Home /News /heatlh /

तुम्ही सॅनिटायझरचा योग्य पद्धतीने वापर करता आहात का? जाणून घ्या योग्य पद्धत

तुम्ही सॅनिटायझरचा योग्य पद्धतीने वापर करता आहात का? जाणून घ्या योग्य पद्धत

How to use Sanitizer: सॅनिटायझर हे योग्य पद्धतीने वापरले गेले तरच त्याचा योग्य तो फायदा होऊ शकतो.

    मुंबई, 22 एप्रिल: सध्या कोरोनाचा बिकट काळ सुरू आहे. त्यामुळे सॅनिटायझर (sanitizer) , मास्क  (face mask) या आता रोजच्या वापरातल्या गोष्टी बनल्या आहेत. पण सॅनिटायझर हे योग्य पद्धतीने वापरले गेले तरच त्याचा योग्य तो फायदा होऊ शकतो. सॅनिटायझर हो कोरोनाच्या आधी पासूनच एक वापरातील गोष्ट आहे. पण कोरोनानंतर हीच गोष्ट जास्त प्रकाशझोतात आली. आणि आता कोणीही नसेल ज्याला सॅनिटायझर माहीत नाही. अनेकदा काहीजन या सॅनिटायझरचा चूकीच्या पद्धतीने वापर करताना आपण पाहतो. जाणून घेऊयात कोणतं आणि कसं सॅनिटायझर वापराव, अल्कोहोल (alcohol based sanitizer) असलेल सॅनिटायझर वापराव का? सॅनिटायझर विकत घेताना त्यावरील माहीती जरूर वाचावी. ज्या सॅनिटायझर मध्ये 60 ते 70% ईथाइल आणि आईसोप्रोपाइल अल्कोहोल असेल तेच सॅनिटायझर खरेदी कराव. कारण तेच सॅनिटायझर व्हायरस ला मारण्यासाठी सक्षम असते. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)  देखिल अशाचप्रकारच्या सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. (हे वाचा- तुमचं आई-बाबा होण्याचं स्वप्नं हिरावतंय Soft Drink) अशा पद्धतीने सॅनिटायझरचा वापर करावा सॅनिटायझरचे 8 ते 10 थेंब घेऊण दोन्ही हातांच्या तळहातांवर ते पसरावे व त्यानंतर नखांच्या मध्ये तसेच हातांच्या मागे पुढे आणि नखांवर पसरवून दोन्ही तळहात एकमेंकावर चोळावेत. त्याचप्रमाणे सॅनिटायझर लावताना देखिल एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे ती म्हणजे सॅनिटायझर लावल्यानंतर ते 2-3 सेकंद नाही तर 10 ते 12 सेकंद सॅनिटायझर हातांवर सुकेपर्यत रगडावे. ओल्या हातांवर सॅनिटायझर लावू नये हात ओले असतील तर त्यावपर सॅनिटायझर लावून काहीच अपयोग होत नाही. त्याचप्रमाणे हातांवर काही लागलं असेल माती, रंग किंवा आणखी काही तरीही सॅनिटायझर लावू नये. अशापद्धतीने सॅनिटायझर लावल्यास त्याचा काहीत उपयोग होत नाही. (हे वाचा-'कुणी माझ्या बाळाला दूध पाजेल का?' कोरोनाने हिरावली आई; 8 दिवसांच्या तान्हुल्यासाठी बापाची धडपड) एकदा सॅनिटायझर लावल म्हणजे झालं नाही सॅनिटायझरचा वापर हा एकदा करून काहीच होत नाही.  सॅनिटायझर लावल्यानंतर काही काळातच त्याचा परिणाम संपतो. त्यामुळे पुन्हा व्हायरस हातावर येण्याची शक्यता असते. सॅनिटायझर लावल्यानंकर जर तुम्ही कोणत्याही वस्तूला स्पर्श करत असाल तर पुन्हा सॅनिटायझर लावण्याची गरज असते.
    Published by:News Digital
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle, Personal life

    पुढील बातम्या