मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

'फ्लू' आणि 'सुपर कोल्ड' कोरोनापेक्षा जास्त धोकादायक असू शकतो, जाणून घ्या या तिघांमधील फरक

'फ्लू' आणि 'सुपर कोल्ड' कोरोनापेक्षा जास्त धोकादायक असू शकतो, जाणून घ्या या तिघांमधील फरक

दिवाळीपूर्वीच्या थंडीमध्ये सध्या रुग्णालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी असले तरी 'फ्लू' आणि 'सुपर कोल्ड'चे रुग्ण वाढत आहेत. कोरोनामुळं कमकुवत झालेल्या श्वसनसंस्थेसाठी फ्लू आणि सुपर कोल्डसारखे आजारही धोकादायक ठरत आहेत.

दिवाळीपूर्वीच्या थंडीमध्ये सध्या रुग्णालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी असले तरी 'फ्लू' आणि 'सुपर कोल्ड'चे रुग्ण वाढत आहेत. कोरोनामुळं कमकुवत झालेल्या श्वसनसंस्थेसाठी फ्लू आणि सुपर कोल्डसारखे आजारही धोकादायक ठरत आहेत.

दिवाळीपूर्वीच्या थंडीमध्ये सध्या रुग्णालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी असले तरी 'फ्लू' आणि 'सुपर कोल्ड'चे रुग्ण वाढत आहेत. कोरोनामुळं कमकुवत झालेल्या श्वसनसंस्थेसाठी फ्लू आणि सुपर कोल्डसारखे आजारही धोकादायक ठरत आहेत.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : भारतात सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची गती संथ झाली आहे. मात्र, हिवाळा सुरू होताच कोविडसारखीच लक्षणं असलेला आणखी एक आजार शिरकाव करत आहे. दिवाळीपूर्वीच्या थंडीमध्ये सध्या रुग्णालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी असले तरी 'फ्लू' आणि 'सुपर कोल्ड'चे रुग्ण वाढत आहेत. कोरोनामुळं कमकुवत झालेल्या श्वसनसंस्थेसाठी फ्लू आणि सुपर कोल्डसारखे आजारही धोकादायक ठरत आहेत. याआधी दरवर्षी या आजारांचे रुग्ण औषधांनी बरे होत होते.

इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील रेस्पिरेटरी आणि क्रिटिकल केअर एक्सपर्ट (Respiratory and Critical Care Expert) डॉ. राजेश चावला सांगतात की, सध्या कोरोनाचे रुग्ण खूपच कमी आहेत, पण येत असलेल्या थंडीच्या लाटेमुळं इन्फ्लूएंझा, साधी सर्दी (कॉमन कोल्ड - Common Cold), सुपर कोल्डचा संसर्ग वाढला आहे. विशेषत: हिवाळा सुरू होताच दिवसभरात थोडी थंडी आणि थोडी गरमी असते. अशात हे आजार मुलांना तुलनेनं लवकर होतात. विशेष म्हणजे फ्लू आणि सुपर कोल्ड कधीकधी कोरोनापेक्षाही धोकादायक ठरतात आणि रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवणं भाग पडतं. कारण, यामध्येही रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.

डॉ. चावला सांगतात की, गेल्या वर्षीपासून कोरोनासंसर्गही सुरू आहे. त्यामुळं कोविड असल्याच्या शंकेमुळं बहुतेक रुग्ण फ्लू किंवा सर्दी असली तरीही रुग्णालयात येत आहेत. त्यामुळे ते या आजारांवर उपचार घेत आहेत. मात्र, कोरोनासंसर्गाची लक्षणं आणि या दोन आजारांमध्ये बराच फरक आहे.

अशा प्रकारे कोरोना ओळखा, ही आहेत त्याची लक्षणे

कोरोनाचे मुख्य लक्षण म्हणजे ताप येणं. गेल्या वर्षी असे दिसून आले होतं की कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना तापही येत नव्हता. परंतु, एक गोष्ट स्पष्ट झाली होती की, कोरोनाबाधित झाल्यानंतर लोकांना वास येणं बंद होत होतं आणि चव लागत नव्हती. असं काही जणांमध्ये 14 दिवसांपर्यंत किंवा एक महिन्यापर्यंतही होऊ शकतं. इतकंच नाही तर, काही वेळा उलट्या, जुलाब, नाक बंद होणं किंवा घसा खवखवणं ही देखील बदललेल्या लक्षणांमध्ये आढळून आली. तथापि, ताप जास्त नसल्यास घाबरण्याची गरज नाही आणि स्वत:ला वेगळे करून (quarantine - क्वारंटाईन - विलगीकरण) तो बरा होऊ शकतो.

