मराठी बातम्या /बातम्या /heatlh /भात खाल्य्यामुळे खरंच वजन वाढतं का? तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं इथे मिळेल उत्तर; वाचा

भात खाल्य्यामुळे खरंच वजन वाढतं का? तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं इथे मिळेल उत्तर; वाचा

यासोबतच तुम्ही भात खाण्याच्या पॅटर्नवर (Pattern) लक्ष दिलं तर तुमचं वजनही वाढणार नाही. त्यामुळे कोणता भात खाताय यापेक्षा तो खाण्याचा पॅटर्न काय हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.

यासोबतच तुम्ही भात खाण्याच्या पॅटर्नवर (Pattern) लक्ष दिलं तर तुमचं वजनही वाढणार नाही. त्यामुळे कोणता भात खाताय यापेक्षा तो खाण्याचा पॅटर्न काय हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.

यासोबतच तुम्ही भात खाण्याच्या पॅटर्नवर (Pattern) लक्ष दिलं तर तुमचं वजनही वाढणार नाही. त्यामुळे कोणता भात खाताय यापेक्षा तो खाण्याचा पॅटर्न काय हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.

  मुंबई, 22 मार्च:  बदलत्या जीवनशैलीमुळे (Life Style) एकीकडे आजारांचं (Disease) प्रमाण वाढत असताना, दुसरीकडे गंभीर आजार दूर राहावेत यासाठी फिटनेसवर भर दिला जात आहे. फिटनेसच्या (Fitness) अनुषंगाने जसा व्यायाम महत्त्वाचा आहे, तसाच आहारही (Diet) पोषक असणं गरजेचं असतं. वाढतं वजन नियंत्रणात आणण्यासाठी, लठ्ठपणा (Obesity) कमी करण्यासाठी आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टींवर भर दिला जातो. याचदरम्यान भात (Rice) खाण्याविषयी अनेकांच्या मनामध्ये संभ्रम असल्याचं दिसून येतं. भात खाल्ल्यानं वजन वाढतं, असा काही जणांचा समज असतो; पण हा समज चुकीचा असून, ही बाब तुम्ही भात केव्हा खाता यावर अवलंबून असते. याविषयीची माहिती देणारं वृत्त `झी न्यूज हिंदी`ने प्रसिद्ध केलं आहे.

  रात्रीच्या जेवणात भात खाल्ल्यास वजन वाढतं, असं अनेक जण मानतात, तर पांढरा भात (White Rice) खाण्याऐवजी ब्राउन राइस खाणं अधिक हितावह असल्याचा काही जणांचा समज आहे. वेगवेगळ्या जातीच्या (Varity) तांदळाचा भात खात असाल, तर तुम्हाला वजनाबाबत चिंता करण्याची गरज नाही. यासोबतच तुम्ही भात खाण्याच्या पॅटर्नवर (Pattern) लक्ष दिलं तर तुमचं वजनही वाढणार नाही. त्यामुळे कोणता भात खाताय यापेक्षा तो खाण्याचा पॅटर्न काय हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.

  esponsibke ही बातमी वाचल्यानंतर सफरचंद खरेदी करण्याअगोदर दहावेळा विचार कराल!

  भात खाल्ल्यानं वजन वाढू लागतं, असं म्हणणाऱ्यांनी भात हा पचनास हलका असतो, ही बाब समजून घेणं आवश्यक आहे. तसंच भात खाण्याची तुमची पद्धत नेमकी कशी आहे याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही खिचडी किंवा डाळ-भात खात असाल तर तर त्यात अमिनो अ‍ॅसिडचं प्रमाण जास्त असतं. यात प्रोटीन (Protein) आणि चांगले फॅट्सही मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे पदार्थ नक्कीच उपयुक्त ठरतात. तांदळात ग्लुटेन (Gluten) असतं, असा काही जणांचा समज असतो; पण पांढऱ्या किंवा ब्राउन राइसमध्ये ग्लुटेन नसतं, ही बाबदेखील महत्त्वाची आहे.

  पांढरा भात खाल्ल्यानं वजन वाढतं म्हणून ब्राउन राइस खाणं हितावह असतं, असं काही जण म्हणतात. तथापि, ब्राउन राइसमुळे वजन कमी होतं, असं नाही. कारण त्यात फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे झिंक (Zinc) पुरेशा प्रमाणात मिळत नाही. रोगप्रतिकारशक्ती योग्य पद्धतीने कार्यरत राहण्यासाठी शरीराला झिंक पुरेशा प्रमाणात मिळणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही कोणता भात खाता यापेक्षा तो खाण्याची पद्धत अर्थात पॅटर्न नेमका कसा आहे, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.

  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Weight loss