कोरोनानंतर आता Mad Cow Disease चं संकट; काय आहेत याची लक्षणं आणि कारणं?

कोरोनानंतर आता Mad Cow Disease चं संकट; काय आहेत याची लक्षणं आणि कारणं?

Mad Cow Disease : सुरुवातीला साधी लक्षणं दिसतात त्यामुळे रुग्ण दुर्लक्ष करतो आणि मग हा आजार बळावतो.

  • Share this:

उटावा, 02 एप्रिल :  जगभरात कोरोना (Coronavirus)  हाहाकार माजवतोच आहे. त्याची दुसरी लाट अनेक ठिकाणी आली आहे. त्यात आता आणखी एक संकट येऊन ठेपलं आहे. आणखी एका जीवघेण्या आजाराने डोकं वर काढलं आहे. हा आजार मेंदूशीसंबंधित आहे. या आजाराचे 40 पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत तर 5 जणांचा बळी गेला आहे. या आजाराला मॅड काऊ डिसिज (Mad Cow Disease) म्हटलं गेलं आहे. कॅनडात या आजाराचे रुग्ण सापडले आहेत.

मॅड काऊ नावावरूनच हा आजार गायीशी संबधित असावा असा तर्क केला असेल, तर तो बरोबर आहे. गाय आणि तिच्यासारख्या पाळीव प्राण्यांमध्ये आढळणारा हा रोग आहे. या आजाराचं दुसरं नाव  Bovine spongiform encephalopathy (BSE). हा गंभीर न्यूरॉलॉजिकल आजार आहे. Prion नावाच्या विषाणूमुळे हा आजार होतो.  एका विशिष्ट प्रोटीनमुळे हा रोग होतो. हा एक न्युरॉलॉजिकल रोग आहे. यामध्ये मेंदू आणि पाठीच्या कण्याचे हाड नष्ट होते.

1986 मध्ये पहिल्यांदा ब्रिटनमध्ये (Britain) या आजाराचा शोध लागला होता. त्या वेळी तिथं या आजारानं 170 लोकांचा मृत्यू झाला होता. कॅनडामध्ये 2015 ला मॅड काऊ आजाराचे पाच रुग्ण पहिल्यांदाच सापडले होते. गेल्यावर्षी 24 रुग्ण सापडले तर या वर्षी 2021 मध्ये ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. आता एकदम 43 जणांना हा आजार झाल्याचं लक्षात आलं त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला.

 लक्षणं काय आहेत?

मेंदूतील पेशींवर हल्ला करणाऱ्या या आजाराची लक्षणं या पेशींचं बरंच नुकसान झाल्यावर दिसायला लागतात. जर योग्य उपचार झाले नाहीत तर रुग्णाचा मृत्यू होतो. लक्षणं दिसायला 1 ते 2 वर्षे लागतात. माणूसाचा स्मृतिभ्रंश होतो, त्याच्या शरीरावरचं नियंत्रण कमी होतं आणि शेवटी शरीराचं संचालन करणारी यंत्रणाच निकामी होते.

हे वाचा - कोरोना रुग्णांनी ओलांडला 45000 चा टप्पा; रिकव्हरीच्या दुप्पट पॉझिटिव्ह रुग्ण

हा आजार झालेली व्यक्ती गोष्टी विसरू लागते. तिला भ्रम होऊ लागतो. अंग दुखी, स्नायू आखडणे अशी लक्षणेही आढळतात. 18 ते 36 महिन्यांच्या कालावधीत रुग्णांना जिथं मेंदूला ताण द्यावा लागतो अशी कामं करण्यात अडचणी येऊ लागतात. ताकद कमी होण्यासह दाताच्या दुखण्याच्या तक्रारीही सुरू होतात.

मॅड काऊ आजाराचं निदान करण्यासाठी डॉक्टर ECG, मेंदूचा MRI या चाचण्या करायला सांगतात. कधीकधी मेंदूतील किंवा पाठीच्या मणक्यातील स्रावांची चाचणी करतात. सुरुवातीला साधी लक्षणं दिसतात त्यामुळे रुग्ण दुर्लक्ष करतो आणि मग आजार बळावतो. सामान्यपणे गाईच्या मांसाच्या सेवनाने हा आजार होत असल्याने अनेक देशांनी बिफच्या आयातीवर बंदी घातली आहे.

हे वाचा - रशियाच्या Sputnic V लशीला भारतात No Signal; इमर्जन्सी वापराची परवानगी नाकारली)

पाळीव प्राण्यांमुळे होतात अनेक आजार

संसर्गित गाई किंवा बकऱ्यांचं दूध प्यायल्याने ब्रुसेलोसिस हा आजार होतो. तुमच्याकडे गाय असेल तर तिच्या अंगावर झालेल्या छोट्या जखमेतूनही या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. याची लक्षणं फ्लूसारखीच असतात आणि हा आजार अँटिबायोटिक औषधं घेतल्यावर बरा होतो. जगातील अनेक संसर्गजन्य रोग पक्षी किंवा प्राण्यांकडून माणसांमध्ये आले आहेत. जसं पॅरेट फीव्हर. हा आजार आजारी पक्षाच्या श्वासोच्छवासातून पसरतो. आपण त्या संपर्कात आलो तो नाकावाटे तो विषाणू फुफ्फुसांत जातो. ताप, जुलाब, कोरडा खोकला आणि थंडी वाजून येणं ही या आजाराची लक्षणं आहेत. हा आजारही अँटिबायोटिकने होतो.

रेबीज हा प्राण्यांपासून माणसांना होणारा प्राणघातक आजार आहे. जंगली प्राण्यांच्या माध्यमातून या आजाराचा विषाणू पाळीव प्राण्यांच्या शरीरात येतो आणि तिथून माणसाला संसर्ग होतो. पहिल्यांदा फ्लुसारखी लक्षण दिसतात आणि नंतर स्मृतिभ्रंश, पॅरेलिसिस होतो. दरवर्षी जगभरात रेबिजमुळे 50 हजार जणांना प्राण गमवावा लागतो. आधुनिक औषधोपचाराने हा आजार बरा होऊ शकतो.

First published: April 2, 2021, 11:08 PM IST

ताज्या बातम्या