मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Cancer treatment in India : भारतात कसे होतात कॅन्सरवर उपचार; कोणत्या पद्धती वापरल्या जातात?

Cancer treatment in India : भारतात कसे होतात कॅन्सरवर उपचार; कोणत्या पद्धती वापरल्या जातात?

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये कॅन्सरवर चांगल्या पद्धतीनं उपचार केले जातात. विशेष म्हणजे हे उपचार तुलनेने रुग्णांना परवडणारे आहेत. भारतात कॅन्सर रुग्णांसाठी कोणत्या उपचार पद्धतींना प्राधान्य दिलं जातं, ते सविस्तरपणे जाणून घेऊ या.

पुढे वाचा ...
मुंबई, 03 ऑगस्ट: कॅन्सर अर्थात कर्करोग (Cancer) हा एक भयंकर स्वरूपाचा आजार असून, यामुळे दर वर्षी जगभरात लाखो व्यक्तींचा मृत्यू होतो. कॅन्सरविषयी अनेकांच्या मनात अनेक प्रश्न असल्याचं दिसून येतं. कॅन्सर हा गंभीर स्वरूपाचा आजार असला, तरी प्रगत वैद्यकीय उपचारांमुळे रुग्णांना नक्कीच दिलासा मिळू शकतो; मात्र कॅन्सरवरचे उपचार महागडे असल्याने सर्वच रुग्णांना ते परवडणारे नसतात. कॅन्सरचे सर्वसामान्यपणे 200 प्रकार आहेत; मात्र भारतात यापैकी काहीच प्रकारच्या कॅन्सरचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येतात. कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असला तरी त्यावर 7 प्रकारे उपचार केले जातात. या 7 प्रकारच्या उपचार (Treatment) पद्धतींना जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली आहे. भारतात यापैकी काही उपचार पद्धतींचा अवलंब केला जातो. यात सर्जरी, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनो थेरपी आणि हॉर्मोन थेरपीचा समावेश आहे. कॅन्सरवर उपचार करणं हे गुंतागुंतीचं असतं. कारण प्रत्येक व्यक्तीचा आजार आणि त्याची लक्षणं वैशिष्ट्यपूर्ण असतात. ती पाहून डॉक्टर उपचार पद्धतीची निवड करतात. याचाच अर्थ प्रत्येक कॅन्सर रुग्णावर सरसकट पद्धतीनं उपचार केले जात नाहीत. एखाद्या रुग्णासाठी उपचार पद्धती ठरवताना, कॅन्सरची स्टेज, तो शरीराच्या अन्य भागात पसरला आहे का, रुग्णाला असणाऱ्या अन्य व्याधी, त्याचं वय आदी गोष्टी विचारात घेतल्या जातात. काही कॅन्सर रुग्णांना गरजेनुसार कंबाइन्ड ट्रीटमेंटही (Combined Treatment) दिली जाते. हे वाचा - Cancer Treatment : कॅन्सर ट्रिटमेंटचा खरंच खूप त्रास होतो का? कसा होतो कर्करोगावर उपचार? कॅन्सर या आजाराची भारतातली स्थिती बघता महागडे उपचार आणि आजाराकडे केलं जाणारं दुर्लक्ष यांमुळे मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. परंतु, जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये कॅन्सरवर चांगल्या पद्धतीनं उपचार केले जातात. विशेष म्हणजे हे उपचार तुलनेने रुग्णांना परवडणारे आहेत. भारतात कॅन्सर रुग्णांसाठी कोणत्या उपचार पद्धतींना प्राधान्य दिलं जातं, ते सविस्तरपणे जाणून घेऊ या. केमोथेरपी (Chemotherapy) : जागतिक स्तरावर कॅन्सरवर उपचारांसाठी वापरली जाणारी केमोथेरपी ही उपचार पद्धती भारतातदेखील सर्रास वापरली जाते. केमोथेरपी शरीरातल्या कॅन्सर पेशी, तसंच काही निरोगी पेशीही नष्ट करते. केमोथेरपीमुळे कॅन्सर पेशींची अनियंत्रित वाढ आणि विभाजन थांबतं. केमोथेरपीचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतो. त्या तुलनेत सर्जरी किंवा रेडिएशनचा परिणाम हा शरीराच्या विशिष्ट भागापुरताच मर्यादित असतो. भारतात कॅन्सरवरच्या उपचारांकरिता केमोथेरपी हा एक चांगला पर्याय मानला जातो. केमोथेरपी सर्वसामान्यपणे चार प्रकारे दिली जाते. यातल्या एका प्रकारात रुग्णाला तोंडाद्वारे कॅप्सूल किंवा लिक्विड दिलं जातं. इंट्राव्हेनस केमोथेरपी (Intravenous Chemotherapy) हा