मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

winter diet plan : हिवाळ्यात आजारापासून राहायचं दूर? 'या' फळांचा आहारात करा समावेश

winter diet plan : हिवाळ्यात आजारापासून राहायचं दूर? 'या' फळांचा आहारात करा समावेश


हिवाळ्यामध्ये सर्दी-पडसं असे अनेक आजार होतात. निरोगी राहण्यासाठी खाण्या-पिण्यावर अधिक लक्ष दिलं जाणं अत्यंत आवश्यक आहे.

हिवाळ्यामध्ये सर्दी-पडसं असे अनेक आजार होतात. निरोगी राहण्यासाठी खाण्या-पिण्यावर अधिक लक्ष दिलं जाणं अत्यंत आवश्यक आहे.

हिवाळ्यामध्ये सर्दी-पडसं असे अनेक आजार होतात. निरोगी राहण्यासाठी खाण्या-पिण्यावर अधिक लक्ष दिलं जाणं अत्यंत आवश्यक आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

हिवाळ्यामध्ये आहाराकडे अधिक लक्ष देणं आवश्यक असतं. इतर ऋतुंच्या तुलनेत हिवाळ्यात अधिक भूक लागत असते. शरीराचं तापमान टिकवून ठेवण्यासाठी अधिक ऊर्जेची गरज भासते. त्यामुळे या ऋतूत योग्य व पौष्टिक पदार्थ खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हिवाळ्यात शरीर, मेंदूला अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी बदाम, केळी, हळदीचं दूध, चेरीचा ज्युस आदी गोष्टींचा आहारात समावेश केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो.

हिवाळ्यामध्ये सर्दी-पडसं असे अनेक आजार होतात. निरोगी राहण्यासाठी खाण्या-पिण्यावर अधिक लक्ष दिलं जाणं अत्यंत आवश्यक आहे. आजारांपासून दूर राहायचं असेल तर आहारात काही विशिष्ट गोष्टींचा समावेश करायला हवा. आरोग्याच्या दृष्टीनं ते फायदेशीर ठरू शकतं. डायट म्हटलं की, नेहमी नाश्ता आणि दिवसाच्या जेवणाचा विचार केला जातो. परंतु, रात्रीच्या वेळी घेतल्या जाणाऱ्या आहाराचा प्रकृतीवर थेट परिणाम होत असतो. रात्री झोपण्याच्या वेळी डायटमध्ये काही विशिष्ट गोष्टींचा समावेश केल्यास आजार दूर पळून जाण्यास मदत होऊ शकते.

(शरीरातील युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करतात ‘या’ बिया; आहारात समावेश केल्यास खूप फायदा)

थंडीत बदाम खाणं ठरेल फायदेशीर

हिवाळ्यात बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. बदामांमध्ये अनेक पोषक घटक असतात. यात अँटिऑक्सिडंट्स, अमिनो अॅसिड आणि व्हिटॅमिनसारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. हिवाळ्यात रात्रीच्या वेळी बदाम खाणं आरोग्याच्या दृष्टीने खूप फायद्याचं आहे. बदामामुळे शरीराला ऊर्जा मिळते, शरीर आणि मेंदूला अॅक्टिव्ह ठेवण्याचं काम बदामाद्वारे होऊ शकते.

हाडं, स्नायूसाठी केळी उपयुक्त

हिवाळ्यात थंडी असल्यानं बहुतांशी लोक केळी खाण्यास टाळाटाळ करतात. परंतु, आरोग्यासाठी केळी खूप फायदेशीर आहेत. हाडं, स्नायूंना बळकट करण्यासाठी केळीतील पोषक घटक महत्त्वाचे आहेत. रात्री झोपण्याआधी केळी खाल्ल्यास शरीराला आराम मिळतो व शांत झोप लागते.

('या' कारणांमुळे शरीरात रक्तस्राव होऊ शकतो, लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष)

हळद घातलेलं दूध

हिवाळ्यामध्ये हळदीचं दूध खूप फायदेशीर ठरू शकतं. हळद आणि दुधातील पोषक घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते. रात्री झोपण्याच्या आधी हळद मिक्स केलेलं दूध प्यायला हवं. हळदीत अँटिबॅक्टेरियल आणि अँटिइन्फ्लमेटरी गुण आहेत. हाडं आणि स्नायूंच्या वेदनेपासून यामुळे आराम मिळतो. हळदीच्या दुधामुळे आजार दूर राहतील आणि तुम्ही निरोगी राहाल.

चेरी ज्युसमुळे जाईल थकवा

रात्री झोपण्याआधी चेरीचा ज्युस प्यायल्यास त्याचा चांगला फायदा मिळू शकतो. चेरीत समाविष्ट असलेल्या पोषक घटकांमुळे तुमचा थकवा दूर होऊ शकतो. हिवाळ्यात आवर्जून चेरीचे ज्यूस प्यायला हवे. दरम्यान, हिवाळ्यात शरीरातील ऊर्जा राखण्यासाठी आहारात बदाम, चेरी, केळी यांचा समावेश असल्यास नक्कीच फायदा होता. सर्वसामान्य माहितीच्या आधारे ही आहाराबाबत सांगितले गेले आहे. परंतु प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असल्या कारणाने हिवाळ्यात तुमच्यासाठी कुठला आहार योग्य हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेतलेला बरा.

First published: