नवी दिल्ली, 01 ऑक्टोंबर : मुरुम किंवा पिंपल्समुळं (pimples) चेहऱ्याचे संपूर्ण सौंदर्य खराब होतं. मुरुमांपासून मुक्त (pimples free) होण्यासाठी, अनेक वेळा लोक पुन्हा पुन्हा चेहरा धुतात. मात्र, असं केल्यानं चेहऱ्यावर अतिरिक्त तेल बाहेर येतं. यामुळे समस्या कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता जास्त असते. पिंपल्ससंबंधी अनेकांकडून होणाऱ्या चुकांची माहिती घेऊया.
पिंपल्स (pimples) का होतात?
त्वचा तज्ञांच्या मते, मुरुमांची समस्या मुख्यतः किशोरवयीन मुलांमध्ये आढळते. कारण यावेळी अनेक प्रकारचे हार्मोनल बदल शरीरात होतात. या व्यतिरिक्त, अधिक मसालेदार खाणे देखील याचे एक कारण आहे. दुसरीकडे, ज्यांची तेलकट त्वचा आहे त्यांनाही अनेकदा मुरुमांची समस्या असते.
मुरुमांच्या संदर्भात या चुका करू नका
1. स्टीम घेण्याची चूक नको
काही लोकांचा असा विश्वास आहे की, स्टीम घेतल्याने मुरुमांची समस्या कमी होते. पण हे चुकीचे आहे. वाफेमुळे तुमच्या त्वचेची छिद्रे वाढतात. अशा स्थितीत त्वचा अधिक तेलकट होते आणि समस्या अधिक वाढू शकते.
2. वारंवार चेहरा धुण्याची सवय
जर तुम्हाला मुरुमांची समस्या असेल तर वारंवार चेहरा धुवू नका. कारण वारंवार फेस वॉश केल्याने त्वचा अधिक तेल बाहेर सोडते. त्याऐवजी, तुम्ही चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल स्वच्छ करण्यासाठी मऊ टिश्यू किंवा ओले फेस वाइप्स वापरू शकता.
हे वाचा - ‘महिलांबाबत शब्द जपून वापरा’; कबीर सिंगचा VIDEO दाखवत मुंबई पोलिसांनी दिला कडक इशारा
3. उशाचे कव्हर न बदलणे
त्वचा आणि केसांमधून तेल उशांवर जमा होते. यामुळे उशीवर जीवाणू वाढतात. जेव्हा आपण दररोज तिच उशी वापरतो, तेव्हा मुरुमांचा धोका वाढतो. त्यामुळे दर तीन ते चार दिवसांनी आपल्या उशाचे कव्हर बदला किंवा धुवून घ्या.
4. मुरुमांना वारंवार स्पर्श करणे
मुरुमांना वारंवार स्पर्श केल्यास तुमची समस्या आणखी वाढू शकते. नेहमी लक्षात ठेवा की हात पूर्णपणे धुल्यानंतरच चेहऱ्याला स्पर्श करा. जर मुरुमे कोरडी असतील आणि त्यांच्यावर कवच असेल तर ते काढण्याचा प्रयत्न करू नका.
हे वाचा - ‘मारवाडच्या मदर तेरेसा’! पतीचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करुन उभारलं वृद्धाश्रम
5. चुकीचे सौंदर्य प्रसाधने वापरणे
चुकीच्या उत्पादनाचा वापर केल्याने चेहऱ्यावर दुष्परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे समस्या वाढू शकते. म्हणून, तज्ञांच्या सल्ल्याने आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार उत्पादने, औषधे वापरा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Skin care