Home /News /heatlh /

वयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी

वयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त; शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अशी घ्या काळजी

वयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त

वयोवृद्धांना Coronaचा धोका जास्त

वृद्धांना कोरोना झाल्यास गंभीर परिणामांची शक्यता जास्त आहे. ज्या वृद्धांना (Elderly Citizens) डायबेटीज, दमा, ब्रड प्रेशर आणि कॅन्सर आहे अशांची कोरोना काळात जास्त काळजी (Care) घ्यायला हवी.

    नवी दिल्ली, 07 मे: कोरानाची दुसरी लाट (Second Wave of Corona) जगात बहुतांश राज्यात पसरलेली आहे. काही देशांमध्ये दुसरी लाट तर, काही देशांमध्ये तिसरी लाट सुरु आहे. कोरोनाच्या चार किंवा पाच लाट येतील असं आरोग्य तज्ज्ञ (Health experts) सांगत आहेत. अशा परिस्थितीत स्वत:ची काळजी घेणं आणि आपल्या प्रिय व्यक्तींची काळजी घेण आव्हानात्मक बनलं आहे. वयोवृद्ध व्यक्तींसाठी तर, हा काळ आणखीन गंभीर आहे. तरुणांपेक्षा वयोवृद्धांना कोरोनाचा जास्त प्रभाव पडतो आहे. तरुणांपेक्षा वयोवृद्धांची रोग प्रतिकारशक्ती कमजोर असते. त्यातच वयानुसार डायबेटीज, दमा, ब्लड प्रेशर सारखे आजार असतील तर शरीर जास्त कमजोर झालेलं असतं. वयामुळे आरोग्य समस्यांने ग्रासलेलं असल्याने आपल्या काळजीसाठी वृद्ध लोक इतरांवर अवलंबून असतात. त्यातचं प्रतिकारशक्ति कमजोर (Immunity Low) असल्याने त्यांना कोरोनाचं संक्रमण लवकर होतं. त्यामुळे या परिस्थिती आपल्या घरातील आणि पररिचायातील वृद्ध लोकांची काळजी कशी घ्यायची हे जाणून घेऊयात. (हे वाचा- पतीला वाचवण्यासाठी त्या मॅरेथॉनमध्ये अनवाणी धावल्या, पण कोरोनानं हिरावलं सौभाग्य) 1 घरात रहा सुरक्षित रहा सेंटर फॉर डिसीस कंट्रोल अँन्ड प्रिव्हेन्शन (Center for Disease Control and Prevention) नुसार वयोवृद्धांमध्ये वाढत्या वयानुसार कोरोना संक्रमाणाचा धोका जास्त वाढलेला असते. त्यामुळे जास्त काळजी घ्यायला हवी. कोरोना काळात वयोवृद्ध व्यक्तींनी वॉक किंवा व्यायामासाठी घराबाहेर जाणं टाळावं. उलट घरामध्येच राहुन व्यायाम करावा. सीडीसी नुसार अमेरिकेत कोव्हीड-19 मुळे मृत्यू होणाऱ्या 10 जणांमध्ये 8 जण 65 वयापेक्षा जास्त वयाचे आहे. 2 हायजीनबाबत खबरदारी आवश्यक वयोवृद्धांनी ठरावीक वेळेनंतर 20 सेकंद साबणाने हात धुवावेत. त्यांच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. थोड्याफार वेळाने डिसइन्फेक्टर (Disinfectant) वापरून स्वच्छ करावा. त्यांच्या खोलीत व्हेंटीलेशन राहिल याकडे लक्ष द्या. बाहेरुन आल्यावर वृद्ध व्यक्तींजवळ जाताना जास्त काळजी घ्या. कपडे,चप्पल बदलून आंघोळ करुन किंवा साबणाने हात स्वच्छ करुनच त्यांच्या जवळ जा. (हे वाचा- कोरोनाकाळात दुहेरी संकट! BMC डॉक्टरांचा संपाचा इशारा, पगारवाढीचा प्रश्न ऐरणीवर) 3 सतर्कता वयोवृद्ध व्यक्तींना सध्याच्या परिस्थितीची कल्पना देत रहा. त्यांना कोरोना काळात बचाव करण्यासाठी आवश्यक असणारे उपाय सांगत रहा. बाहेर जाताना मास्क घाला, सोशल डिस्टन्सींग पाळा, यासारख्या सुचना त्यांना देत रहा. 4 घरामधील वातावरण सध्या कोरोनाच्या बातम्या पाहुनच मनावर दडपण येतो. वयोवृद्ध व्यक्तींनातर या परिस्थितीत जास्त ताण येतो. त्यामुळे त्यांच्या सोबत शक्य तितक्या चांगल्या आणि सकारत्मक गोष्टी बोलत रहा. सकारात्मक गोष्टींवर चर्चा करणं घरातील वातावरण चांगलं राहण्यासाठी आवश्यक आहे. (हे वाचा- लग्नात सामील झाला कोरोनाबाधित तरूण; अनेकांना लागण, काहींची प्रकृती गंभीर) 5 फोनवरुन संपर्क आपले आईवडील आपल्या जवळ राहत नसतील. लांब राहत असल्यामुळे त्यांच्याजवळ जाणं शक्य नसेल तर, त्यांच्याशी फोनवरुन गप्पा मारा, चर्चा करा. त्यांना आधार देण्यासाठी  चांगल्या गोष्टी बोलत रहा. तुमच्या परिसरात राहणाऱ्या परिचयाच्या पण एकट्या राहणाऱ्या वृद्ध व्यक्तींना आधार द्या. त्यांच्याबरोबरही फोनवरुन चर्चा करा. 6 काळजी घ्या यूनीसेफ (UNICEF) नुसार कोरोना काळात आपल्या परिसरात राहणाऱ्या वृद्ध व्यक्तींना कोरोना काळात आधाराची गरज आहे. आजुबाजुच्या परिसरात वृद्ध व्यक्ती राहत असतील तर, त्यांच्याशी संपर्क करा. बाजारात जातांना फोनवरुन त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंबद्दल माहिती घ्या. त्यांच्यासाठी रोजच्या वापरातील वस्तू खरेदी करा. घरी बनवलेले परार्थ शेअर करा. (हे वाचा- कॅनॉलमध्ये आढळले हजारो Remdesivir इंजेक्शन, बॉक्सवरील मजकुरामुळे चर्चेला उधाण) 7 मेडिसीनची गरज वयोवृद्ध व्यक्तींना एखादा त्रास असेल, आजार असेल आणि त्यांना मेडीकल मधून औषधं आणणं शक्य नसेल तर, त्यांच्यासाठी औषधं खरेदी करा. लाईट बील, पाणी बील, गॅस सिलेंडर यांचं बुकींग फोन किंवा ऑनलाईन पद्धतीने होऊ शकतं अशा कामात त्यांची मदत करा. 8 सोशल आयसोलशन कोरोना काळात सोशल डिस्टंन्सिंगचं महत्व आता सगळ्यांनाच कळालेलं आहे. या काळात वृद्धांना सोशल डिस्टन्सींगचं महत्व पटवून द्या पण, ते एकटे पडू नयेत यासाठी त्यांना फोन, लॅपटॉप,टॅब यांचा वापर शिकवा. त्यांना व्हीडिओ चॅट शिकवा. सोशल डिस्टन्सिंग महत्वाचं आहे. सोशल आयसोलेशन नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Health Tips

    पुढील बातम्या