Home /News /heatlh /

किडनीच्या समस्या ठरू शकतात Silent Killer, 'ही' लक्षणं दिसल्यास तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला

किडनीच्या समस्या ठरू शकतात Silent Killer, 'ही' लक्षणं दिसल्यास तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला

Kidney

Kidney

क्रॉनिक किडनी डिसीजमुळे (CKD) भारतामध्ये दरवर्षी हजारो लोक मृत्यू पावतात. त्यामुळं प्रत्येकानं आपल्या किडनींच्या आरोग्याकडं लक्ष दिलं पाहिजे. जेणे करून मृत्यूचा धोका टाळता येऊ शकतो.

    मुंबई, 19 जानेवारी : आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतो. एखाद्या अवयवामध्ये जरी बिघाड झाला तरी त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतो. किडनी (Kidney) हा मानवी शरीरातील असाच एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात दोन किडनी असतात. रक्तातील युरिया (Urea), क्रिएटिनिन (Creatinine), अॅसिड इत्यादी नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ फिल्टर (Filtration) करण्याचं काम या किडनी करतात. लाखो लोक विविध प्रकारच्या किडनीच्या आजारांसह जगत आहेत आणि चिंतेची बाब म्हणजे यापैकी बहुतेकांना याची जाणीवही नाही. यामुळेच किडनीच्या आजारांना (Kidney disease) 'सायलेंट किलर' म्हणून संबोधलं जातं. कारण, बहुतेक लोकांमध्ये हा आजार गंभीर होईपर्यंत त्याचं निदान होत नाही. किडनीचे आजार कालांतरानं गंभीर होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, किडनीशी संबंधित कोणतीही समस्या तुमच्या एकूण दैनंदिन कामावर परिणाम करते. यासोबतच त्याचा शारीरिक क्षमतेवरही विपरित परिणाम होतो. त्यामुळे किडनीच्या आरोग्याबाबत प्रत्येकानं जागरुक असणं आवश्यक आहे. झी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. वाचा : सामान्य म्हणून तरुणीने 3 महिने सहन केली पाठदुखी; मेडिकल रिपोर्ट पाहताच हादरली किडनीच्या आजाराचा धोका आपल्या शरीरातील रक्त फिल्टर (Blood Filtration) करण्याचं काम किडनी करते. जर किडनी नीट काम करत नसेल तर रक्त फिल्टर करण्याच्या प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो. जर किडनी नीट काम करू शकत नसेल तर ही समस्या कालांतरानं गंभीर रूप धारण करू शकते. यामुळे कदाचित किडनी निकामीदेखील (Kidney failure) होऊ शकते. उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशरमुळे किंवा डायबिटिसमुळे (Diabetes) किडनीशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. याशिवाय स्मोकिंगसुद्धा क्रॉनिक किडनी डिसीजेससाठी (CKD) कारणीभूत ठरते. अवास्तव वाढलेल्या वजनामुळेही किडनीच्या आजाराचा धोका वाढतो. वाचा : तुम्ही Paracetamol चा ओव्हरडोस तर घेत नाहीत ना? घेत असाल तर सावधान! काय असतात समस्या? आपल्या शरीरातील किडनी व्यवस्थित कार्य करत आहेत की नाही हे कसं ओळखावं, हा एक मोठा प्रश्न आहे. क्रॉनिक किडनी डिसीजेस असतील तर शरीरातील रक्त व्यवस्थित फिल्टर होऊ शकत नाही. यामुळं शरीराला खाज सुटणं, स्नायूंचे गोळे तयार होणं, भूक न लागणे, मळमळ आणि उलट्या होणं, पाय आणि घोट्याला सूज येणं, जास्त लघवी होणे किंवा लघवी करण्यास अडचण येणं, अशा समस्या उद्भवतात. क्रॉनिक डिसीजमुळे झोपेची समस्यादेखील जाणवेल. यापैकी काही लक्षणं आढळल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली पाहिजे. काय घ्यावी काळजी? क्रॉनिक किडनी डिसीजचं निदान झालं असेल किंवा त्याची लक्षणं दिसत असतील तर घाबरून जाण्याची गरज नाही. आपल्या लाईफस्टाईलमध्ये (Lifestyle) काही बदल करून या आजारांचा सामना करता येऊ शकतो. संतुलित आहार घेतल्यास क्रॉनिक किडनी डिसीजची तीव्रता कमी करता येते. किडनीच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी जेवणात कमी प्रमाणात मीठ (Salt) खावं. अल्कोहल आणि स्मोकिंग (Alcohol and smoking) या दोन्ही कटाक्षानं टाळल्या पाहिजेत. या दोन्ही गोष्टींमुळं किडनीचे आजार आणखी बळावण्याची शक्यता असते. वाचा : रोज 10 कप कॉफी पिण्याचं व्यसन;अखेर 55 किलोने घटवलं वजन, वाचा तिने नेमकं काय केलं नियमित व्यायामाचा फायदा किडनीच्या आजारांमध्ये वजनवाढीची समस्या जाणवू शकते. त्यामुळं डाएटिशियनचा (Dietitian) सल्ला घेऊन वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे. किडनीच्या समस्येसोबत डायबिटिसही असल्यास ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. अस न केल्यास डायबिटिस भयंकर रूप धारण करू शकतो. फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटींच्या मदतीनंही किडनीच्या समस्यांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकतं. दररोज 30 मिनिटे नियमित व्यायाम केल्यानं नक्कीच फायदा होईल. क्रॉनिक किडनी डिसीजमुळे (CKD) भारतामध्ये दरवर्षी हजारो लोक मृत्यू पावतात. त्यामुळं प्रत्येकानं आपल्या किडनींच्या आरोग्याकडं लक्ष दिलं पाहिजे. जेणे करून मृत्यूचा धोका टाळता येऊ शकतो.
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या