दिल्ली, 4 जून : काळ बदलला तसा मुलांचा (Children favourite snacks) खाऊही बदलला. आता मुलांना घरी बनणारी (Homemade) भाजी-भाकरी, पोहे, शिरा, चिवडा यांची जागा बाजारातल्या (Market ready to eat food) रेडीमेड पदार्थांनी घेतली आहे. मुलांना मैद्यापासून बनलेले पदार्थ जास्त आवडायला लागले आहेत. मॅगी, पास्ता,पिझ्झा, बर्गर यासारखे पदार्थ मुलं आवडीने (Children Like) खातात. मैद्याचे पदार्थ बनवायला सोपे (Easy to make) असतात. पण, मैद्याच्या पदार्थांनी मुलांना पोषण घटक कमी (NO Nutation) मिळतात. एवढंच नाही तर मैदा लहान मुलांच्या वाढीवर विविध प्रकारे परिणाम करतो. मैद्याचा नेमका काय त्रास होतो? मुलांना कशाप्रकारे नुकसान होतं? हे आपण जाणून घेऊ या
रोग प्रतिकारशक्ती कमजोर
मैद्यापासून पदार्थ बनवणं सोपं असल्यामुळे मैद्याचा वापर सर्रास होऊ लागला आहे. शिवाय बाजारांमधील मॅगी, पिझ्झा, बर्गर, चायनीज असे पदार्थ सहजपणे मिळतात त्यामुळे बाहेरून ऑर्डर केले जातात. मात्र, या पदार्थांपासून कोणतेही पोषक घटक आपल्या मुलाला मिळत नाहीत. उलट मुलांची इम्युनिटी (Immunity) कमजोर होत जाते. लहान वयामध्ये डायबिटीस, थायराइड सारख्या समस्या डोकं वर काढू लागल्या आहेत. लहान मुलींना पाळी संदर्भातले त्रास देखील मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे वाढायला लागलेत.
पोटाचे विकार
आहारात फायबर असेल तर, पचनाचे त्रास होत नाहीत. पण, आहारात फायबरचं प्रमाण कमी असेल तर, अन्न पचवण्यास त्रास होतो. मैद्यामध्ये फायबरचं प्रमाण कमी असतं. त्यामुळेच मैद्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखं वाटतं मात्र, हे पदार्थ पचायला जड असतल्याने बद्धकोष्ठतेचा सारखा त्रास होऊन बरेच आजार होऊ शकतात. मैद्याचे पदार्थ आतड्यांना चिटकतात. काही महिला बाळांना दूध बिस्कीट खायला देतात, त्यानेही बाळाला पचनाचे त्रास होतात.
वजन वाढतं
लहान मुलं सगळेच पदार्थ पचवू शकत नाहीत लहान मुलांची वाढ ही त्यांनी घेतलेल्या पोषक घटकांवर अवलंबून असते. मुल 5 वर्षाचं झालं की, मुलांच्या शरीरात चरबी बनायला लागते. त्यामुळे मुलांनी मैद्याचे पदार्थ खाल्ले तर, त्याची चरबी बनवू शकते. त्यामुळे कमी वयातच जास्त वजन वाढायला लागतं. मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे लहान मुलांचं वजन वाढण्याची भीती 98 टक्के आहे.
(Shocking! सेक्स डॉलशी लग्न करणाऱ्या बॉडीबिल्डरने डेटिंगसाठी घातली विचित्र अट)
उंचीवर परिणाम
लहान मुलांची शारीरिक वाढ चांगली झाली तरच ते निरोगी राहू शकतात. मुलांची योग्य वायात उंची वाढणं हा वाढीमधला महत्त्वाचा भाग आहे. उंची काही ठराविक काळापर्यंतच वाढते. लहान वयात मैद्याचे पदार्थ भरपूर प्रमाणात खाल्ल्यामुळे मुलांची उंची खुंटते. यामध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त असल्यामुळे उंचीवर परिणाम होतो.
(धक्कादायक! कोरोनाने चिमुकल्याचं 90% फुफ्फुस पोखरून काढलं, तरी टेस्ट निगेटिव्ह)
मुलांच्या आहाराचं करा योग्य नियोजन
मुलांना बाहेरचे मैद्याचे पदार्थ आवडत असले तरी, जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करा.
मुलांना पोषक पदार्थ खाण्याची सवय लावा. त्यासाठी घरी वेगवेगळे पदार्थ बनवू शकता.
दूध पनीर दही हिरव्या पालेभाज्या फळांचा रस डाळ भात ड्रायफ्रूट्स हे मुलांच्या वाढीसाठी आवश्यक घटक आहेत.
फळ खाण्याची आवड लावा. मुलांना सिजनेबल फूड खाण्याची सवय लावा वेगवेगळ्या सीझनमध्ये येणारी फळं मुलांना द्या ज्यामुळे मुलांना व्हिटॅमिन्स मिळतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips