मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

गुडघेदुखीचा त्रास होईल कमी, आहारात या अँटी-इंफ्लेमेटरी पदार्थांचा करा समावेश

गुडघेदुखीचा त्रास होईल कमी, आहारात या अँटी-इंफ्लेमेटरी पदार्थांचा करा समावेश

Anti-Inflammatory Foods For Knee Pain - गुडघेदुखी संपवण्यासाठी दाहक-विरोधी (अँटी-इंफ्लेमेटरी) पदार्थ महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. दैनंदिन आहारात दाहक-विरोधी पदार्थांचा समावेश केल्यास एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

    नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : गुडघेदुखी ही आता सामान्य समस्या बनली आहे. गुडघेदुखीचे मुख्य कारण म्हणजे सांधेदुखी, त्यामुळे सांध्यांना सूज येते. गुडघेदुखीमुळे चालणे, उठणे, बसणे कठीण होते. ही समस्या स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये आढळते. हिवाळ्यात सांधेदुखीची ही समस्या खूप सतावते. सामान्यतः लोक वेदना कमी करण्यासाठी पेन किलरची मदत घेतात, त्यामुळे लगेच आराम मिळतो पण समस्या मुळापासून संपत नाही. गुडघेदुखी संपवण्यासाठी दाहक-विरोधी (अँटी-इंफ्लेमेटरी) पदार्थ महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. दैनंदिन आहारात दाहक-विरोधी पदार्थांचा समावेश केल्यास एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. भरपूर बेरी खा - हेल्थलाइनच्या माहितीनुसार, बेरी हे एक असे लहान फळ आहे, ज्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात. बेरीमध्ये अँथोसायनिन्स नावाचे अँटिऑक्सिडेंट असतात, ज्यात दाहक-विरोधी प्रभाव असतो. बेरी खाल्ल्याने सांधेदुखी आणि सूजही कमी होते. फॅटी फिश - फॅटी फिश हा प्रथिने आणि ओमेगा-3 फॅटी अ‌ॅसिडचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होते. शरीर या फॅटी ऍसिडचे रूपांतर रेझोलव्हिन्स आणि प्रोटेक्टर्स नावाच्या संयुग पेशींमध्ये करते, ज्यामध्ये दाहक-विरोधी प्रभाव असतो. हेे वाचा -मूळव्याधीवर रामबाण घरगुती उपाय; औषधांचीही गरज पडणार नाही ब्रोकोली - ब्रोकोलीमध्ये भरपूर पोषक घटक असतात. ब्रोकोलीतील सल्फोराफेन हे अँटिऑक्सिडंट आहे, जे सायटोकिन्स आणि कप्पा बी न्यूक्लियर फॅक्टर कमी करून दाह कमी करते. अ‌ॅवाकॅडो फायदेशीर - अ‌ॅवाकॅडोमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि हृदयासाठी निरोगी मोनोसॅच्युरेटेड फॅट असतात. अ‌ॅवाकॅडोमध्ये एक कंपाऊंड असते, जे नव्याने तयार झालेल्या त्वचेच्या पेशींमध्ये जळजळ कमी करू शकते. हे वाचा - तुम्ही तुमच्या तेलकट त्वचेला वैतागलात का? लगेच ट्राय करा 'हे' घरगुती उपाय मशरूम - जगभरात मशरूमच्या हजारो प्रजाती आढळतात, परंतु त्यापैकी फक्त काही खाण्यायोग्य आहेत. मशरूममध्ये कॅलरीज कमी असतात, तर सेलेनियम, कॉपर आणि व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात असतात. मशरूममध्ये फिनॉल आणि इतर अँटिऑक्सिडंट्स देखील असतात जे दाहक-विरोधी संरक्षण देतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या