मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

How to control Diabetes : 55-20 फॉर्म्युला; डायबेटिज कंट्रोल ठेवण्याचा सोपा मंत्र

How to control Diabetes : 55-20 फॉर्म्युला; डायबेटिज कंट्रोल ठेवण्याचा सोपा मंत्र

डायबेटिज कंट्रोलमध्ये ठेवण्याचा उपाय.

डायबेटिज कंट्रोलमध्ये ठेवण्याचा उपाय.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च इंडियाने (ICMR) डायबेटिसच्या अनुषंगाने आहाराबाबत संशोधन केलं आहे.

मुंबई, 21 सप्टेंबर : जगभरात डायबेटिसच्या (Diabetes) रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. बदललेली जीवनशैली, बैठ्या कामाकडे वाढता कल, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा आणि अनुवंशिकता या प्रमुख कारणांमुळे डायबेटिसचं प्रमाण वाढत आहे. डायबेटिसच्या रुग्णांतील ब्लड शुगर लेव्हलचं (Blood Sugar Level) वाढलेलं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराप्रमाणेच व्यायाम आणि ताणतणाव व्यवस्थापन या गोष्टी महत्त्वपूर्ण असतात. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च इंडियाने (ICMR) डायबेटिसच्या अनुषंगाने आहाराबाबत संशोधन केलं आहे. आहारात कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांचं सेवन कमी करून प्रोटिनयुक्त पदार्थांचं सेवन वाढवणं डायबेटिस आणि प्री-डायबेटिसक रुग्णांसाठी फायदेशीर ठरतं, असं या संशोधनातून दिसून आलं आहे. `आज तक`ने या विषयीची माहिती दिली आहे. डायबेटिस असलेल्या रुग्णांच्या रक्तात साखरेचं प्रमाण जास्त असतं. ते नियंत्रित करण्यासाठी पॅनक्रियाज (Pancreas) अर्थात स्वादुपिंड एक हॉर्मोन रिलीज करतं. त्याला इन्शुलिन असं म्हणतात. इन्शुलिन (Insulin) ग्लुकोज नियंत्रणाचं काम करतं. पण जेव्हा स्वादुपिंडातून योग्य प्रमाणात इन्शुलिन रिलीज होत नसतं, तेव्हा संबंधित व्यक्तीला डायबेटिस झाला असं म्हणतात. डायबेटिस टाइप-1, डायबेटिस टाइप -2 असे दोन प्रकार आहेत. डायबेटिस टाइप -1 मध्ये स्वादुपिंड इन्शुलिनची निर्मिती करु शकत नाही. डायबेटिस टाइप-2 मध्ये स्वादुपिंडात इन्शुलिनची निर्मिती खूप कमी प्रमाणात होते. सध्या भारतातील एकूण 7.4 कोटी लोक मधुमेहग्रस्त, 8 कोटी लोक प्री-डायबेटिक आहेत. तसंच अनेक जणांचा आजार वेगानं प्री-डायबेटीकमधून डायबेटिसमध्ये रुपांतरित होत आहे. डायबेटिस होण्यापूर्वीच्या स्थितीला प्री-डायबेटिक असं म्हणतात. डायबेटिसवर चाललेल्या सर्वांत मोठ्या अभ्यासानुसार, जर तुम्ही प्री-डायबेटिक असाल तर भात (Rice) आणि चपाती खाणं टाळावं. त्याऐवजी प्रोटिनयुक्त पदार्थांचं सेवन वाढवावं. यामुळे डायबेटिस टाइप -2 चा धोका कमी होतो. आहारातून मिळणाऱ्या एकूण ऊर्जेत असलेला कार्बोहायड्रेटचा 50 ते 55 टक्के भाग कमी करून प्रोटिनयुक्त पदार्थांचं सेवन 20 टक्क्यांनी वाढवल्यास डायबेटिस आणि प्री-डायबेटिस हे आजार होत नाहीत. हे वाचा - Food for Diabetes : जिभेचे चोचलेही पुरवतील आणि ब्लड शुगरही वाढणार नाही; डायबेटिज पेशंटसाठी 5 चमचमीत पदार्थ आयसीएमआरचा डायबेटिसविषयक हा अभ्यास 