सुपर कोल्ड काय आहे?

डॉ. चावला म्हणतात की, कोरोनानंतर पहिल्यांदाच सुपर कोल्ड हा शब्द समोर येत आहे. नाहीतर, ही सामान्य सर्दीच आहे. ही सहसा हिवाळा सुरू होण्यापूर्वी हवामानातील बदलांमुळं होते. या काळात लोक थंडी आणि उष्णता या हवामानातील दोन्हीं बदलांमुळं आजारी पडतात. हवामान थंड असतं पण पुढच्याच क्षणी उकडायला लागतं. अशा परिस्थितीत थंडीमुळं सर्दी, नाक वाहणं किंवा बंद होणं, खोकला, छातीत दुखणं, कफ घट्ट होणं, सर्दी किंवा घसा खवखवण्यामुळं घशात दुखणं अशा समस्या वाढतात. विशेषत: मुलांना हा त्रास होतो. प्रौढांनाही त्याचा सामना करावा लागू शकतो.

इन्फ्लूएंझा किंवा फ्लूमध्ये ही आहेत लक्षणं

इन्फ्लूएंझा किंवा फ्लूमुळं होणारी सामान्य सर्दी विषाणूमुळं होते. हे सहसा एकाकडून दुसऱ्याकडे पसरतं. एखाद्याला फ्लू झाला असेल आणि त्याच्या संपर्कात इतर व्यक्ती आल्या तर त्यांनाही फ्लू होऊ शकतो. हे रुग्णामध्ये एक ते दीड आठवडे टिकू शकतं. यामध्येही रुग्णाला सर्दी आणि फ्लू होतो आणि शरीरात ताप राहतो. ताप फारसा नसला तरी यामध्ये नाकही सतत वाहू शकतं. तोंड आणि नाक लाल राहतं. डोकेदुखीदेखील राहू शकते. स्नायू कडक होणे किंवा वेदना, कोरडा खोकला, अत्यंत थकवादेखील येऊ शकतो.

हे वाचा - क्या बात है! भारताची ‘ही’ मोठी कंपनी कायम सुरु ठेवणार Work From Home; कर्मचाऱ्यांना असणार चॉईस

यापैकी कोणताही आजार असो, या सुरक्षेच्या उपायांचं करा पालन

डॉ. चावला सांगतात की, या आजारांवर डॉक्टरांकडून उपचार घेण्यासोबतच इतर लोकांमध्ये आजार पसरू नयेत आणि ते टाळता यावेत, यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना केल्या पाहिजेत.

. खोकताना किंवा शिंकताना नेहमी तोंडावर आणि नाकावर टिश्यू पेपर किंवा रुमाल ठेवा. याशिवाय बाहेर जातानाही धूळ किंवा माती टाळण्यासाठी नाक झाकून ठेवा.

. तुम्हाला फ्लू किंवा सामान्य सर्दी असो, तुमचा वापरलेला रुमाल ताबडतोब धुवून टाका किंवा टिश्यू पेपर थेट डस्टबिनमध्ये टाका. हात साबणाने किंवा सॅनिटायझरनं स्वच्छ करा. या वस्तू इतर कोणाच्याही संपर्कात येऊ देऊ नका.

हे वाचा - Facebook च्या नावात बदल झाल्याने युजर्सवर काय परिणाम होणार? Mark Zuckerberg यांनी दिली माहिती

. तुम्हाला कोरोनाची लागण झाली असल्यास किमान दोन आठवडे, फ्लू असल्यास किमान 5 दिवस आणि सर्दी असल्यास दोन दिवस स्वत:ला अलग ठेवण्याचा प्रयत्न करा. यादरम्यान, विशेषत: जर तुम्ही दरवाजाच्या हँडलला, रेलिंगला आणि नळाला स्पर्श केला तर, ते नियमितपणे जंतुनाशकानं स्वच्छ करा.

. फ्लू किंवा सर्दी झालेल्या रुग्णांच्या संपर्कात येणं टाळा.

. यादरम्यान, मुलांची विशेष काळजी घ्या, त्यांना घाम येणारे खूप गरम कपडे घालू नका किंवा खूप हलके कपडेही घालू नका ज्यामुळं त्यांना थंडी पडेल. त्यांना सामान्य तापमानात ठेवा.

First published:

Tags: Coronavirus, Winter, Winter session