Home /News /heatlh /

जास्त नारळ पाणी पिणं आरोग्यासाठी हानीकारक? पाहा काय सांगतात एक्सपर्ट

जास्त नारळ पाणी पिणं आरोग्यासाठी हानीकारक? पाहा काय सांगतात एक्सपर्ट

नारळाला (Coconut) कल्पतरू म्हणतात. खरोखरच नारळाचं पाणी, खोबरं उपयुक्त असतंच. तसंच झाडापासूनही अनेक गोष्टी तयार केल्या जातात. आजारी माणसांना नारळपाणी (Coconut Water) देण्याची पद्धत आहे.

मुंबई, 20 मे : नारळाला (Coconut) कल्पतरू म्हणतात. खरोखरच नारळाचं पाणी, खोबरं उपयुक्त असतंच. तसंच झाडापासूनही अनेक गोष्टी तयार केल्या जातात. आजारी माणसांना नारळपाणी (Coconut Water) देण्याची पद्धत आहे. नारळाचं पाणी उपयुक्त असलं, तरी ते गरजेपेक्षा जास्त प्यायलं, तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. नारळपाणी अतिरिक्त प्रमाणात प्यायल्यास काय होऊ शकतं, याबाबत जाणून घेऊ या. अनेक डाएट प्रोग्राम्समध्ये नारळाच्या पाण्याला महत्त्व दिलं जातं. वजन कमी करणाऱ्या व्यक्ती, तसंच रुग्णांना नारळपाण्यानं आराम पडतो व ऊर्जाही मिळते. शरीरातली पाण्याची कमतरता भरून (Hydrating Properties) काढण्याचं काम शहाळं करतं. तसंच याचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे यामुळे मुरमं (Acne), पुटकुळ्या नाहीशा होऊन त्वचा नितळ (Clear Skin) होते. अशा बहुपयोगी नारळपाण्याचे दुष्परिणाम असतील अशी कोणी कल्पनाही करणार नाही; पण हो, हे खरंच आहे. “नारळपाण्यामध्ये अनेक पोषणमूल्यं असून, ते त्वचेतल्या पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवतं; मात्र अतिरिक्त प्रमाणात प्यायलं, तर त्याचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो,” असं स्टेडफास्ट न्यूट्रिशनिस्टचे संस्थापक व आहारतज्ज्ञ अमन पुरी यांनी सांगितलं. नारळपाणी प्रमाणापेक्षा जास्त प्यायल्यास त्याचा किडनीवर (Kidney) विपरीत परिणाम होतो. नारळपाण्यात पोटॅशिअमचं प्रमाण जास्त असतं. ते प्यायल्यानं शरीरातल्या इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण वाढून पोटॅशिअमची (Potassium) पातळी वाढते. त्यामुळे किडनीचं कार्य बिघडतं. तसंच हृदयाच्या ठोक्यांवरही परिणाम होतो. ज्यांना किडनीचे विकार आहेत, त्यांनी याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असंही पुरी सुचवतात. “किडनीत बिघाड झाला, की लघवीतून होणाऱ्या पोटॅशिअमच्या उत्सर्जनावर परिणाम होतो. त्यातून पुढे हायपरकलेमिया (Hyperkalemia) उद्भवू शकतो,” असं पुरी सांगतात. उच्च रक्तदाब (High Blood Pressure) असणाऱ्यांनीही नारळपाण्याचा आहारात समावेश मर्यादित प्रमाणात केला पाहिजे. यात सोडियमचं प्रमाण जास्त असल्यानं उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचं हेल्थसेकच्या संस्थापक व आहारतज्ज्ञ प्रीतिका बेदी यांचं म्हणणं आहे. यातल्या पोटॅशिअममुळे रक्तदाब एकदम कमी होण्याचीही शक्यता असल्याचं त्या नमूद करतात. इतर फळांच्या सरबतापेक्षा नारळपाण्यात साखरेचं प्रमाण कमी असतं, असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे मधुमेही रुग्ण नारळ ण्यावर भर देतात. “एक कप नारळपाण्यात 6.26 ग्रॅम साखर असते. त्यामुळे मधुमेहींनी (Diabetic Patients) दररोज नारळपाणी पिणं टाळलं पाहिजे. त्यात इतर सरबतांच्या तुलनेत साखर कमी असली, तरी भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात,” असं बेदी सांगतात. नारळपाणी सारक (Laxative) म्हणूनही काम करतं. त्यामुळे ज्यांना शौचाला सतत होण्याची तक्रार आहे, त्यांनी नारळपाणी मर्यादित प्रमाणात घ्यावं, अशी सूचना बेदी यांनी केली आहे. नारळपाणी अतिरिक्त प्रमाणात प्यायल्यानं पोट बिघडू शकतं. तसंच याच्या डाययुरेटिक गुणधर्मामुळे लघवी तयार होण्याचं प्रमाण वाढतं, असं पुरी यांचं म्हणणं आहे. आहारतज्ज्ञ बेदी यांच्या म्हणण्यानुसार, भरपूर व्यायाम करणाऱ्यांनीही भरपूर नारळपाणी पिणं योग्य नसतं. “व्यायामानंतर साधं पाणी प्यावं. कारण त्यात वेगवेगळे क्षार असतात. शरीरातली क्षारांची कमतरता हे पाणी पूर्ण करते. नारळपाणीही पिता येईल; पण ते शरीरासाठी योग्य नसतं,” असं बेदी म्हणाल्या. नारळपाणी दररोज पिण्यापेक्षा आठवड्यातून एकदा अशा प्रमाणात पिणं योग्य राहील, असं तज्ज्ञांचं मत आहे. एकंदरीतच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. नाही तर फायदेशीर ठरणाऱ्या अनेक गोष्टी शरीराला घातक ठरू शकतात.
First published:

Tags: Health, Health Tips

पुढील बातम्या