मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Jeff Bezos मिळवतायत मृत्यूवर विजय, वाढत्या वयावर शोधतायत जालीम उपाय

Jeff Bezos मिळवतायत मृत्यूवर विजय, वाढत्या वयावर शोधतायत जालीम उपाय

माणसाचं आयुष्य कसं वाढवता येईल आणि माणूस म्हातारा होण्याची प्रक्रिया कशी लांबवता येईल, यावर अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस सध्या संशोधन करत आहेत.

माणसाचं आयुष्य कसं वाढवता येईल आणि माणूस म्हातारा होण्याची प्रक्रिया कशी लांबवता येईल, यावर अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस सध्या संशोधन करत आहेत.

माणसाचं आयुष्य कसं वाढवता येईल आणि माणूस म्हातारा होण्याची प्रक्रिया कशी लांबवता येईल, यावर अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस सध्या संशोधन करत आहेत.

वॉशिंग्टन, 24 जानेवारी: अमेझॉन कंपनीचे संस्थापक (Amazon co founder) जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी एका वेगळ्याच मोहिमेला (New Project) हात घातला आहे. वाढत्या वयाला आळा घालणं (Ageing process) आणि मानवाचं आयुर्मान वाढवणं (Increase life) यासाठी नव्या प्रयोगाला त्यांनी सुरुवात केली आहे. अल्टोस लॅब्स नावाची नवी कंपनी त्यांनी स्थापन केली असून मानवाच्या एजिंग प्रक्रियेचा वेग कमी करण्यासाठी काय करता येईल, यावर या कंपनीत संशोधन करण्यात येणार आहे. यासाठी त्यांनी ग्लॅक्सोस्मिथक्लाईन या कंपनीतील प्रसिद्ध शास्त्रज्ञ हैल बेरॉन यांना आपल्या कंपनीत नियुक्त केलं असून कोट्यवधी रुपये संशोधनावर खर्च केले आहेत.

अशी आहे संकल्पना

आपण कसे दिसतो किंवा कसे काम करतो, याचा आणि वाढत्या वयाचा एकमेकांशी काही संबंध नाही. वय वाढण्याची प्रक्रिया ही पेशींशी निगडीत असते. पेशीविभाजनाचा वेग उतारवयात कमी कमी होत जातो आणि लहान वयात तो सर्वाधिक असतो. नवजात बाळाच्या शरीरात 90 ते 100 वेळा पेशींचं विभाजन होत असतं. मध्यम वयात हे 40 ते 50 वेळा होतं. तर उतारवयात हे प्रमाण 20 पर्यंत खाली येतं. त्याचप्रमाणे आपल्या जीन्समुळेही वय वाढण्याची प्रक्रिया होत राहते. प्रत्येकाच्या शरीरातील जेनेटिक मटेरियलही वारंवार बदलत राहतं. त्याचाही परिणाम वय वाढण्याच्या प्रक्रियेच्या वेगावर होत राहतो. शरीरारातील DNA चा देखील या प्रक्रियेवर परिणाम होत असतो. या सगळ्याचा अभ्यास करून अधिकाधिक काळ तरुण कसं राहता येईल, या गोष्टीवर शास्त्रज्ञ लक्ष देणार असून म्हातारं होण्याची प्रक्रिया कमी वेगाने कशी सुरू ठेवता येईल, याचाही शोध लावणार आहेत.

वाढत्या वयाबाबतचे गैरसमज

माणसाचं वय का वाढतं, याबाबत आतापर्यंत बरचसं संशोधन झालं आहे. एक जीव म्हातारा होऊन मरण पावणं आणि दुसरा जीव जन्माला येणं ही प्रक्रिया अविरत सुरू राहण्यासाठी वय होणं आणि मृत्यू होणं ही प्रक्रिया गरजेची आहे, असं सुरुवातीच्या संशोधनात दिसून आलं होतं. मात्र यात अनेक अपवाद असल्याचंही दिसून आलं होतं. अनेक प्राणी आणि माणसं हे अकाली मृत्यूमुखी पडत असल्यामुळे हा समज मागे पडत गेला.

हे वाचा- अमेरिकेच्या Real Estate वर Corona Effect, जुन्या ऑफिसची बनतायत घरं

जग होणार तरूण

अधिकाधिक पैसा हा मानवी आयुष्य वाढवणं आणि अधिकाधिक काळ माणसाला तरुण राहता येणं, यासाठीच्या संशोधनात घालवण्यासाठी जेफ बेझॉस सज्ज झाले आहेत. याची काय फळं जगाला मिळतात, हे पुढच्या काही वर्षात स्पष्ट होईलच.

First published:
top videos

    Tags: Amazon, America