मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

मासिक पाळी, प्रेग्नन्सी, रजोनिवृत्ती; या परिस्थितीत मी कोरोना लस घेऊ शकते का?

मासिक पाळी, प्रेग्नन्सी, रजोनिवृत्ती; या परिस्थितीत मी कोरोना लस घेऊ शकते का?

लस कुणाला मिळणार हे ठरवण्यासाठी आणि लसीकरणात प्राधान्य मिळणाऱ्यांच्या याद्या तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना तसं कळवून त्यांच्याकडून यासंदर्भातला डेटाबेस मागवण्यात येणार आहे.

लस कुणाला मिळणार हे ठरवण्यासाठी आणि लसीकरणात प्राधान्य मिळणाऱ्यांच्या याद्या तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना तसं कळवून त्यांच्याकडून यासंदर्भातला डेटाबेस मागवण्यात येणार आहे.

Corona vaccination : 18+ व्यक्तींचं कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. या वयोगटातील कोणत्या व्यक्तींनी विशेषत: कोणत्या महिलांनी कोरोना लस घ्यावी आणि घेऊ नये, याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गंधाली देवरुखकर यांनी केलेलं मार्गदर्शन. पाहा VIDEO

पुढे वाचा ...
  • Published by:  Priya Lad

मुंबई, 28 एप्रिल : 1 मेपासून 18+ व्यक्तींचं कोरोना लसीकरण (Corona vaccination) सुरू होणार आहे. तरुण वर्गाचाही आता लसीकरणात समावेश झाला आहे. या तरुणांच्या इतर काही समस्या आहेत. कोरोना लस (Corona vaccine) घेण्याबाबत त्यांचे प्रश्न हे 45 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींपेक्षा वेगळे आहेत. विशेषत: या तरुण वयोगटातील महिलांच्या समस्या वेगळ्या असतात. मासिक पाळी (Menstrual period and corona vaccination), प्रेग्नन्सी (Pregnancy and corona vaccination), ब्रेस्टफिडिंग (Brastfeeding and coroana vaccination), रजोनिवृत्ती (Menopause and corona vaccination) अशा महिलांनी कोरोना लस घ्यावी की नाही?

कुणी कोरोना लस घ्यावी आणि कुणी नाही, याबाबत सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट फिरत आहेत. विशेषतः मासिक पाळीत कोरोना लस घेऊ नये, असं सांगितलं जातं आहे. याबाबत न्यूज 18 लोकमतने वोक्हार्ट रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गंधाली देवरुखकर यांचा सल्ला घेतला. त्यांनी याबात सविस्तरमार्गदर्शन केलं आहे.

मासिक पाळीत कोरोना लस घ्यावी की नाही?

मासिक पाळीत हार्मोनल बदल होत असतात. शरीराची इम्युनिटी वर्षानुवर्षे तयार होत असते. ती एका दिवसात तयार होत नाही किंवा एका दिवसात कमी होत नाही. आम्ही मासिक पाळीत जीम, एक्सरसाइझ करायला सांगतो. मासिक पाळीत महिला शारीरिक कष्टाची कामंही करतात. त्यामुळे मासिक पाळीत लस घ्यायला काहीच हरकत नाही.

मासिक पाळीत पोटात दुखतं लस घेतल्यानंतर पोटात आणखी दुखेल का?

लशीचे थोडे दुष्परिणाम होतात. पाय दुखणे, सौम्य ताप, डोकेदुखी, थंडी वाजणे, अंगदुखी, पोटऱ्या दुखणे अशा समस्या लस घेतल्यानंतर उद्भवू शकता. मासिक पाळीतच नाही तर लस घेतलेल्या कुणालाही या समस्या जाणवतील.

हे वाचा - कोरोना लस तुम्हाला किती कालावधीसाठी सुरक्षा देऊ शकते?

त्यामुळे अशावेळी लस घेतल्यानंतर घरी आराम करा, पॅरासिटामॉल घ्या आणि खूप पाणी प्या. शरीर हायड्रेट राहणं गरजेचं आहे.

मासिक पाळीत अशक्तपणा जाणवतो, लस घेतल्यावरही गरगरतं? मग लस घेतल्यावर जास्त गंभीर त्रास होईल का?

मासिक पाळीत रक्तदाब कमी होऊ शकतो. अशा वेळी इलेक्ट्रल पावडर, एनर्जी, लिंबू पाणी किंवा साधं पाणी प्यावं त्यामुळे बीपी कमी होणार नाही, गरगरणार नाही. शिवाय लस घ्यायला जाताना काहीतरी खाऊन जावं, उपाशी पोटी जाऊ नये.

कोरोना लशीमुळे प्रजननक्षमतेवर काही परिणाम होईल का?

प्रत्येक महिलेची प्रजननक्षमता ही तिच्या अंडाशयावर, गर्भाशयावर आणि काही हार्मोन्सवर अवलंबून असतात. कोरोना लस कोणतीही असू दे प्रजननक्षमतेवर त्याचा काही परिणाम होत नाही.  लस घेतल्यानंतर प्रेग्नन्सीत काही समस्या होणार नाही.

कोरोना लस घेतल्यानंतर बाळाचं प्लॅनिंग कधी करावं?

कोरोना लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी जाऊ द्यावा. त्यानंतर बेबी प्लॅन करू शकता. आठ आठवड्यांत अँटिबॉडीज तयार होतात. त्यानंतर तुम्ही बाळाचं प्लॅनिंग करू शकता.

गरोदरपणात कोरोना लस घ्यावी का?

गरोदरपणात कोरोना लस घेतल्यानंतर काहीही ष्परिणाम होत नाही. ऑक्सफोर्डमधील एका अभ्यासानुसार लस घेतल्यानंतर त्याचे चांगलेच परिणाम होतात. गरोदरपणात कोरोना झाला तरी त्याचे दुष्परिणाम, लक्षणं कमी होतात. गरोदरपणात लस सुरक्षित आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही लस घेऊ शकता.

कोरोना लस घेतल्यानंतर प्रेग्नंट राहिल्यास काय करायचं?

अशावेळी काहीही करायची गरज नाही. गर्भ राहू द्यावा कारण लशीचा गर्भावर काहीही दुष्परिणाम होणार नाही.

बाळाला दूध पाजत असू तर कोरोना लस घेऊ शकतो का?

बाळाला दूध पाजत असाल तर कोरोना लस घेऊ शकता. उलट तुमच्या रक्तातील अँटिबॉडीज ब्रेस्ट मिल्कमार्फत थोड्या फार प्रमाणात बाळापर्यंतही जाऊ शकतात. त्यामुळे त्यालाही सुरक्षा मिळेल.

हे वाचा - तुम्हालाही करायचंय Oxygen दान? जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

पण गरोदरपणानंतर कोरोना झाला असेल तर आवश्यक ती खबरदारी घेऊन बाळाला स्तनपान करावं. बाळाला जवळ घेताना डबल मास्क, हँड ग्लोव्ह्ज वापरावेत. किंवा ब्रेस्ट पंप करून बाळाला देऊ शकता.

पीसीओडीमध्ये लस घेऊ शकते का?

पीसीओडीमध्ये तुम्ही कोरोना लस घेऊ शकता. अशा महिलांना शुगर वाढणं, वजन वाढणं, मेटाबोलिक सिंड्रोम होऊ शकतो. कोरोना लस घेतली तर उलट या सर्व समस्या कमी होतील. त्यामुळे पीसीओडीग्रस्त महिलांसाठी कोरोना लस खरंतर फायदेशीरच ठरेल, अपायकारक ठरणार नाही.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Pregnent women, Woman