नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : अनेक ठिकाणी साधारणपणे असे दिसून येते की मुलाच्या जन्मापूर्वी आईच्या खाण्या-पिण्याबाबत खूप काळजी घेतली जाते. परंतु, मुलाच्या जन्मानंतर (Post Delivery) सर्वांचे लक्ष बाळाकडे असते आणि त्यानंतर नवमातांना (New Mother) प्रसूतीनंतरच्या समस्यांना सामोरे जावे लागते. वास्तविक, मुलाच्या जन्मानंतरही स्त्रियांना अनेक समस्या असतात जसे शरीरात अशक्तपणा, विविध अवयवांमध्ये वेदना इ. एवढेच नाही तर शरीराचे अंतर्गत अवयव पुन्हा बरे होण्यास वेळ लागतो. या व्यतिरिक्त त्यांना स्तनपानाच्या समस्यांना सामोरे जाताना सर्व प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. अशा परिस्थितीत जर आईचे आरोग्य लवकरात लवकर सुधारले नाही तर बाळाला चांगले पोषण मिळू शकणार नाही. अशा परिस्थितीत काही आयुर्वेदिक पेये आहेत, ज्याद्वारे डिलीव्हरीनंतरच्या समस्या लवकरात लवकर दूर करता येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया ती कोणती पेये आहेत.
1. अश्वगंधा आणि वेलची काढा
प्रसूतीनंतर नवीन मातांना अॅसिडिटी आणि सांधेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. यासाठी तुम्ही एक ग्लास पाण्यात एक चमचा अश्वगंधा आणि दोन वेलची टाकून पाणी गॅसवर उकळू द्या. पाणी अर्धे झाल्यावर गॅस बंद करा आणि हा तयार झालेला काढा गाळून प्या. प्रसूतीनंतर महिलांसाठी हे खूप फायदेशीर आहे.
2. त्रिफळा चहाचे सेवन
त्रिफळाच्या पावडरमध्ये आवळा, हिरडा आणि बेहडा असतो, तो पोटासाठी फायदेशीर आहे. प्रसूतीनंतर महिलांसाठी पोटाच्या कोणत्याही समस्येवर हे फायदेशीर ठरते. अशा स्थितीत दोन चमचे त्रिफळा पावडर दोन कप पाण्यात घालून उकळा. जेव्हा ते अर्धे होईल तेव्हा ते गाळून प्या. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी स्त्रीच्या शरीराला डिटॉक्स करते (अपायकारक घटक बाहेर टाकण्यास मदत) तर हिरडा आणि बेहडा रोग प्रतिकारशक्ती मजबूत करतात.
3. हळद दूध
प्रसुतीनंतर महिलांनी हळद-दूध अवश्य सेवन करावे. त्याच्या सेवनामुळे, गर्भधारणा आणि प्रसूतीमुळे शरीराला झालेले नुकसान भरून निघण्यास मदत होते. शरिराची हानी भरून निघण्यास मदत होते. हे रक्त गोठणे किंवा गर्भाशयाशी संबंधित समस्यांमध्ये देखील फायदेशीर आहे.
हे वाचा - keep liver healthy: लिवर आयुष्यभर राहील चांगली, या गोष्टींचा करा आहारात समावेश
(सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देऊ शकत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pregnancy, Pregnant woman