मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

कोरोनापासून बचावासाठी घ्या काळजी, वाचा फळे आणि भाजीपाला स्वच्छ करायची योग्य पद्धत

कोरोनापासून बचावासाठी घ्या काळजी, वाचा फळे आणि भाजीपाला स्वच्छ करायची योग्य पद्धत

आपण बाजारातून फळे(Fruits), भाजीपाला (Vegetables) , रेशन आणि दुध अशा बऱ्याच वस्तू आणतो. या वस्तूंमुळे कोरोना (Corona) घरात येऊ शकत नाही का, असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल.

नवी दिल्ली 26 एप्रिल: देशभरात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेनं हाहाकार घातला आहे. त्यामुळे लोकांना मास्क घालणं, सोशल डिस्टन्स ठेवणं आणि सॅनिटायझर वापरण्याचे तसेच अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले जात आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांनी लॉकडाऊन (Lockdown) लावलं आहे. लॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. मग आपण बाजारातून फळे (Fruits), भाजीपाला (Vegetables), रेशन आणि दुध अशा बऱ्याच वस्तू आणतो. या वस्तूंमुळे कोरोना (Corona) घरात येऊ शकत नाही का, असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल.

कपडे आणि इतर कठीण किंवा टणक पृष्ठभागांवर विषाणू किती काळ जिवंत राहतो, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळेच बाहेरून आपण ज्या वस्तू घरात आणतो त्यांची योग्य स्वच्छता करणं गरजेचं आहे. त्यासाठी काही टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या टिप्स वापरून तुम्ही या वस्तुंचं निर्जंतुकीकरण करू शकता.

अशाप्रकारे करा फळे आणि भाजीपाल्याची स्वच्छता -

- एका मोठ्या भांड्यात पाणी भरून फळ आणि भाजीपाला एक-एक करून धुवा. तसेच तुम्ही नळाच्या वाहत्या पाण्याखाली त्यांना नीट स्वच्छ करू शकता.

- त्यानंतर एका भांड्यात पाणी भरून त्यात एक चमचा मीठ आणि थोडा खाण्याचा सोडा टाका. या पाण्यात फळे आणि भाजीपाला स्वच्छ धुवून घ्या.

- ज्या फळांचा आणि भाजीपाल्याचा साल काढून वापर करायचा आहे. त्यांना सालीसह स्वच्छ पाण्यात धुवून घ्या.

- बाहेरून आणलेल्या दुधाच्या बंद पिशवीला फोडण्यापूर्वी धुवून घ्या.

- कोणत्याच सामानाच्या पाकिटाला किंवा दुधाच्या पिशवीला तोंडाने अथवा दातांच्या मदतीने फोडू नका.

- मांस आणि मासे स्वच्छ धुवून ते तीव्र आचेवर शिजवून घ्या.

- फ्रिजमध्ये कच्च्या भाज्या आणि शिजवलेल्या भाज्या वेगवेगळ्या ठेवा.

- सध्याच्या काळात सालीसह खाल्ल्या जाणाऱ्या वस्तूंचे सेवन कमी करा. जर खात असाल तर ते त्याआधी नीट शिजवून घ्या.

- फळे आणि भाजीपाला धुण्यासाठी क्लोरीन, अल्कोहोल, डिसइंफेक्टेंटचा वापर करू नका. तसेच साबण अथवा डिटर्जंट पावडरचाही वापर करून नका. त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.

First published:

Tags: Corona updates, Coronavirus, Health, Vegetables, Wellness