मुंबई 17 जुलै: लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम(Work from Home) चे धोरण स्वीकारले आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी जरी ते सोयीस्कर असले तरी वर्क लोड वाढल्यावर त्यांना रात्रीही काम करावं लागतं. तसंच काही आयटी कंपन्याचे (IT Company) क्लाएंट परदेशातील असल्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांना नाईट शिफ्ट करावी लागते. पुरुषांसोबतच महिलाही आता नाईट शिफ्ट करतात. याचा कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. पोटदुखी, पित्त, अपचनाच्या समस्या अशा अनेक समस्या भेडसावतात. जर आपण ही अशा समस्यांनी त्रस्त असाल तर आपल्या दैनंदिन जीवन शैलीमध्ये बदल करून तुम्ही तुमच्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकता.
१. पुरेशी झोप घ्या
जर आपण नाईट शिफ्टला काम करत असाल तर दिवसभर भरपूर झोप घ्या. दिवसा झोप न घेतल्याने तुम्हाला रात्री काम करताना झोप येऊ शकते आणि थकवा जाणवू शकतो.
पौष्टिक म्हणून अंडं आणि दूध एकत्र घेताय? तुम्हीच करताय स्वत:चं नुकसान
२. जंक फूड खाणं टाळा
नाईट शिफ्ट करत असाल तर थोड्या थोड्या काळाने काहीतरी हलकं-फुलकं खाणं गरजेचं आहे, पण जंक फूड ( Junk food), तेलकट पदार्थ खाऊ नका. यामुळे तुम्हाला काम करताना झोपही येईल आणि आरोग्यावर ही वाईट परिणाम होईल.
३. चहा आणि कॉफी पिण्याचं प्रमाण कमी करा
नाईट शिफ्टला काम करणारे लोक झोप न यावी म्हणून जास्त प्रमाणात चहा आणि कॉफीचं सेवन करतात किंवा काम करताकरता स्नॅक्स खातात, पण या गोष्टींमुळे तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. शरीरात योग्य प्रमाणात पाणी असणं गरजेचं आहे त्यामुळे अशा सवयी टाळणं फायदेशीर मानलं जातं.
जेवल्यानंतर चहा पिण्याचे ‘हे’ आहेत दुष्परिणाम; आजच सवय बंद करा
४. डाएटमध्ये फळांचा समावेश करा
डाएट (Diet) मध्ये फळांचा समावेश करा. यामुळे तुमच्या शरीराला एनर्जी (Energy) मिळते व तुम्ही रात्री उत्साहाने काम करू शकाल.
५. व्यामाय अवश्य करा
आपण नाईट शिफ्टमध्ये काम करत असाल तरी दिवसातून अर्धा तास काढून तुम्ही व्यायाम करणं आवश्यक आहे. कारण नाईट शिफ्ट असल्याने दिवसभर तुमच्या शरीराची काहीच हालचाल होत नाही, यामुळे शारीरिक व्याधी उद्भवू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips