मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

घरच्या-घरी सनस्क्रीन तयार करू शकता; स्वस्तात मस्त आणि केमिकल फ्री

घरच्या-घरी सनस्क्रीन तयार करू शकता; स्वस्तात मस्त आणि केमिकल फ्री

सनस्क्रीन क्रीम किंवा लोशन त्वचेला सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण देऊन त्वचेची विशेष काळजी घेण्यास मदत करते. सनस्क्रीन घरी देखील सहज बनवता येते.

सनस्क्रीन क्रीम किंवा लोशन त्वचेला सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण देऊन त्वचेची विशेष काळजी घेण्यास मदत करते. सनस्क्रीन घरी देखील सहज बनवता येते.

सनस्क्रीन क्रीम किंवा लोशन त्वचेला सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण देऊन त्वचेची विशेष काळजी घेण्यास मदत करते. सनस्क्रीन घरी देखील सहज बनवता येते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 25 सप्टेंबर : त्वचेची काळजी घेण्यासाठी आज-काल भरपूर सौंदर्य उत्पादने वापरली जातात. सनस्क्रीन क्रीम किंवा लोशनदेखील बहुतेक लोकांच्या स्कीन केअरचा एक महत्त्वाचा भाग असतो. मात्र, बाजारात उपलब्ध असलेली सनस्क्रीन क्रीम किंवा लोशन महाग आणि केमिकलयुक्त असतात. कोणत्याही कारणासाठी जर तुम्हाला बाजारातून सनस्क्रीन विकत घ्यायची नसेल, तर काही सोप्या पद्धतींचा वापर करून तुम्ही घरीही सनस्क्रीन तयार करू शकता.

सनस्क्रीन क्रीम किंवा लोशन त्वचेला सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण देऊन त्वचेची विशेष काळजी घेण्यास मदत करते. सनस्क्रीन घरी देखील सहज बनवता येते. येथे आम्ही तुम्हाला घरगुती सनस्क्रीन बनवण्याचे दोन सोपे उपाय सांगत आहोत, त्याद्वारे तुम्ही तुमच्या त्वचेचे अधिक चांगले संरक्षण करू शकता.

होममेड सनस्क्रीन बनवण्याचा पहिला उपाय -

घरी सनस्क्रीन बनवण्यासाठी तुम्हाला मॉइश्चरायझर क्रीम, कॅलामाइन पावडर आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलची आवश्यकता असेल. यासाठी तुमच्या त्वचेला साजेसे 2 चमचे मॉइश्चरायझिंग क्रीम घ्या. आता त्यात 1 चमचा कॅलामाईन पावडर आणि 1 कॅप्सूल व्हिटॅमिन ई मिक्स करा. झाले तुमचे सनस्क्रीन तयार. चांगला परिणाम दिसण्यासाठी ते नियमितपणे वापरा. तसेच सनस्क्रीन जास्त काळ टिकवण्यासाठी त्यात पाणी मिसळू नका.

हे वाचा - रविवार म्हणून शॉपिंगचा विचार; खरेदीआधी तुमचं आर्थिक राशिभविष्य जरूर वाचा

सनस्क्रीन बनवण्यासाठी टिप्स -

घरी सनस्क्रीन बनवण्यासाठी 2 चमचे बदामाच्या तेलात 1 चमचा शिया बटर, 1 चमचा कोकोआ बटर, 1 चमचा झिंक ऑक्साईड आणि 1 चमचा व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळा. झिंक ऑक्साईडऐवजी तुम्ही कॅलामाइन पावडर देखील वापरू शकता. या सर्व गोष्टी मिक्स करून डब्यात साठवा आणि हे घरी बनवलेले सनस्क्रीन नियमित वापरा.

सनस्क्रीन कसे लावायचे

सनस्क्रीन क्रीम किंवा लोशन सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण देण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काही वेळापूर्वी सनस्क्रीन क्रीम किंवा लोशन लावा. लक्षात ठेवा, सनस्क्रीनचा त्वचेवर परिणाम व्हायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे बाहेर जाताना सनस्क्रीन लावण्याऐवजी ते थोडे आधी लावणे चांगले.

First published:

Tags: Skin, Skin care