मराठी बातम्या /बातम्या /heatlh /चेहऱ्यावर दिसतंय Hyperpigmentation? वाचा काय आहेत कारणं आणि त्यावरील उपाय

चेहऱ्यावर दिसतंय Hyperpigmentation? वाचा काय आहेत कारणं आणि त्यावरील उपाय

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

अनेक जणांना हायपरपिग्मेंटेशनची (What is Hyperpigmentation?) समस्या जाणवते. ही त्वचेची अशी समस्या आहे, की ज्यात त्वचेचा काही भाग जास्त गडद रंगाचा दिसू लागतो

  मुंबई, 17 नोव्हेंबर: वय वाढत जातं, तसतसं चेहऱ्यावर डाग पडणं किंवा आणखी काही समस्या अनेकांना जाणवतात. साहजिकच कोणालाही ते नको असतं. कारण आपला चेहरा सुंदर दिसावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. अनेक जणांना हायपरपिग्मेंटेशनची (What is Hyperpigmentation?) समस्या जाणवते. ही त्वचेची अशी समस्या आहे, की ज्यात त्वचेचा काही भाग जास्त गडद रंगाचा दिसू लागतो. त्यामुळे तो विचित्र दिसतो. त्वचेवर जास्त प्रमाणात मेलॅनिनचं उत्पादन झाल्यास हायपरपिग्मेंटेशनची समस्या उद्भवते. मेलॅनिन (Melanin) हे एक प्रकारचं प्रोटीन असून, ते त्वचेला तिचा नैसर्गिक रंग देण्याचं काम करतं; मात्र पिग्मेंटेशन डिसॉर्डरमुळे हळूहळू त्वचेचा रंग गडद होऊ लागतो. त्यामागची कारणं जाणून घेऊ या.

  हायपरपिग्मेंटेशनचे काय आहे कारण?

  >> थेट उन्हात जास्त वेळ राहणं होत असेल, तर त्वचेचा रंग गडद होऊ लागतो आणि ती पिग्मेंटेड दिसू लागते. त्यामुळे थेट ऊन बराच काळ त्वचेवर पडणार नाही, याची काळजी घेतली, तर हा दुष्परिणाम टाळता येऊ शकतो.

  हे वाचा-सांधे जखडत असतील तर या 5 गोष्टी खाण्याचे टाळाच; हिवाळ्यात होतो जास्तच त्रास

  >> पोस्ट इन्फ्लेमेटरी हायपरपिग्मेंटेशनमुळेही (Post Inflammatory Hyperpigmentation) त्वचेवर गडद काळ्या किंवा भुऱ्या रंगाचे डाग पडू शकतात. त्याशिवाय त्वचेवर जखम किंवा तारुण्यपिटिकांमुळेही डाग पडू शकतात.

  >> अनेकदा काही औषधांच्या साइड-इफेक्ट्समुळेही हायपरपिग्मेंटेशन होऊ शकतं. मलेरियावरची औषधं, ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट्स यांच्या साइड इफेक्ट्समुळे हायपरपिग्मेंटेशन होऊ शकतं. या साइड इफेक्ट्समुळे (Side Effects of Drugs) त्वचा संवेदनशील (Sensitive Skin) बनते आणि त्वचेचा रंग गडद होऊ लागतो.

  >> काही वेळा वय वाढत जाणं हेदेखील पिग्मेंटेशनचं कारण असू शकतं.

  हे वाचा-मिठाई नाही, चपाती नाही! जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचं रहस्य माहीत आहे का?

  कशाप्रकारे कमी कराल ही समस्या?

  >> हायपरपिग्मेंटेशन कमी करण्यासाठी सफरचंदाचा रस (Apple) नियमितपणे त्वचेच्या त्या भागावर लावावा. त्यामध्ये पॉलिफोनिक संयुगं असतात. ती हायपरपिग्मेंटेशन कमी करण्याचं काम करू शकतात.

  >> उन्हात जाताना सनग्लासेस (Sunglasses), स्कार्फ (Scarf) यांचा वापर करावा. उन्हात जास्त काळ राहायचं असेल, तर सनस्क्रीनचा वापर करावा. त्वचा पूर्णतः झाकलेली राहील, अशा प्रकारचे कपडे घालावेत.

  >> दिवसभरात आवश्यकतेएवढं पाणी पिणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण चांगलं राहतं आणि त्वचाही तजेलदार राहते.

  हे वाचा-Tummy Fat : पोटावरील चरबी होईल गायब; रेझिस्टन्स बँडसोबत घरीच करा हे 3 व्यायाम

  >> हायपरपिग्मेंटेशन झालेल्या ठिकाणी चंदन लावल्याने डाग थोडा सौम्य होण्यास मदत होते.

  >> त्वचेचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हळदीचा वापरही गुणकारी ठरतो. तसंच, त्वचेला तेल लावणंही फायद्याचं ठरतं. अर्थात कोणतं तेल किती प्रमाणात आणि कधी लावायचं, हे आयुर्वेद तज्ज्ञाच्या सल्ल्याने ठरवावं.

  First published:

  Tags: Health, Health Tips