मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

महागड्या तेलांची नाही गरज, भारदस्त दाढी-मिशांसाठी घरच्या-घरी असे बनवा तेल

महागड्या तेलांची नाही गरज, भारदस्त दाढी-मिशांसाठी घरच्या-घरी असे बनवा तेल

दाढीचे तेल सहसा खूप महाग असते. त्यासाठी आपण घरगुती दाढीचे तेल बनवण्याचे काही उपाय जाणून घेऊया. त्यामुळे दाढी आपण काळी आणि घनदाट बनवू शकाल.

दाढीचे तेल सहसा खूप महाग असते. त्यासाठी आपण घरगुती दाढीचे तेल बनवण्याचे काही उपाय जाणून घेऊया. त्यामुळे दाढी आपण काळी आणि घनदाट बनवू शकाल.

दाढीचे तेल सहसा खूप महाग असते. त्यासाठी आपण घरगुती दाढीचे तेल बनवण्याचे काही उपाय जाणून घेऊया. त्यामुळे दाढी आपण काळी आणि घनदाट बनवू शकाल.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 17 सप्टेंबर : दाढी काही लोकांच्या व्यक्तिमत्वाला खूप शोभा देते. म्हणूनच बहुतेक पुरुष त्यांच्या स्टाइलनुसार दाढी राखण्यास प्राधान्य देतात. काळी आणि घनदाट दाढी असावी, यासाठी दाढीच्या तेलाचाही अनेकजण वापर करतात. पण, दाढीसाठी तेल विकत घेणे तुम्हाला महाग वाटत असेल तर काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही दाढीचे तेल घरीही तयार करू शकता. काही लोकांना दाढी ठेवण्याची खूप आवड असते पण त्यांची दाढी दाट नसते. त्यामुळे त्यांना दाढीची हवीतशी स्टाइल करता येत नाही. यासाठी दाढीच्या तेलाचा वापर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. दाढीचे तेल सहसा खूप महाग असते. त्यासाठी आपण घरगुती दाढीचे तेल बनवण्याचे काही उपाय जाणून घेऊया. त्यामुळे दाढी आपण काळी आणि घनदाट बनवू शकाल. निलगिरी तेल वापरा - अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटकांनी समृद्ध नीलगिरीचे तेल दाढीच्या वाढीला गती देण्याचे काम करते. यासाठी 6 चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये निलगिरी तेलाचे 3-4 थेंब मिसळा. आता हे तेल एका काचेच्या बरणीत भरून रोज या तेलाने दाढीला मसाज करा. 30 मिनिटांच्या मसाजनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे काही दिवसातच तुमची दाढी दाट होईल. हे वाचा - डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत कापूर तेलाचे आहेत इतके फायदे; असा करा वापर खोबरेल तेलही उपयुक्त - खोबरेल तेल दाढीला मॉइश्चरायझ करून केसांच्या वाढीस देखील मदत करते. खोबरेल तेलापासून दाढीचे तेल तयार करण्यासाठी 50 मिली शुद्ध खोबरेल तेलात 10 थेंब रोझमेरी किंवा लॅव्हेंडर तेल मिसळा. रोज रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने दाढीला मसाज करा आणि सकाळी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमची दाढी जाड, मऊ आणि चमकदार होईल. हे वाचा - तुम्हीही ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ तर करत नाही ना? काय आहेत त्याचे फायदे आणि तोटे? टी ट्री ऑइल वापरून पहा टी ट्री ऑइल अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांचा उत्तम स्रोत मानला जाते. टी ट्री ऑइल दाढी दाट करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यासाठी 50 मिली बदामाच्या तेलात 4 थेंब टी ट्री ऑइल आणि 4 थेंब नीलगिरीचे तेल मिसळून दाढीला मसाज करा. त्यानंतर 15-20 मिनिटांनी चेहरा सामान्य पाण्याने धुवा. यामुळे तुमची दाढी घनदाट आणि स्मार्ट दिसेल.
First published:

Tags: Health, Lifestyle

पुढील बातम्या