मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

रोज रात्री झोपताना हा मसाल्याचा पदार्थ खा, Immunity होईल डबल

रोज रात्री झोपताना हा मसाल्याचा पदार्थ खा, Immunity होईल डबल

रोज रात्री झोपताना या वस्तूचं सेवन Immunity होईल डबल

रोज रात्री झोपताना या वस्तूचं सेवन Immunity होईल डबल

Immunity Booster: जेवणामध्ये वापरली जाणारी लवंग (Cloves) हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. त्यामुळे जेवणाची चव (Taste) वाढते, तोंडाला चव येतेच, पण प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचा खूप फायदा आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई: भारतीय मसाल्यांमध्ये (Indian Spice) औषधी गुण आहेत, याची जाणीव आता जगाला झाली आहे. यातले काही पदार्थ नुसते चव वाढवण्यासाठी नव्हे किंवा लज्जतदार जेवण तयार होण्यासाठीच नाही तर आरोग्याला फायदे म्हणूनही खाल्ले पाहिजेत. मसाल्याच्या पदार्थांमध्ये  लवंगांना महत्त्वपूर्ण आहेत. यामुळे केवळ अन्नाची चवच वाढत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर (Beneficial for health) आहे. सध्याच्या रोग संक्रमण काळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लवंगेचा खूप उपयोग होऊ शकतो.

हजारो वर्षांपासून भारतीय आयुर्वेदात लवंगांचा औषध (Medicine) म्हणून वापर होतो. एवढंच नाही तर शास्त्रज्ञांनी लवंगांच्या उपयोगी  गुणधर्मांवर (useful properties of cloves) संशोधन केलं आहे. खोकला, सर्दीपासून पोटदुखीवरच्या उपचारात लवंग वापरतात. पण या छोट्याश्या दिसणाऱ्या लवंगा पार्किन्सन सारख्या मोठ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी वापरला केला जातात. यात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, फॉलीक ऍसिड, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन ए, थायमिन, व्हिटॅमिन डी, ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् असे फायदेशीर घटक आहेत. याशिवाय यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत.

लवंगेचा वापर

रात्रीच्या जेवणानंतर दररोज झोपण्याआधी दोन लवंगा चघळाव्यात. त्यासोबत  गरम पाणी पायल्यास लवंगांचा चांगला फायदा होता. या प्रकारे लवंगा खाण्याने शरीरातील काही आजार हळूहळू कमी होऊन पूर्ण संपतात.

लवंगेचा फायदा

रात्री कोमट पाण्यासोबत घेण्याने बद्धकोष्ठता,अतिसार, अॅसिडीटीची समस्या दूर होते. लवंगांमध्ये अँटी-बॅक्टेरिया आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत,ज्यामुळे मुरुमांचा त्रास दूर होतो.

दात दुखत असतील तर लवंग रात्री कोमट पाण्याबरोबर खा. त्यामुळे दात दुखीत आराम मिळेल आणि इन्फेक्शन कमी होईल.

घशाची खवखव,वेदना किंवा खोकला झाला असेल. तर, रात्रीच्यावेळी लवंग खावी. आराम मिळेल.

हातपाय कापत असतील तर, रात्रीच्या जेवणानंतर लवंग खा आणि गरम पाणी प्या. असे दररोज केल्याने हळूहळू आराम मिळेल.

रात्री लवंगेचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्तीत वेगाने वाढ होतो. व्हायरल इन्फेक्शन, ब्राँकायटिस, सायनस आणि दम्यामध्ये आराम देते.

लवंग हाडे मजबूत आणि निरोगी ठेवते. रक्तातील साखर आणि मधुमेह नियंत्रित करते.

रात्री लवंग खाल्याने स्ट्रेस कमी होतो. लिव्हरचे कार्य सुरळीत राहते.

First published:

Tags: Coronavirus, Health, Health Tips, Home remedies