दुसरा प्रकार असून, यात रुग्णाला शिरेत इंजेक्शन देऊन त्यातून औषधं शरीरात सोडली जातात. टॉपिकली (Topically) या तिसऱ्या प्रकारात त्वचेवर विशिष्ट ठिकाणी क्रीम लावलं जातं. डायरेक्ट प्लेसमेंट (Direct Placement) हा चौथा प्रकार असून तो ब्रेन कॅन्सरसाठी वापरला जातो. यात टाळूखाली लावण्यात आलेल्या उपकरणात किंवा लंबर पंक्चरद्वारे केमोथेरपी दिली जाते. सर्जरी : सर्जरी (Surgery) हा कॅन्सर उपचार पद्धतीतला महत्त्वाचा भाग मानला जातो. भारतातदेखील कॅन्सर सर्जरी केल्या जातात. कॅन्सरचा प्रकार, ट्यूमरचा (Tumor) आकार, स्टेज, जागा आणि स्प्रेडिंग या गोष्टी विचारात घेऊन डॉक्टर सर्जरीचा निर्णय घेतात. प्रगत तंत्रज्ञानामुळे आता सर्जरी रुग्णासाठी वेदनादायी ठरत नाही. कॅन्सर सर्जरीचे प्रामुख्याने 6 प्रकार आहेत. यात ओपन सर्जरी, मिनिमल इनव्हॅझिव्ह सर्जरी, क्रायो सर्जरी, लेझर सर्जरी, इलेक्ट्रोसर्जरी आणि मायक्रोस्कोपिकली कंट्रोल्ड सर्जरी या प्रकारांचा समावेश होतो. कॅन्सरवर सर्जरी हा यशस्वी उपचार असला तरी वेदना, संसर्ग, रक्तस्राव, विशिष्ट भागातल्या टिश्यूजचं नुकसान, भुलीच्या औषधांची Reaction आदी दुष्परिणामही आहेत. रेडिएशन थेरपी (Radiation Therapy) : रेडिएशन किंवा रेडिओ थेरपी अन्य उपचारांसोबत दिली जाते. शरीराच्या विशिष्ट भागातल्या कॅन्सर पेशी आणि निरोगी पेशी नष्ट करण्यासाठी ही थेरपी वापरतात. ल्युकेमिया आणि लिम्फोमासह जवळपास सर्व कॅन्सर प्रकारांवर उपचारासाठी ही थेरपी वापरली जाते. मेटास्टॅटिक कॅन्सरमध्ये ही पद्धत वापरली जात नाही. भारतात ही उपचारपद्धती प्राधान्यानं वापरली जाते. एक्सटर्नल बीम रेडिएशन थेरपी (External Beam Radiation Therapy) आणि इंटर्नल रेडिएशन थेरपी (Internal Radiation Therapy) असे याचे दोन प्रकार आहेत. इम्युनोथेरपी (Immunotherapy) : ही एक बायोलॉजिकल थेरपी आहे. यात कॅन्सर रोखण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी शरीरातल्या नैसर्गिक संरक्षणाचा वापर केला जातो. इम्युनोथेरपीचे मोनोक्लोनल अँटीबॉडीज, चेक पॉइंट अँटीबॉडीज, टी-सेल थेरपी, कॅन्सर व्हॅक्सिन्स, सायटोकाइन्स हे प्रकार आहेत; मात्र ही उपचार पद्धती काहीशी महाग असल्याने भारतात तिचा वापर कमी प्रमाणात होताना दिसतो. हे वाचा - Types of Cancer : सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात आला तर होऊ शकतो कॅन्सरवर इलाज, कर्करोगाचे प्रकार लक्षात घ्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट (Bone Marrow Transplant) : ब्लड कॅन्सर किंवा रक्ताशी संबंधित आजारांकरिता ही उपचार पद्धती वापरली जाते. यात ऑटोलोगस बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि अलोजेनिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट असे दोन प्रकार आहेत. भारतात ही उपचारपद्धती अन्य देशांच्या तुलनेत कमी खर्चिक आहे. टार्गेटेड थेरपी (Targeted Therapy) : या उपचार पद्धतीत कॅन्सरला कारणीभूत असलेल्या विशिष्ट जनुकाच्या म्युटेशनला लक्ष्य करून औषधयोजना केली जाते. विविध प्रकारच्या कॅन्सरवर हा एक प्रभावी उपचार आहे. भारतात ही उपचारपद्धती वापरली जाते; मात्र अन्य देशांच्या तुलनेत भारतात या उपचार पद्धतीतले काही पर्याय उपलब्ध नाहीत. हॉर्मोन थेरपी (Hormone Therapy) : कॅन्सरच्या प्रकाराचा संबंध हॉर्मोन्सशी असेल तर या थेरपीचा वापर केला जातो. प्रामुख्याने ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सरवर उपचारासाठी ही थेरपी वापरतात. भारतात या थेरपीचा वापर केला जातो.
Published by:Nishigandha Kshirsagar
First published:

Tags: Cancer, Health Tips, Lifestyle

पुढील बातम्या