मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Hair removal : चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्याचे 3 जबरदस्त उपाय, वॅक्सिंगशिवाय त्वचा चमकेल

Hair removal : चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्याचे 3 जबरदस्त उपाय, वॅक्सिंगशिवाय त्वचा चमकेल

केस काढण्यासाठी वॅक्सिंग (Waxing) किंवा थ्रेडिंगची (Threading) मदत घेतली जाते. पण वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगमुळे त्वचेवर पुरळ उठणं, जळजळ होणं आदी समस्या उद्भवू शकतात.

केस काढण्यासाठी वॅक्सिंग (Waxing) किंवा थ्रेडिंगची (Threading) मदत घेतली जाते. पण वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगमुळे त्वचेवर पुरळ उठणं, जळजळ होणं आदी समस्या उद्भवू शकतात.

केस काढण्यासाठी वॅक्सिंग (Waxing) किंवा थ्रेडिंगची (Threading) मदत घेतली जाते. पण वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगमुळे त्वचेवर पुरळ उठणं, जळजळ होणं आदी समस्या उद्भवू शकतात.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : सर्वांच्याच चेहऱ्यावर आणि शरीरावर काही ठिकाणी पातळ तर काही ठिकाणी जाड केस असतात. पण काही लोकांना शरीरावरील आणि चेहऱ्यावरील केस आवडत नाहीत. हे केस काढण्यासाठी वॅक्सिंग (Waxing) किंवा थ्रेडिंगची (Threading) मदत घेतली जाते. पण वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगमुळे त्वचेवर पुरळ उठणं, जळजळ होणं आदी समस्या उद्भवू शकतात. या त्रासांपासून वाचण्यासाठी तुम्ही केस काढण्याच्या घरगुती टिप्सचा (hair removal tips) अवलंब करू शकता. नको असलेले केस काढण्यासाठी असलेले हे घरगुती उपाय त्वचेला चमकदार देखील बनवण्यास मदत करतील. केस काढण्याचे घरगुती उपाय (Hair removal home remedies) : केस काढण्यासाठी घरगुती उपाय 1. होममेड हेअर रिमूव्हल क्रीम (Homemade Hair Removal Cream) : बटाटे आणि मसूर डाळ शरीरावर आणि चेहऱ्यावरील नको असलेले केस बटाटे आणि मसूर डाळीच्या मदतीनं काढता येतात. यासाठी दोन चमचे मसूर डाळ रात्री भिजत ठेवा आणि सकाळी बटाट्यासोबत बारीक करून पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घालून जेथील केस काढायचे आहेत त्या त्वचेवर एकसारख्या प्रमाणात लावा. पेस्ट सुकल्यानंतर ती हलक्या हातांनी घासून काढून टाका. हे वाचा - Lemon Water : लिंबू-पाणी प्यायल्याने किडनी खराब होते? शरीरावर नेमके काय होतात परिणाम वाचा सर्व 2. तुरटी आणि गुलाबपाणी साधी दिसणारी तुरटी हा केस काढण्याचा उत्तम उपाय आहे. यासाठी एक चमचा तुरटी पावडर आणि एक चमचा गुलाबपाणी चांगले मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट नको असलेल्या केसांवर लावा आणि कोरडे होऊ द्या. पेस्ट सुकल्यावर हलके चोळून पेस्ट काढून टाका. तुम्हाला दोन वेळा हा प्रयोग केल्यानंतर फरक दिसेल. हे वाचा - क्या बात है! भारताची ‘ही’ मोठी कंपनी कायम सुरु ठेवणार Work From Home; कर्मचाऱ्यांना असणार चॉईस 3. बेसन आणि गुलाब पाणी बेसनचं पीठ त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, हे आपण ऐकलं असेलच. शरीरावर किंवा चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठीदेखील ते खूप उपयुक्त आहे, असं तुम्ही जुन्या काळातील महिलांकडून (आजी, काकू) ऐकलं असेल. हेअर रिमूव्हल क्रीम बनवण्यासाठी 2 चमचे बेसन, 2 चमचे गुलाबपाणी आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर किंवा नको असलेल्या केसांवर लावा आणि 20-25 मिनिटे कोरडे होऊ द्या. सुकल्यावर हलके मसाज करून पेस्ट काढा. असं आठवड्यातून 2-3 वेळा केल्यास शरीरावरील नको असलेले केस निघून जातात. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Health Tips, Woman hair

पुढील बातम्या