मराठी बातम्या /बातम्या /heatlh /तुमचा ब्लड ग्रुप तर हा नाही ना? मग तुम्हाला आहे हार्ट अटॅकचा धोका

तुमचा ब्लड ग्रुप तर हा नाही ना? मग तुम्हाला आहे हार्ट अटॅकचा धोका

तुम्हाला हार्ट अटॅक (heart attack) येण्याचा धोका किती आहे हे तुमच्या रक्तगटावरही (blood group) अवलंबून आहे.

तुम्हाला हार्ट अटॅक (heart attack) येण्याचा धोका किती आहे हे तुमच्या रक्तगटावरही (blood group) अवलंबून आहे.

तुम्हाला हार्ट अटॅक (heart attack) येण्याचा धोका किती आहे हे तुमच्या रक्तगटावरही (blood group) अवलंबून आहे.

  नवी दिल्ली, 13 मार्च : आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका (Heart Attack) या समस्यांना अनेकांना तोंड द्यावं लागत आहे. अगदी तरुण वयातच हृदयविकार झाल्याचं आपण अनेकदा ऐकतो. स्थूलपणा, व्यायामाचा अभाव, अयोग्य आहार आणि बैठ्या कामांच्या सवयींमुळे हा आजार सामान्यतः जडतो. यावर वेळीच वैद्यकीय उपचार सुरू करणं गरजेचं आहे. अन्यथा हा आजार सायलेंट किलर ठरतो. हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक सामान्यतः कोणत्या रक्तगटाच्या (Blood Group) व्यक्तींना येण्याची जास्त शक्यता असते, याबाबत संशोधन करण्यात आलं आहे.

  जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगात हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. 2017 मध्ये युरोपियन सोसायटी आॅफ कार्डियोलॉजीने एक अभ्यास केला होता. यात 13 लाखांहून अधिक लोकांना समाविष्ट करून घेण्यात आलं होतं. या अभ्यासानुसार ओ ब्लड ग्रुप (O Blood Group) नसलेल्या व्यक्तींना हार्ट अटॅकसह अन्य हृदयरोगाचा धोका 9 टक्क्यांहून अधिक असतो, असं स्पष्ट झालं होतं.

  संशोधकांनी ए आणि बी रक्तगटाची (A and B Blood Group) तुलना ओ रक्तगटाशी केली. यात दिसून आलं की ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत बी रक्तगट असलेल्या व्यक्तींना मायोकार्डीनल इन्फेक्शनचा धोका 15 टक्क्यांहून अधिक असतो. तसंच ए रक्तगट असलेल्या व्यक्तींना ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत हार्ट फेल्युअर (हृदय क्रिया बंद पडणे (Heart Failure) चा धोका 11 टक्क्यांहून अधिक असतो. हार्ट फेल्युअर आणि हार्ट अटॅक हे दोन्ही हृदयविकाराचेच प्रकार आहेत. हार्ट फेल्युअर हे हळूहळू होतं तर हार्ट अटॅक अचानक येतो.

  हे वाचा - Night shift करणाऱ्यांना असतो या गंभीर आजाराचा धोका? काय सांगतं नवं संशोधन

  युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या माहितीनुसार, ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत अन्य रक्तगट असलेल्या व्यक्तींमध्ये हार्ट फेल होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्यांच्यात रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता अधिक असते. 2017 मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, ओ वगळता इतर रक्तगटाच्या व्यक्तींमध्ये नॉन-विलब्रॅण्ड फॅक्टरचे (ब्लड कोटींग प्रोटीन) प्रमाण अधिक असते. त्यामुळे ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असते. संशोधनानुसार ए आणि बी रक्तगट असलेल्या व्यक्तींमध्ये थ्रोम्बोसिस म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या (Blood Clots) होण्याची शक्यता 44 टक्क्यांहून अधिक असते. रक्ताच्या गुठळ्या कोरोनरी धमन्या बंद करतात. यामुळे हृदयाच्या पेशींना होणारा ऑक्सिजन आणि पोषक घटकांचा पुरवठा बंद होतो. यामुळे हार्ट अटॅक येतो.

  हे वाचा - Health tips या सोप्या टिप्सच्या मदतीनं राखा किडनीचं आरोग्य, शरीर राहिल फिट

  एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की ज्यांचा रक्तगट ओ नाही आहे त्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. आज तकच्या वृत्तानुसार, या अनुषंगाने संशोधकांनी 4,00,000 हून अधिक लोकांवर संशोधन केलं आहे. या संशोधनातून ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत ए आणि बी रक्तगट असलेल्या व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याची शक्यता 8 टक्क्यांहून अधिक असते, असे दिसून आले. या संशोधनाचे निष्कर्ष अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मेडीकल जर्नल्स आर्टेरियोस्क्लोरोसिस, थोम्ब्रोसिस आणि व्हस्क्युलर बायोलॉजीमध्ये प्रकाशित झालं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Health, Health Tips, Heart Attack, Lifestyle, Wellness