मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

मळमळ, उलटी, सतत डोकं दुखत असल्यास ब्रेन ट्युमरचा असू शकतो धोका; अशी घ्या काळजी

मळमळ, उलटी, सतत डोकं दुखत असल्यास ब्रेन ट्युमरचा असू शकतो धोका; अशी घ्या काळजी

वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये ट्युमरची वाढ भिन्न असू शकते. काही महिने ते वर्षांपर्यंत ट्युमर वाढू शकतो. या ट्युमरची व्याप्ती किती वेगाने वाढते यावर बऱ्याच बाबी अवलंबून असतात.

वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये ट्युमरची वाढ भिन्न असू शकते. काही महिने ते वर्षांपर्यंत ट्युमर वाढू शकतो. या ट्युमरची व्याप्ती किती वेगाने वाढते यावर बऱ्याच बाबी अवलंबून असतात.

वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये ट्युमरची वाढ भिन्न असू शकते. काही महिने ते वर्षांपर्यंत ट्युमर वाढू शकतो. या ट्युमरची व्याप्ती किती वेगाने वाढते यावर बऱ्याच बाबी अवलंबून असतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Lanja, India

नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव आणि ताणतणावाचे जीवन या कारणांमुळे सध्या हृदयरोग, डायबेटिससह अनेक दुर्धर आजार जडत आहेत. यात मेंदूशी संबंधित आजारही होण्याचं प्रमाण बरचं वाढत आहे. मेंदूत गाठ म्हणजेच ब्रेन ट्युमर झाल्याचं आपण अनेकदा ऐकत असतो. हा आजार फार घातक स्वरूपाचा आहे. याची लक्षणं वेळीच ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. मेंदूमध्ये एखादी गाठ विकसित होत असेल तर त्याचे संकेत आधीच मिळतात. या संदर्भात ‘एनडीटीव्ही इंडिया हिंदी’नं वृत्त दिलं आहे.

मेंदूमध्ये गाठ विकसित होत असेल तर डोकेदुखी, चक्कर येणं आदी लक्षणं दिसून येतात. मेंदूत गाठ असण्याचं हे संकेत असू शकतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणं आणि त्यांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एखादा सौम्य वाटणारा ट्युमर आकाराने मोठा आणि घातक ठरू शकतो. तो ब्रेन ट्युमर असल्याचा धोका काही लक्षणांवरून लगेच लक्षात येऊ शकतो. ब्रेन ट्युमर म्हणजे नेमका काय आहे, तो कसा होतो यावर सविस्तर जाणून घेऊयात.

दोन कारणांनी ब्रेन ट्युमरची लक्षणं निर्माण होऊ शकतात, असं कॅन्सर रिसर्च यूकेच्या वतीनं सांगितल गेलं आहे. यात कवटीमध्ये ट्युमर वाढला तर आतमध्ये जागा व्यापून घेतो. वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये ट्युमरची वाढ भिन्न असू शकते. काही महिने ते वर्षांपर्यंत ट्युमर वाढू शकतो. या ट्युमरची व्याप्ती किती वेगाने वाढते यावर बऱ्याच बाबी अवलंबून असतात.

या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

ब्रेन ट्युमर वाढत असताना विविध लक्षणं दिसून येतात. याकडे दुर्लक्ष करणं खूप घातक ठरतं. यात डोकेदुखी हळूहळू वाढत जाते व नंतर याचं स्वरूप अधिक गंभीर बनतं. मळमळणं, उलटी होणं, कमी दिसणं, हातपायातील संवेदना कमी होणं, हालचाल मंदावणं, तोल जाणं, बोलताना शब्द अडखळणं, थकवा, दैनंदिन क्रिया करताना अडचणी, स्नायूंचं आकुंचन ही लक्षणं दिसत असतील तर ते ब्रेन ट्युमरचे संकेत असू शकतात. यावर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

ब्रेन ट्युमरचा सर्वाधिक धोका कोणाला?

ब्रेन ट्युमर कोणाला व कुठल्या कारणानं होऊ शकतो, याचा अंदाज लावणं अवघड आहे. रेडिएशनच्या संपर्कात आल्यानं मेंदूत गाठ होण्याचा धोका वाढू शकतो. जे लोक आयोनायझिंग रेडिएशनच्या सतत संपर्कात येतात त्यांना ब्रेन ट्युमरचा धोका वाढतो. अनुवंशिक कारणानंही ब्रेन ट्युमर होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला ब्रेन ट्युमर झालेला असेल तर पुढच्या पिढीतील एखाद्या व्यक्तीला याचा सामना करावा लागू शकतो.

हे वाचा - जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ करणे योग्य आहे का? पाहा आरोग्यावर कसा होतो परिणाम

दरम्यान, ब्रेन ट्युमर हा एक जीवघेणा आजार ठरू शकतो. वरील लक्षणं दिसताच वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. यात विविध प्रकारच्या तपासण्या करून डॉक्टर यावर उपचार करण्यासंदर्भात निर्णय घेत असतात.

First published:

Tags: Health, Health Tips