्त कॅलरीज वापरल्या जातात. जितक्या जास्त प्रमाणात कॅलरीज वापरल्या जातात, तितक्या वेगाने वजन कमी होतं. वेगाने होणाऱ्या चयापचय प्रक्रियेमुळं आपल्याला शरीरात उर्जा संचारल्यासारखं वाटतं. आपण चयापचयाचा वेग कसा वाढवू शकतो ते पाहू. सकाळी लवकर उठा निरोगी जीवनशैलीसाठी, रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा. चांगली झोप वजन कमी करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. याव्यतिरिक्तही ऊर्जा वाढवण्यासदेखील मदत करते. सकाळी न्याहारीपूर्वी स्ट्रेचिंग व्यायाम करावा. ऑफिसमध्ये अ‌ॅक्टिव्ह रहा बहुतेक लोक संपूर्ण दिवस ऑफिसमध्ये घालवतात. घरी येईपर्यंत, ते इतके थकलेले असतात की, त्यांना जिममध्ये जाण्यासाठीही वेळ नसतो. अशा परिस्थितीत, चयापचय राखण्यासाठी कार्यालयात सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा. आपण बैठे काम करत असल्यास दिवसातून दोनदा मिनी ब्रेक घ्या. नियमितपणे चालणे केवळ वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर, उत्पादकता वाढवण्यासाठीदेखील कार्य करते. हे आपल्याला आपल्या कामाकडे अधिक लक्ष देण्यास मदत होते. दुपारच्या जेवणात प्रथिनांसह इतर पौष्टिक अन्न खा, जे चयापचय वाढवण्यास मदत करते. संध्याकाळच्या न्याहारीमध्ये चिप्स, चॉकलेट, केक आणि कँडीज घेऊ नका. पौष्टिक खा काही गोष्टी खाल्ल्याने कॅलरीज सहज बर्न होतात. शरीरात अन्न चघळणे, पचवणे आणि साठवणे या प्रक्रियेत कॅलरीज बर्न होतात. या दरम्यान 5 ते 10 टक्के कॅलरीज बर्न होतात. जर तुम्ही ताकद वाढवण्यासाठी ट्रेनिंग घेत असाल तर, उच्च प्रथिनेयुक्त अन्न पचवणे आणि स्नायूंचे प्रमाण वाढवणे अधिक कठीण होते. फायबरयुक्त पदार्थ अधिक चघळण्याची आवश्यकता असते. यासाठी अधिक कॅलरीज आवश्यक असतात. अन्नामध्ये मसाले घातल्याने शरीराचे तापमानही वाढते आणि कॅलरीज बर्न होण्यासही मदत होते. प्रथिने आणि फायबरयुक्त अन्न खाल्ल्याने आणखी खाण्याची इच्छा कमी होऊ शकते. यामुळे पोटची भूक दीर्घकाळ शांत राहते. हे वाचा - उच्च रक्तदाबाची (High BP) सर्वसाधारण दिसणारी ही लक्षणं तुम्हाला माहीत आहेत का? व्यायाम तीव्र व्यायामाने चयापचयाचा वेग वाढवण्यास मदत होते. या व्यतिरिक्त, बेसिक वर्कआउट सेशन्स केल्याने स्नायू मजबूत होतात, कॅलरीज बर्न होतात आणि आरोग्य सुधारते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Weight gain, Weight loss

    पुढील बातम्या