18,090 लोकांच्या आहारात समाविष्ट असलेल्या पोषक घटकांच्या विश्लेषणावर आधारित आहे. या अभ्यासाचे लेखक डॉ. व्ही. मोहन यांनी सांगितलं की, ``2045 पर्यंत भारतातील डायबेटिसची रुग्णसंख्या 13.5 कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ येत्या 20 वर्षांत डायबेटिसच्या रुग्णांची संख्या दुप्पट होईल. कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांचं अतिप्रमाणात सेवन हे या मागचं प्रमुख कारण आहे.`` ``आपल्या आहारात सुमारे 60 ते 75 टक्के पदार्थ कार्बोहायड्रेट्सयुक्त असतात तर प्रोटिनयुक्त पदार्थांचं प्रमाण केवळ 10 टक्के असतं. पांढरा भात जास्त प्रमाणात खाल्ला तर डायबेटिसचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, असं या पूर्वीच्या अनेक अभ्यासांमधून दिसून आलं आहे. गहू, मैदा हे पदार्थदेखील तितकेच नुकसानदायी असतात. जर एखाद्या व्यक्तीनं कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांचं सेवन 50 ते 55 टक्क्यांपर्यंत कमी केलं आणि प्रोटिनयुक्त पदार्थांच्या (Protein Foods) सेवनाचं प्रमाण 20 टक्क्यांनी वाढवलं तर डायबेटिसच्या समस्येपासून दिलासा मिळू शकतो,`` असं डॉ. मोहन यांनी सांगितलं. आपली आहाराची आदर्श डिश कशी असावी, याबाबत डॉ. मोहन म्हणाले, ``आपल्या डिशमध्ये निम्मी जागा भाज्यांसाठी असावी. त्यात हिरव्या भाज्या, बीन्स, कोबी, फ्लॉवर यांचा समावेश असावा. बटाट्यासारख्या जास्त स्टार्च असलेल्या पदार्थांचा त्यात समावेश नसावा. डिशच्या उर्वरित निम्म्या भागात प्रोटिनयुक्त पदार्थ म्हणजेच मासे, चिकन आणि सोया यांचा समावेश असावा. तसंच डिशमध्ये थोडासा भात आणि दोन चपात्या असाव्यात.`` हे वाचा - Cooking oil for Diabetes : मधुमेहींसाठी औषधच आहे 'हे' कुकिंग ऑईल; तेलही कंट्रोलमध्ये ठेवतं डायबेटिज डायबेटिसपासून मुक्ती मिळवण्यासाठी आहारात कार्बोहायड्रेटचं प्रमाण 49 ते 54 टक्के, प्रोटिनयुक्त पदार्थांचं प्रमाण 19 ते 20 टक्के, फॅट्सचं प्रमाण 21 ते 26 टक्के आणि फायबरयुक्त पदार्थांचं प्रमाण पाच ते सहा टक्के असावं. योग्य रिझल्ट दिसावेत यासाठी महिलांनी पुरुषांच्या तुलनेत कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ दोन टक्के कमी खावेत. तरुणांच्या तुलनेत ज्येष्ठ लोकांनी कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांचं सेवन एक टक्क्यानी कमी करावं आणि प्रोटिनयुक्त पदार्थ एक टक्का जास्त खावेत. प्री-डायबेटिसच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचं सेवन 50 ते 56 टक्के, प्रोटिनयुक्त पदार्थांचं सेवन 10 ते 20 टक्के, फॅट्सचं सेवन 21 ते 27 टक्के आणि फायबरयुक्त पदार्थांचं सेवन 3 ते 5 टक्के करावं. ज्या लोकांच्या शारीरिक हालचाली मर्यादित आहेत, त्यांनी शारीरिक हालचाली जास्त असलेल्या लोकांच्या तुलनेत कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचं सेवन चार टक्क्यांनी कमी करावं, असं या अभ्यासात सुचवण्यात आलं आहे.
First published:

Tags: Diabetes, Health, Lifestyle, Tips for diabetes

पुढील बातम्या