नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय बालिका दिन दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. युनायटेड नेशन्स (UN) च्या आमसभेत हा दिवस मुलींसाठी सन्मानाचा दिवस म्हणून घोषित करणारा ठराव मंजूर करण्यात आला. तेव्हापासून हा दिवस आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. 1995 मध्ये बीजिंगमधील महिलांच्या जागतिक परिषदेत बीजिंग जाहीरनाम्यात सर्वप्रथम महिला आणि मुलींच्या हक्कांसाठी आवाज उठवला गेला. जगभरातील मुलींना भेडसावणाऱ्या समस्या ओळखण्याची ही जगाच्या इतिहासातील पहिली ब्लू प्रिंट होती.
इतिहास काय?
प्लॅन इंटरनॅशनल या स्वयंसेवी संस्थेने 'कारण, मी मुलगी आहे' ही मोहीम म्हणून आंतरराष्ट्रीय बालिका दिनाची सुरुवात केली. ही एक आंतरराष्ट्रीय गैर-सरकारी संस्था आहे, जी सुमारे 70 देशांसाठी काम करते. या संस्था मुलींना त्यांच्या हक्कांसाठी जागरूक करते आणि त्यांचा आवाज वाढवण्याचे काम करते.
या वर्षाची थीम काय?
या वर्षीची थीम 'गर्ल चाइल्ड दिन' म्हणून ठेवण्यात आली आहे. आजची पिढी ही डिजिटल पिढी म्हणून ओळखली जाते. या दिवसाच्या निमित्ताने, जगभरातील मुलींना ऑनलाइन पद्धतीमुळे होणारे त्रास किंवा नुकसानाबद्दल बोलण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान केले जाते. एका अहवालात असे समोर आले आहे की, आजच्या काळात 25 वर्षांखालील 2 अब्ज लोकांकडे इंटरनेटची सुविधा नाही.
हे वाचा - वेट लॉस डाएटमध्ये सामील करा ग्लूटेन फ्री धान्य, पोटभर खाऊनही वजन राहील नियंत्रित
हा दिवस साजरा करण्याचा उद्देश काय?
या दिवसाचा उद्देश म्हणून, सामाजिक कार्यात मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त करण्याचा प्रयत्न केला जातो. मुलींचे आयुष्य चांगले करण्यासाठी अजून बरेच काही करायचे आहे. आजच्या काळात दर दहा मुलांमागे 4 मुली बेरोजगार आणि अशिक्षित आहेत. ही पोकळी भरून काढण्यासाठी, मुलींच्या समस्यांना जागतिक पातळीवर वाचा फोडण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.