Home /News /heatlh /

OMG! Mermaid baby, जन्माला आलं माशासारखं शरीर असलेलं बाळ

OMG! Mermaid baby, जन्माला आलं माशासारखं शरीर असलेलं बाळ

एका दुर्मिळ आजारामुळे या बाळाचं शरीर असं माशासारखं (mermaid baby) होतं.

    पी.व्ही. रमणा कुमार/हैदराबाद, 12 मार्च : माशासारखं (Fish) शरीर असलेल्या महिला ज्यांना मर्मेड (Mermaid) म्हटलं जातं. बऱ्याच व्हिडीओत तुम्ही अशा मर्मेड पाहिल्या असतील. असंच माशासारखं शरीर असलेलं एक बाळ जन्माला आलं. हैदराबादमध्ये mermaid baby चा जन्म झाला. एका दुर्मिळ आजारामुळे या बाळाचं शरीर असं माशासारखं होतं. हैदराबादच्या पेट्लाबुर्ज मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये एका महिलेनं मर्मेड बेबीला जन्म दिला. बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास हे बाळ जन्माला आलं. त्याचे दोन्ही पाय एकमेकांना चिकटलेले होते. त्याच्या शरीराच्या खालील भाग माशासारखा होता.  या बाळाला Sirenomelia ज्याला Mermaid Syndrome म्हटलं जातं असा दुर्मिळ आजार होता. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हे बाळ जन्माला आल्यानंतर दोन तासांतच त्याचा मृत्यू झाला. असे बाळ दुर्मिळ पाहायला मिळतात. हा सिंड्रोम असलेल्यांना लिंग नसतं, दोन्ही किडनीही नसता त्यांना पाठीच्या कण्याचीही समस्या असते. हे वाचा - आईच्या गोड Kiss चा चमत्कार; टळली बाळासोबत होणारी मोठी दुर्घटना; पाहा VIDEO अशी बाळं क्वचितच जगतात. पीटीआयच्या रिपोर्टनुसार 2018 साली महाराष्ट्रातील अंबोजोगाईतल्या स्वामी रामानंद तीर्थ हॉस्पिटलमध्येही असंच बाळ जन्माला ालं होतं. ज्याचा जन्मानंतर 15 मिनिटांतच मृत्यू झाला. 2017 साली देखील असं बाळ जन्मलं जे फक्त चार तास जगलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Small baby

    पुढील बातम्या