अपघातात गमावलेला अवयव माणसाला परत मिळू शकतो? संशोधनातून महत्त्वाचा खुलासा

अपघातात गमावलेला अवयव माणसाला परत मिळू शकतो? संशोधनातून महत्त्वाचा खुलासा

नुकतंच एका संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की सॅलामॅंडर (salamander) या जीवाप्रमाणे मानवामध्ये देखील एखादा गमवलेला अवयव पुन्हा निर्माण करण्याची सुप्त क्षमता असते. यामुळे आशेचा एक नवा किरण दिसून आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 22 जून: एखाद्या व्यक्तीने अपघात किंवा दुर्घटनेत आपला एखादा अवयव गमावला तर त्या व्यक्तीला त्याच स्थितीत पुढील आयुष्य घालवावे लागते. जर त्याला अपंगत्व आले तर अन्य व्यक्तींचा आधार घेऊन दैनंदिन कामे करावी लागतात. मात्र निसर्ग (Nature) ही अद्धुत शक्ती आहे. कारण नुकतंच एका संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की सॅलामॅंडर (Salamander) या जीवाप्रमाणे मानवामध्ये देखील एखादा गमवलेला अवयव पुन्हा निर्माण करण्याची सुप्त क्षमता असते. यामुळे आशेचा एक नवा किरण दिसून आला आहे.

आज तकच्या वृत्तानुसार, हार्बरमधील एमडीआय जैविक प्रयोगशाळेत याबाबत संशोधन करण्यात आले. याबाबत डॉ. जेम्स गॉडविन यांनी सांगितले, की आम्हाला संशोधनातून असे दिसून आले की प्रत्येक मनुष्यात पुनर्निर्मितीची (Reproduction) सुप्त क्षमता असते.

संशोधकांच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, सॅलामॅंडरप्रमाणेच मानवी शरीरात गमावलेला अवयव पुन्हा निर्माण करण्याची क्षमता असते. एमडीआय जैविक प्रयोगशाळेत यावरील संशोधनानंतर संशोधक या निष्कर्षाला येऊन पोहोचले आहेत, की माणसात गमावलेला अवयव पुननिर्माण करण्याची सुप्त क्षमता असते. या संशोधनादरम्यान, संशोधकांनी हे जाणून घेण्यावर लक्ष केंद्रीत केले की एक्सोलोटलला जखम झाल्यास त्याची खूण किंवा डाग का दिसून येत नाही. ज्याप्रमाणे उंदीर किंवा अन्य सस्तन प्राणी एखाद्या जखमेवर प्रतिक्रिया देतात तशी प्रतिक्रिया हा जीव का देत नाही. त्यांना या संशोधनात असे दिसून आले की मॅक्रोफोज नावाच्या रोगप्रतिकारक पेशींनी (Cells) उतक पेशींच्या वाढीस प्रोत्साहन दिले. परंतु उंदिरांमध्ये जखमेचे डाग दिसून आले.

लग्नाच्या पहिल्याच रात्री सरकली नवरदेवाच्या पायाखालची जमीन; गाठलं थेट पोलीस ठाणं

संशोधकांच्या पथकाने सांगितले की डाग तयार होणे सस्तन प्राण्यांमध्ये अवयवाचा पुनर्जन्म रोखण्यास जबाबदार असू शकते आणि भविष्यात मेंदुतील मार्ग ब्लॉक झाल्यानं डाग येऊ शकतात. ज्यामुळे मानवास गमवालेला अवयव पुन्हा मिळू शकतो आणि त्याचे आरोग्य सुधारु शकते.

डॉ. जेम्स गॉडविन आणि सहकाऱ्यांनी एक्सोलोटल सॅलामॅंडरला दुखापत झाल्यानंतर त्याच्या आण्विक सिंग्नलिंगची तुलना पुनरुत्पादन क्षमता असलेल्या प्रौढ उंदराशी करण्यात आली. याबाबत गॉडविन यांनी सांगितले की अवयव गमवलेल्या किंवा जखमी झालेल्या शारीरिक अवयवाचे पुनर्निमाण करण्याऐवजी सस्तन प्राण्यांना दुखापत झालेल्या ठिकाणी एक डाग पडतो आणि तो पुननिर्मितीमध्ये अडथळा आणतो.

सर्वाधिक मुलं असणाऱ्या जोडप्याला मिळणार 1 लाखाचं बक्षीस, 'या' मंत्र्याची घोषणा

या विषयावर संशोधनपर पेपर डेव्हलपमेंट डायनॅमिक्स (Development Dynamics) नियतकालिकात प्रसिध्द झाले होता.

Published by: Kiran Pharate
First published: June 22, 2021, 4:36 PM IST

ताज्या बातम्या