Home /News /heatlh /

Meditation : कोरोना काळात तणावासह आजारांनाही दूर ठेवण्याचा सोपा मार्ग

Meditation : कोरोना काळात तणावासह आजारांनाही दूर ठेवण्याचा सोपा मार्ग

फुप्फुसांची ताकद वाढवणारी 5 योगासने

फुप्फुसांची ताकद वाढवणारी 5 योगासने

Benefits Of Meditation: तणाव हा आजार नसला तरी अनेक आजारांना आमंत्रण देणारी मानसिक स्थिती आहे. तणावावर उत्तम उपाय म्हणजे मेडिटेशन.

    मुंबई, 23 एप्रिल:  तुम्ही अनेक दिवसांपासून ताणतणावात असाल आणि त्यातून सावरण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही मेडिटेशनची मदत घ्यायला हवी. दररोज दिवसातले काही मिनिटं मेडिटेशनसाठी (Meditation) वेळ दिला तर आपल्याला दिवसभर तणाव आणि चिंतामुक्त राहण्यास मदत होते. मानसिक स्थिती स्थिर बनवते. त्याबरोबर आत्मशांती मिळते. त्यामुळेच मेडिटेशन (Meditation) थेरपी लोकप्रिय बनत चालली आहे. महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशनसाठी (Meditation)  काहीही विशेष करण्याची आवश्यकता नाही. मेडिटेशनसाठी ठराविक जागेची गरज नसते. आपण कुठेही झोपून, अगदी प्रवास करताना, ऑफिसमध्ये बसल्याबसल्याही मेडिटेशन करू शकता. रेग्युलर मेडिटेशन केल्याने एन्जायटी, दमा, कॅन्सर, क्रॉनिक पेन, डिप्रेशन, हार्ट प्रॉब्लेम, हाय ब्लडप्रेशर, स्लीप डिसऑर्डर, टेन्शन, डोकेदुखी, नैराश्य यामध्ये बऱ्यापैकी आराम मिळतो. मेडिटेशन करण्याचे फायदे 1. मनावरचा ताण कमी होतो. दिवसभरातला ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन फायदेशीर आहे. शरीरातले हार्मोनल बदल मानसिक आणि शारीरीक ताणावावर परिणाम करतात. तणावामुळे झोप न येणं, उदासीनता, चिंता आणि उच्च रक्तदाब अशा समस्या उद्भवतात. पण मेडिटेशनमुळे ताणतणावाची लक्षणे कमी होऊन चिडचिडेपणाही वाढतो.  2. टेन्शन कमी होतं. मेडिटेशन करून फोबिया आणि पॅनिक अटॅक ही तणावाची लक्षणं नियंत्रणात आणता येतात. मेडिटेशन म्हणजे ध्यान केल्याने चिंता दूर होऊन सकारात्मक विचार मनात यायला लागतात. 3. आत्मविश्वास वाढतो. तुम्हाला स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर मेडिटेशन करा. त्यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य सुधारेल. मन जागरूक बनेल कोणत्याही प्रसंगाला तुम्ही सामोर जाऊ शकता हे वाचा - काकडी खाल्ल्यानंतर तुम्हीसुद्धा ही चूक तर करत नाहीत ना? 4. निद्रानाश झोप न येण्याची तक्रार अनेकजण करत असतात. एका अभ्यासानुसार मेडिटेशन करणाऱ्या लोकांना चांगली झोप लागते. रोजची धावपळ, बदललेली लाईफस्टाईल यामुळे तुम्ही तणावात रहात असाल तर त्यातून बाहेर येण्यात मेटिडेशनचा फायदा होतो. 5. इच्छा शक्ती मजबूत बनते. मेडिटेशन करण्यामुळे आपल्याला बर्‍याच वाईट सवयींपासून मुक्ती मिळण्यात मदत होते. ध्यान आपली इच्छाशक्ती बळकट करण्यास, भावभावनांवर नियंत्रण ठेवण्यास आणि व्यसनमुक्त करण्यात मदत करते. 6. स्वयंशिस्त लागते. मेडिटेशन आपल्याला साधं जीवन जगण्यास आणि शिस्त पाळण्यास शिकवते. आपण इतरांबद्दल सकारात्मक विचार करायला शिकतो. 7. स्मरणशक्ती सुधारते. मेडिटेशन केल्यान दीर्घकाळ आपली स्मरणशक्ती चांगली राहते. वाढत्या वयानुसार स्मरणशक्ती कमी होऊ नये यासाठी मेडिटेशन दररोज करावं. हे वाचा - उन्हाळ्याच्या त्रासाने बेजार? 3 घरगुती उपाय करा; ऋजुता दिवेकर यांच्या टिप्स 8 सहनशक्ती वाढते. मेडिटेशनमुळे माणसाची सहनशक्ती वाढते. त्याने आपला राग कमी होतो. चिडचिडेपणा कमी होतो. आपण संयमाने बोलायला शिकतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Lifestyle, Mental health, Tips

    पुढील बातम्या