मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

तुमच्या साबणावर कोरोनाव्हायरस तर नाही ना?

तुमच्या साबणावर कोरोनाव्हायरस तर नाही ना?

इतर पृष्ठभागाप्रमाणे साबणावरही कोरोनाव्हायरस (Coronavirus on soap) असू शकतो का?

इतर पृष्ठभागाप्रमाणे साबणावरही कोरोनाव्हायरस (Coronavirus on soap) असू शकतो का?

इतर पृष्ठभागाप्रमाणे साबणावरही कोरोनाव्हायरस (Coronavirus on soap) असू शकतो का?

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 09 जून : कोरोनाने (Coronavirus) आपली रूपं कितीही बदलली असली तरी कोरोनापासून (Covid-19) बचावासाठी मास्क (Mask), सोशल डिस्टन्सिंग (Social distancing) आणि स्वच्छता हाच बचावाचा मार्ग आहे. कोरोना असलेल्या पृष्ठभागाला स्पर्श झाल्यानंतर तो हातामार्फत नाक, तोंड, डोळ्यांवाटे आपल्या शरीरात जाऊ शकतो. त्यामुळे कोणताही पृष्ठभाग आणि आपले हात वारंवार स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जातो. खरंतर आता ही सवय आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भागच झाली आहे. घराबाहेर असताना हँड सॅनिटायझरने (Hand sanitizer) हात स्वच्छ करतो. तर घरी आपण हँडवॉश (Handwash) किंवा साबण (Soap) वापरतो. पण अनेकदा तुम्ही जाहिरातीतही पाहिलं असेल की एकाच साबणाला अनेकांनी वारंवार हात लावल्याने जर्म्स पसरण्याचा धोका असतो. हेच कोरोनाव्हायरसच्या बाबतीतही लागू होतं का?

कोरोना प्रत्येक पृष्ठभागावरून पसरतो. मग कोरोनाव्हायरस असलेल्या हातांनी एखाद्या साबणाला स्पर्श केला तर त्यावरही कोरोनाव्हायरस राहू शकतो का? आणि साबणामार्फतही कोरोनाव्हायरस पसरू शकतो का? असा प्रश्न तुमच्या मनात कधी तरी आलाच असेल ना? याबाबत न्यूज 18 लोकमतने काही तज्ज्ञांकडून जाणून घेतलं.

हे वाचा - लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्याची तयारी; चिमुकल्यांसाठी खास मेडिसीन किट

बॉम्बे हॉस्पिटलमधील कन्सलटंट फिजिशिअन डॉ. गौतम भन्साली यांनी सांगितलं, "साबणामार्फत व्हायरस पसरूच शकत नाही. उलट साबणामुळे व्हायरस नष्ट होतो. कोरोना संक्रमित व्यक्तीने वापरलेला साबण निरोगी व्यक्तीने वापरला तर त्याला कोरोनाची लागण होते असं काही नाही"

तर जनरल फिजिशिअन डॉ. प्रज्वलित सोनकांबळे यांनी सांगितलं की, "एखाद्याला फंगल इन्फेक्शन असेल आणि तोच साबण दुसऱ्या व्यक्तीने वापरला तर त्या व्यक्तीलाही इन्फेक्शन होऊ शकतं. पण कोरोनाव्हायरससारखं इन्फेक्शन साबणामार्फत पसरू शकत नाही. म्हणून कोरोनापासून बचाव करण्यासाठी साबणाने हात धुण्याचा सल्ला दिला जातो आहे"

हे वाचा - मैद्याचा मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो पाहा, तुम्हीही म्हणाल 'नको रे बाबा'

त्यामुळे निश्चिंत राहा. तुमच्या साबणात कोरोनाव्हायरस नाही तर कोरोनाव्हायरसला दूर ठेवण्याचा आणि नष्ट करण्याचं साबण हे एक मोठं शस्त्र आहे.

First published:

Tags: Health, Lifestyle