मुंबई, 06 ऑगस्ट: कित्येक जोडपी ही लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी मग मूल होण्यासाठी प्रयत्न सुरू करतात. यासाठी मग हे कपल्स अनप्रोटेक्टेड सेक्स केल्यानंतर गर्भधारणेची वाट पाहत असतात. कितीतरी वेळा या जोडप्यांना त्वरित परिणाम अपेक्षित असतो. असं न झाल्यास, स्वतःवर किंवा आपल्या पार्टनरवर वंध्यत्त्वाचा (What is Infertility) आरोप करत इनफर्टिलिटी टेस्टची (Infertility Test) घाई केली जाते. पण खरंच एवढ्या लगेच ही चाचणी करणं आवश्यक आहे का? साधारणपणे किती काळानंतर ही चाचणी करावी? (When should we do infertility test) याबाबत लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापिका मंजू पुरी (Manju Puri) यांनी माहिती दिली आहे. आज तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
डॉ. मंजू सांगतात, की इनफर्टिलिटी टेस्टचा विचार करण्याआधी एखाद्या कपलने किमान एक वर्ष वाट पहावी. एक वर्षभर प्रयत्न करुनही गर्भधारणा झाली नाही, तर मग याबाबत तपासणी (Infertility test) सुरू करावी. अर्थात, हे केवळ त्या जोडप्यांसाठी आहे ज्यांचं वय 35 पेक्षा कमी आहे. जोडप्यातील महिलेचं वय 35 पेक्षा अधिक (Infertility after age of 35) असेल, तर मात्र सहा महिन्यांनंतरच चाचणी करुन घ्यावी. यासोबतच ज्या महिलांना अनियमित मासिक पाळी, टीबी किंवा काही प्रसूती किंवा पाळीसंबंधीचे प्रॉब्लेम असतील त्यांनी लवकरात लवकर इनफर्टिलिटी टेस्ट करुन घ्यावी.
हे वाचा-चुंबक रोखणार नको असलेली प्रेग्नन्सी; पुरुषांसाठी नवं गर्भनिरोधक
पुरुषांमध्ये इनफर्टिलिटी तपासण्यासाठी सीमेन ॲनॅलिसिस (Infertility in Males) करतात; तर महिलांमध्ये अल्ट्रासाउंड टेस्ट आणि प्रोजेस्ट्रॉन हार्मोन्सची तपासणी करतात. यासोबतच महिलांमध्ये फेलोपियन ट्यूबचीही (Infertility in Females) चाचणी करण्यात येते. या चाचण्या प्राथमिक स्तरावरील असून, यात काही प्रॉब्लेम आढळून आल्यास पुढील टप्प्यातील चाचण्या आणि इलाज करण्यात येतो. डॉ. मंजू सांगतात, की वंध्यत्त्व ही केवळ महिलांची समस्या नाही. पुरुष किंवा स्त्री दोघांपैकी कोणामध्येही प्रॉब्लेम (Infertility problems) असू शकतो. कित्येक वेळा लोक यासाठी महिलांनाच जबाबदार धरतात. मात्र, मूल होत नसणाऱ्या सुमारे 35 टक्के जोडप्यांमध्ये महिलांसोबतच पुरुषही जबाबदार असतात.
पुरुषांमध्ये हार्मोनल डिसऑर्डर किंवा जेनेटिक डिसऑर्डर या कारणांमुळे (Male Infertility reasons) वंध्यत्त्व येऊ शकते. तसेच, व्हॅरिकोसेलीस या स्थितीमध्येही पुरुष इनफर्टाईल होऊ शकतात. अति मद्यपान, धूम्रपान, अनाबॉलिक स्टेरॉईडचा वापर किंवा नशेच्या पदार्थांचे सेवन अशा गोष्टींमुळेही पुरुषांमध्ये वंध्यत्त्व (Male Infertility causes) येऊ शकते. दुसरीकडे महिलांमध्ये प्रेग्नन्सीसाठी ओव्हरीज, फेलोपियन ट्यूब आणि युटेरस म्हणजेच गर्भाशय हे अवयव चांगल्या पद्धतीने कार्यरत असणे आवश्यक आहे. यांपैकी एक किंवा अधिक अवयवांमध्ये समस्या असल्यास गर्भधारणा होण्यास अडचण येते.
हे वाचा-धक्कादायक! दारूमुळे बळावतोय कॅन्सर; वर्षभरातच सापडले सात लाखांपेक्षा जास्त रुग्ण
अनियमित मासिक पाळीचा त्रास होत असल्यास, ओव्ह्युलेशन प्रक्रिया होण्यास अडचण येते. यामुळे इनफर्टिलिटी टेस्टवेळी डॉक्टर महिलांच्या ओव्हेरियन फंक्शनची चाचणी करतात. मात्र, कोणतीही चाचणी ही प्रजनन क्षमेतेचा अचूक अंदाज बांधू शकत नाही. महिलांमध्येही धूम्रपान, मद्यपान अशा गोष्टी फर्टिलिटीवर (Female Infertility reasons) परिणाम करत असल्या, तरी महिलांचं वय हा एक मोठा मुद्दा असतो. वयाच्या 35 वर्षांनंतर महिलांना गर्भधारणा करण्यास अडचण येते. तसेच, शारिरीक वा मानसिक तणाव, वाढलेले वजन हेदेखील इनफर्टिलिटीसाठी कारणीभूत (Female infertility causes) ठरू शकते.
वंध्यत्त्वावर औषधं, शस्त्रक्रिया, अंतर्गर्भाशयी गर्भाधान (Intrauterine Insemination) किंवा सहाय्यक प्रजजन टेक्निक अशा विविध प्रकारे उपचार शक्य आहेत. कशामुळे वांझपणा आला आहे, महिलेचं वय काय आहे तसेच किती काळापासून प्रयत्न सुरू आहे या सगळ्या गोष्टींवरुन डॉक्टर काय उपाय (Infertility treatment) करायचा हे ठरवतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Pregnancy, Pregnant, Pregnant woman