मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

बापरे! डोळ्यात घुसल्या 3 जिवंत माश्या; उपचारासाठी अमेरिकन महिला भारतात

बापरे! डोळ्यात घुसल्या 3 जिवंत माश्या; उपचारासाठी अमेरिकन महिला भारतात

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

अमेरिकन डॉक्टरांनीही जमलं नाही पण भारतीय डॉक्टरांनी या महिलेच्या डोळ्यातून 3 जिवंत माश्या बाहेर काढल्या आहेत.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात नाजूक भाग. डोळ्यात काही गेलं की आपल्याला त्रास होतो. एका महिलेच्या डोळ्यात तर चक्क माश्या घुसल्या (3 Live botflies in eye). महत्त्वाचं म्हणजे सामान्यपणे बहुतेक लोक उपचारासाठी आपला देश सोडून अमेरिकेसारख्या प्रगत देशात जातात पण या अमेरिकन महिलेला मात्र डोळ्यातील माश्या बाहेर काढण्यासाठी अमेरिका सोडून भारतात आली.

32 वर्षांची ही महिला काही आठवड्यांपूर्वी पापण्या मिटल्या की तिला डोळ्यात काहीतरी आहे, असं जाणवत होतं. पापण्या सुजल्या होत्या, त्यावर लाल चकत्याही आल्या होत्या. तपासणीत तिच्या डोळ्यात माश्या असल्याचं निदान झालं.

तपासणीत तिला मियासिस नावाच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. मानवी ऊतकांमधील माश्यांच्या अळ्यांचं संक्रमण आहे. उष्ण प्रदेशात याची प्रकरणं जास्त असतात.  2 महिन्यांपूर्वी ही महिला अमेरिकेतील अॅमेझॉन फॉरेस्टमध्ये फिरायला गेली होती. तिथं तिच्या डोळ्यात बॉट माशी घुसली (Botflies In Woman’s Eye). जंगलात फिरत असतान तिच्या डोळ्यात ही माशी गेली असावी. बॉट माश्या नाक किंवा त्वचेवरील जखमांच्या मार्गातून शरीरात जातात आणि शरीरात संसर्ग पसरवतात.

हे वाचा - श्वास घेण्यास होत होता त्रास; तपासणीत नाकात दिसली अशी गोष्ट की डॉक्टरही शॉक

या महिलेवर उपचार करणं अमेरिकेतील डॉक्टरांनीही जमलं नाही. उपचारासाठी ती भारतात आली. दिल्लीच्या वसंत कुंजमधील फोर्टिस रुग्णालयात तिच्यावर उपचार झाले. इथल्या डॉक्टरांनी तिच्या डोळ्यात एक-दोन नाही तर 3 बॉटफ्लाइझ बाहेर काढल्या. धक्कादायक म्हणजे या तिन्ही माश्या जिवंत होत्या. तब्बल 2 सेंटीमीटर लांबीच्या या माश्या.

भारतातील डॉक्टर मोहम्मद नदीम यांनी या महिलेवर सर्जरी केली. एनेस्थिसिया म्हणजे गुंगीचं औषध न देता तिची सर्जरी करण्यात आली. यासाठी 10 ते 15 मिनिटांचा कालावधी लागला. सर्जरीनंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

First published:

Tags: America, Eyes damage, Health, Lifestyle