मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

धोका वाढला! पहिल्यांदाच माणसामुळे श्वानाला मंकीपॉक्सची लागण; WHO ने केलं अलर्ट

धोका वाढला! पहिल्यांदाच माणसामुळे श्वानाला मंकीपॉक्सची लागण; WHO ने केलं अलर्ट

माणसामुळे श्वानालाही मंकीपॉक्सचा संसर्ग. (प्रतीकात्मक फोटो)

माणसामुळे श्वानालाही मंकीपॉक्सचा संसर्ग. (प्रतीकात्मक फोटो)

माणसामुळे एका प्राण्यालाही मंकीपॉक्सची लागण झाल्याचं जगातील पहिलंच प्रकरण समोर आलं आहे.

  • Published by:  Priya Lad
पॅरिस, 18 ऑगस्ट : कोरोनानंतर आता जगभर मंकीपॉक्स थैमान घालतो आहे. प्राण्यांमार्फत हा व्हायरस माणसांत आला आहे आणि आता माणसांमार्फत प्राण्यांनाही या व्हायरसची लागण होत असल्याचं प्रकरण समोर आलं. पहिल्यांदा मंकीपॉक्स संक्रमित माणसाच्या संपर्कात आल्याने एका श्वानालाही मंकीपॉक्सची लागण झाली आहे. जगातील हे पहिलंच प्रकरण आहे. फ्रान्सच्या पॅरिसमधील एक श्वान मंकीपॉक्स संक्रमित असल्याचं निदान झालं आहे. या श्वानाला मंकीपॉक्स संक्रमित माणसामुळे या व्हायरसची लागण झाली आहे. मेडिकल रिसर्च जनरल लँसेटमध्ये याची माहिती देण्यात आली आहे. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनेही अलर्ट जारी केला आहे. मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तींनी प्राण्यांच्या संपर्कात न येण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे वाचा - कोरोना काही तुमचा पिच्छा सोडणार नाही; असं ओळखा तुम्हाला Long covid होणार की नाही तज्ज्ञांच्या मते, जर मंकीपॉक्स असाच पसरत असेल तर तो विकसित होऊन वेगवेगळ्या पद्धतीने म्युटेट होण्याची शक्यता अधिक आहे. मंकीपॉक्स हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो मुख्यतः उंदीर आणि माकडांपासून मानवांमध्ये पसरतो. संक्रमित प्राण्यांच्या किंवा माणसांच्या संपर्कात आल्याने मंकीपॉक्स रोगाचा धोका वाढतो. हा एक दुर्मिळ संसर्ग आहे जो स्मॉल पॉक्ससारखा (कांजण्या) दिसतो. या आजारात फोडांची लक्षणे दिसतात. याशिवाय या संसर्गजन्य आजारात रुग्णामध्ये फ्लूसारखी लक्षणेही दिसू शकतात. ज्या लोकांमध्ये हा आजार गंभीर आहे अशा लोकांमध्ये न्यूमोनियाची लक्षणेही दिसून येतात. मंकीपॉक्सची लक्षणे Monkeypox Virus Symptoms ही लक्षणे रुग्णाच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर लाल फोड आणि पुरळ यांसह देखील दिसू शकतात शरीरावर गडद लाल ठिपके त्वचेवर लाल पुरळ. फ्लूची लक्षणे. न्यूमोनियाची लक्षणे. हे वाचा - WHO Monkeypoxचे नाव बदलणार, तुम्हालाही नाव सूचवण्याचा असा असेल अधिकार ताप आणि डोकेदुखी. स्नायू दुखणे. थंडी वाजून येणे. जास्त थकवा. लिम्फ नोड्सची सूज. मंकीपॉक्स कसा रोखायचा विषाणू पसरवणाऱ्या प्राण्यांशी संपर्क टाळा. आजारी जनावरांपासून दूर राहा. संक्रमित रुग्णांना वेगळे करा. हात वारंवार धुवा आणि स्वच्छ ठेवा.
First published:

Tags: Health, Lifestyle, Virus

पुढील बातम्या